व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता
शिक्षण : शाळा ते करिअर
भाग चौदावा
व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता
मित्रांनो व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्तेचं अत्युच्च उदाहरण म्हणजे महात्मा गांधीजी .गांधीजी लहान असताना त्यांच्या हातून काही चुका झालेल्या होत्या. एकदा तर त्यांनी त्यांच्या वडिलांचे खिशातून पैसे चोरले होते .अगदी सराईतपणे केलेल्या चोरी बद्दल त्यांना आनंद झाला नाही तर अतिशय मानसिक त्रास झाला. त्यांचं मन त्यांना खात होतं !!!कोणालाही माहीत नाही चोरी केली ते??? मात्र गांधीजींना स्वतःला खूप वाईट वाटले परंतु चोरी केली हे सांगायची हिम्मत होत नव्हती?? म्हणून त्यांनी कागदावर लिहून वडिलांच्या हातात चिठ्ठी द्यायचं ठरवलं .चिठ्ठी वाचून वडिलांना खूप वाईट वाटलं. स्वतःच्या चोरीची केलेली कबुली स्वतः दिल्यामुळे वडील रागावले नाहीत, मात्र इथून पुढे कधीही चोरी करायचे नाही हे मनातून पक्के झाले .
मित्रांनो या उदाहरणावरून आपल्या हेच लक्षात येतं की आपण केलेल्या चुका स्वतः मान्य करायच्या हे धाडस कोणीही करू शकत नाही. मात्र हे धाडस गांधीजींनी करून दाखवलं .ही त्यांच्या मनाची ताकद होती. अशी ताकद आपल्यालाही निर्माण करता येईल.
वरील लिंक ला टच करा व महात्मा गांधी यांचे जीवन चरित्र पुस्तके खरेदी करा
ज्या व्यक्तींमध्ये मुलांमध्ये व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता आहे त्यांना ती ताकद वाढवावी लागेल .
- मित्रांनो आपल्या मुलांमध्ये स्वयंशिस्त असेल ते योग्य वेळेला योग्य प्रकारे वागत असतील तर ते इतरांपेक्षा नक्कीच वेगळे आहेत.
- काही मुलं ही अभ्यास खेळ यात काटेकोर असतात. त्यांना दुसरे कुणी सांगायची गरज लागत नाही.
- ती स्वतःचा अभ्यास स्वतः वेळेस करतात.
- खेळ वेळेत खेळतात .
- दिलेली कामे काटेकोरपणे करतात
असे असेल तर आपल्या मुलांमध्ये व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता आहे हे पक्क करायचं.
व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्तेचे मध्ये स्वतःच्या मनात डोकावणे, स्वतःशी संवाद साधणं, स्वतःला केंद्रित ठेवून काही प्रयोग करणं ,या प्रयोगांतून निष्कर्ष काढणं, ही एक वेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे. एखादी गोष्ट जितकी जास्त वैयक्तिक पटते आवडते तितकीच ती जास्त लोकांना पटते आवडते असे म्हणतात. ते अशा माणसांना आणि त्यांच्या वागण्याला लागू पडतं .यांना डॉक्टर गार्डनर यांनी व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता असं म्हटलं आहे.
व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्तेची काही वैशिष्ट्ये
- अशी मुले माणसे तर्कसंगत विचार करतात धोरणे व योजना विश्लेषण समस्यांचे निराकरण करण्यासाठी तार्किक मार्ग यांचा विचार करण्याची क्षमता या व्यक्तींमध्ये असते
- या व्यक्तींचा स्वतःच्या भावनांवर ती संयम असतो नियंत्रण असते.
- स्वतः नाविन्यपूर्ण विचार करून मनामध्ये हे नकारात्मक सकारात्मक लढाई करण्याची क्षमता असते .
- स्वतः शिस्त आणि एकाग्रतेने कोणतेही काम पूर्ण करतात.
- आपले विचार प्रक्रिया , प्रेरणा ,वर्तन स्वतः समजून घेतात.
- अशा व्यक्ती शांत असतात त्या सतत काही ना काही चिंतन करत असतात .
- त्यांना आजूबाजूची परिस्थिती घडणाऱ्या घटना यांची जाणीव असून त्या कशामुळे घडत आहेत, का घडतात याची कारणे शोधत असतात.
