खेळातून शिक्षण भाग-2
शिक्षण : शाळा ते करियर
पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी
खेळातून शिक्षण भाग-2
मित्रांनो दररोज आपण प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घरच्या घरी दररोज नवीन खेळ व कृतीतून मराठी गणित आणि इंग्रजी विषयांची विविध कौशल्य शिकणार आहोत.
मराठी
शब्दसम्राट कोण
उद्देश : मुळाक्षरापासून काना मात्रा सहित शब्द तयार करणे
कृती :
हा खेळ कितीही मुले खेळू शकतात .
वेळ 25 ते 30 मिनिटे.
प्रत्येक गटातील वेगवेगळे अक्षर प्रथम घ्या व त्याला इतर अक्षर जोडून जास्तीत जास्त शब्द तयार कर.
गट 1 अ आ इ ई उ ऊ ए ऐओ औ अं
गट 2 क ख ग घ
गट 3 च छ ज झ
गट 4 ट ठ ड ढ
गट 5 त थ द ध न
गट 6 प फ ब भ म
गट 7 य र ल व श
गट 8 ष स ह ळ क्ष ज्ञ
उदाहरणार्थ -
अक्षर - अ -अक्षर, अननस, अमर ,अटक ,अबब .
क - कल ,कळ, कर ,कस,कट ,करवत ,कसर , कहर, कलह, कपट ,दशरथ, कसरत, कणखर ,कलरव ,कमर ,कलकल ,कद .
सर्वांत जास्त शब्द तयार करणार किंवा करणारी शब्दसम्राट ठरेल.
गणित
उंच ठेंगणा
उद्देश: उंच ,ठेंगण्या वस्तू ओळखता येणे
कृती:
आपल्या घराबाहेर अंगणात किंवा शेतामध्ये असणाऱ्या झाडांच्या उंचीवरून उंच झाड कोणते आणि ठेंगणे झाड कोणते हे ओळखणे.
उदाहरणार्थ : नारळाचे झाड हे उंचीने जास्त म्हणून ते उंच तर चिकूचे झाड उंचीने कमी म्हणून ठेंगणे ,बुटके, लहान.
घरामध्ये कुटुंब असणारे सर्व व्यक्ती जवळजवळ उभ्या राहिल्या तर घरातील सर्वात उंच व्यक्ती कोण आणि सर्वात बुटकी व्यक्ती कोण हे ओळखणे .
अशाच प्रकारे किचन मधील वस्तू ,दप्तरातील वस्तू ,रस्त्यावरील खांब ,आपले व शेजारी असणारे घर इत्यादी पाहून उंच व ठेंगणे यांची यादी तयार करणे.
इंग्रजी
व्यंजनांचे आवाज भाग 2
गेल्या भागात पाहिलेल्या व्यंजनांचे आवाज हे त्यांच्या नावातच लपलेले होते मात्र आज आपण पाहणार आहोत त्यांचे नाव आणि आवाज हे मात्र वेगवेगळे आहेत.
Cc चा आवाज क
Gg चा आवाज ग
Hh चा आवाज ह
Ww चा आवाज व
Qq चा आवाज क्व
Yy चा आवाज य
वरील सर्व कृती पूर्ण करा.
मागील भाग पुन्हा पाहण्यासाठी खालील लिंक वर टच करा.
https://www.educationschooltocareer.com/2020/10/1.html
क्रमशः
सचिन बाजीराव माने
आरफळ सातारा

टिप्पण्या
या पद्धतीने मुले आनंदी राहतील . शिकण्याची आवड निर्माण होईल