खरंच सुख म्हणजे काय?

खरंच सुख म्हणजे काय?


माझे आवडते लेखक अनंत कान्हेटकर यांचा ललितलेख माझ्या वाचनात आला .त्तेव्हा मी कॉलेजला होतो .
त्यामध्ये असे लिहिले होते की खरंच सुख म्हणजे काय ?
त्यांनी लिहिलेली खूप छान उदाहरणे मला आजही आठवतात .
त्यातील उदाहरण तुम्हाला सांगतो .
घरातील किचनच्या लॉफ्ट वर मेणबत्त्या पुड्यात पडलेल्या होत्या तर त्याच किचनच्या खिडकीच्या कोपऱ्यात एक अर्धवट जळलेली मेणबत्ती होती .
मनात हाच प्रश्न होता की या दोघींमध्ये सुखी  कोण ?लॉप्ट वर
पुड्यात  पडलेल्या झुरळांनी किड्यांनी कुरतडलेल्या मधूनच मोडलेल्या पण आरामात निद्रिस्त झोपलेल्या अशा या नव्याकोऱ्या मेणबत्या आणि त्याच्या उलट काय तर खिडकीच्या कोपऱ्यामध्ये असणाऱ्या अर्धवट जळालेली मेणबत्ती .
मग मला सांगा यातील खरंच सुखी कोणती मेणबत्ती असेल ??

आपला आयुष्य जीवन असच आहे. आम्ही मस्त आरामात सोफ्यावर ( धूळ ) भजी खात पडलेले असतो . त्यांना त्यात खूप मजा वाटते .
त्यांना वाटत आम्ही सुखी ??
पण त्यांचे कंबरडे मोडले आहे .
धुळ, झुरळ  याचा विचार कोणीच करत नाही आणि याच्या उलट काय तर स्वतः जळून इतरांना प्रकाश दिला .ती मोठ्या ऐटीत कोपऱ्यात उभी आहे आणि ती सांगते काय ? 'अरे बाबांनो ,आपण ज्या साठी जन्माला आलेला आहे त्या गोष्टी कष्ट केल्याने भेटतात .हात (पाय ) पसरून भेटतील असं नाही ?'
त्याचा आनंद इतरांना घेऊ द्या आणि पुन्हा शेवटचं एक वाक्य काय??
'  स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास ? आम्हांला कळतंय पण वळतच नाही .
कुणाला म्हणायचं सुखी कोण ?

एवढा सगळा पसारा मांडण्याची गोष्ट म्हणजे आजचा एक चटका लावून गेलेला प्रसंग!!!
 मी तुम्हाला सांगणार आहे .

मित्रांनो आपण सगळे जण घरात बसून आहे पण आजच्या परिस्थितीमध्ये अशा असंख्य घटना घडत आहेत आणि मन सुन्न करत आहे ड्युटीवर असताना आजचा अनुभव मी तुम्हाला सांगतो.
 खरंच खूप मोठा होऊन गेला आणि वाटला रे खरंच आपण सुखी का ??

मित्रांनो आजचा प्रसंग .
काही मजूर चालत घरी निघाले होते .
आठ मुले होती साधारण 20 ते 25 वर्ष वयाची ती मुलं !!
कोणताही हावभाव चेहऱ्यावर नाही .पैसे नाहीत ,खायला काय नाही आणि म्हणून चालत  हजार किलोमीटरचा प्रवास करणार म्हणून निघाली .ठेकेदाराशी संपर्क साधून त्यांच्या पैशाची ,खाण्याची सर्व सोय केली .
 ती म्हणाली ,' काम करण्यासाठी आलोय .'
त्यांना कोणीही पाठवलेलं नव्हतं फक्त पोटाची भूक भागवण्यासाठी येथे आलेले होते .
आई-वडील ,बहीण-भाऊ यांची ओढ !!!
का आलोय याचा कोणताही भाव चेहऱ्यावर नाही ,पैसे कमवायला ???
अरे पण पैसे घेऊन करणार काय ??
ना सुख माहितीये ना दुःख !!
सुख मिळवण्यासाठी दुःख नसेल ??
दुःख आहे आणि सुख म्हणजे काय ?काहीच माहित नाही .
मित्रांनो या दोन गोष्टींची मांडणी तुमच्या लक्षात आली असेल .

त्यामुळे घरात आरामात सोफ्यावर लोळत पडलेली माणसे ज्यांना आज भजी खायचे का समोसा बनवायचे बिर्याणी करायचे या विचारात एकमेकांवर सारखी भांडाभांडी करणारी लोक आणि दुसऱ्या बाजूला घराच्या ओढीने खिशात पैसे नाहीत खायला नाही गाड्या बंद आहेत कसलीही सोय नाही मिळेल तिथे पाणी प्यायचे ,झोपायचे ,खायचे .
लोक मारतील चोर समजून याची कसलीही भिती नाही .
पोलीस पकडतील याची कसलीही तमा नाही .
म मग मला सांगा नक्की सुख म्हणजे काय याची कल्पना तरी त्या मुलांना असणार आहे का ?
आणि आम्हा सुखी माणसांना घरात लोळून दुःख शोधण्यासाठी प्रत्येक गोष्टीत चुका शोधत बसतात .
हा काय म्हणाला ?
ती काय म्हणाली ?
हा काय करतोय ?
ती काय करते ?
तू कोणाशी बोलला ?
तू काय बसली ?
मी का काम करू ?
आणि दुसरीकडे पायात चप्पल नाही ,तोंडात घास नाही,
 खिशात दमडी नाही पण मला घरी जाऊन घरच्यांना भेटायचे  ही इच्छा ?

तेव्हा घरात बसलेल्यांना सोफा व गादीचा कापूस खूपच दबून जाईल आणि आपलं वरती चरबीचा थर वाढेल आणि किरकोळ गोष्टींवरून कसं दुःख मिळेल या विवंचनेत राहणाऱ्या लोकानो जरा जागे व्हा आणि सुख म्हणजे काय याचा शोध घ्या !
भौतिक सुख आणि आत्मिक सुख यात नक्कीच फरक आहे !
भौतिक सुख माणूस पैशाने खरेदी करतो पण आत्मिक सुख खरेदी करण्यासाठी पैसा लागत नाही!
मन लागत ........

सचिन बाजीराव माने
आरफळ सातारा
9881323584

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
खूप सुंदर best luck!!!!!!!
Unknown म्हणाले…
पहिलाच लेख खूप आवडला.
Unknown म्हणाले…
लेख खूप चांगला आहे.
santosh म्हणाले…
लेख छान आहे यामध्ये प्रथम सांगितले ली मेणबत्त्या ची गोष्ट ही अनंत कान्हेटकर याची असून ती दोन मेणबत्या अशी आहे.मला ती 1996 साली 12वीला होती.
लेख खूपच सुंदर वाटलं