- या स्वतः विचार करून मनाने खंबीर असतात .
- सतत काही ना काही शिकत असतात.
- ज्या गोष्टी पाहिल्या नाहीत किंवा ज्या अमूर्त आहेत अशा स्वतः संकल्पना समजून त्या विकसित करण्याची क्षमता अशा लोकांमध्ये असते.
- भविष्याचा विचार करून वर्तमानात जगत असतात .
- शोध लावण्याची क्षमता असते .
- सर्जनशील गोष्टी निर्माण करण्यासाठी धडपडत असतात .
- कोणतेही काम उस्फूर्तपणे करतात . इतरांनी सांगण्याची गरज त्यांना लागत नाही.
- स्वतःची दिशा स्वतःचा मार्ग ते स्वतः शोधत असतात.
- अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्वासात ,विशिष्ट आत्म प्रणाम या गोष्टींचा समावेश होतो असतो.
- कधीही कंटाळा करत नाहीत सक्षम असतात.
- संयम बाळगतात ,स्वतःशिस्त व आत्मविश्वासाने पुढाकार घेऊन स्वतंत्रपणे कार्य करतात. चिकाटीने काम करतात .
- सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात.
- वेळेचे चांगले व्यवस्थापन करतात.
- संयमी स्वतःवर नियंत्रण ठेवणारा माणूस या बुद्धिमत्तेचा असतो.
आपल्या मुलांमध्ये व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्तेची ताकद वाढवायचे असेल तर हे खास प्रयत्न करायला हवेत.
- अशा मुलांनी रोज किंवा जमेल तेव्हा डायरी लिहायला हवी
- स्वतःपुरती छोटे-छोटे प्रकल्प, कार्य ,ध्येय ठरवायला मुलांना सांगा ती पूर्ण करता येतात का ते पहा .
- ज्या गोष्टी आवडतात त्या छंदात रूपांतर होते का ते पहा
- पुस्तक वाचायला आवडत असतील तर आवडते पुस्तकासंबंधी एक वही करा .जे आवडेल ते लिहा आवडणार नाही तेही लिहा .
- चित्र काढायला आवडत असेल तर बघून चित्र काढण्यापेक्षा मनाने चित्र काढा. तुमचे चित्रांचा संग्रह करा.
- चित्रांचे प्रदर्शन बघा
- कुठल्याही साध्या चित्रांची निरीक्षण करा हे चित्र कशामुळे चांगलं वाटत आहे या चित्रात अजून काय हवे आहे याचा विचार करा.
- वेगवेगळे प्रकल्प तयार करायला द्या
- पुस्तके वाचणे महान व्यक्तींच्या चरित्रांचा अभ्यास करायला सांगा.
- छंद विकसित करायला लावा .
अशा कृती केल्यामुळे व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्तेला खतपाणी घालण्यास नक्कीच मदत होईल
या व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्तेची अनेक महान उदाहरणे आहेत सॉक्रेटिस, ॲरिस्टॉटल, महात्मा गांधी ,स्वामी विवेकानंद, स्टीव्ह जॉब्स, एन आर नारायण मूर्ती ही आहेत.
https://amzn.to/2A7ceTD
वरील लिंक ला टच करा आणि स्वामी विवेकानंद यांच्या चरित्र वरील पुस्तके खरेदी करा
वरील लिंकला टच करा व जॉब्स यांच्या चरित्र पुस्तके खरेदी करा
व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्तेच्या लोकांसाठी खालील करिअरच्या संधी आहेत.
अभिनेता
कलाकार
करिअर समुपदेशक
सल्लागार
क्रिमिनोलॉजी
भविष्यवेत्ता
अधिकारी
वैयक्तिक सल्लागार
तत्त्वज्ञ
कार्यक्रम आयोजक
उद्योजक
मानसशास्त्रज्ञ
संशोधक
अध्यात्म सल्लागार
थेरपिस्ट
लेखक
आरोग्य सल्लागार
चला तर आपल्या मुलांमध्ये व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता आहे का हे पाहून त्यांच्यातील ही कौशल्ये विकसित करण्यासाठी दिलेल्या कृती करून मुलांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देऊ या .
क्रमशः
सचिन बाजीराव माने
आरफळ सातारा
98 81 32 35 84



टिप्पण्या