शिक्षण : शाळा ते करियर भाग पहिला फक्त पालकांसाठी

शिक्षण : शाळा ते करियर

भाग पहिला
 फक्त पालकांसाठी

 मित्रांनो नमस्कार

 आपल्या मनात रुतलेला काटा म्हणजे आपले भविष्य !!!
कोण ??
 आपली मुले .......
ती मोठी होणार .......त्यांना चांगल्या शाळेत शिक्षण दिले पाहिजे.
 त्यांचे करिअर घडवले पाहिजे आणि शेवटी काय तर त्यांनी सांभाळलं पाहिजे .
 जुनी म्हण तुम्हाला माहीतच आहे, नातू हा आजोबांची काठी असते.
 खरंच आहे का आत्ताचा काळ..........
 आपण पण शेवटपर्यंत विचार कधी करत नाही म्हणजेच काय तर मी  आपण कोणती गोष्ट का ?कशासाठी करतो ?
त्यातून मला काय मिळणार आहे?
 किंवा काय नवीन निर्माण होणार आहे ?
याचा विचार न करता ती गोष्ट करतो.

 म्हणजे आपण पण ज्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक पाहिले पाहिजे तिकडे दुर्लक्ष करतो,
 जिकडे दुर्लक्ष करायचे असते तिथे जाणीवपूर्वक लक्ष देतो.

 दैनंदिन जीवनातले हे उदाहरण आहे,
 आपण सर्व शेतकरी परंतु आपला दृष्टिकोन काय आहे हे सर्वांनाच माहीत आहे.
 माझ्या शेतात काय किती कसं दिसतय?
 याकडे माझं लक्ष कमीच असतो पण शेजारचा कसं करतोय त्याच्याकडे जास्त लक्ष असते. माझा बांध कसा टोकरतोय ?
माझ्या शेतात कसे तण फेकतोय?
 त्याच्यातलं पाणी माझ्या शेतात कसं लोटतोय ?
किंवा त्याला कसं प्रत्युत्तर देणार याकडे आमचे लक्ष असते .
जाऊ द्या मित्रांनो आपला मूळ विषय बाजूला राहायचा
 आपण आपल्या मुलाच्या दृष्टीने शिक्षणाचा विचार कसा करायचा हे तीन प्रकारचे मानसिकतेतून पाहणार आहे

पहिल्या मानसिकतेची लोक मुलांच्या जडणघडणीमध्ये नको इतके जाणीवपूर्वक लक्ष देऊन त्यांना स्वतः घडण्यापासून बाजूला करतात.

 दुसऱ्या मानसिकतेतील लोक मुलगा काय करतोय काय नाही करत त्याची संगत काय आहे तो कसा वागतोय?
 तो कसा शिकतोय ?
याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असणारे लोक त्याचा तो शिकेल असे म्हणतात.

 आणि तिसऱ्या मानसिकतेची लोक आपला मुलगा वेगवेगळ्या पातळीवर कसा पुढे जाईल आणि त्याला मी कसा सपोर्ट करीन यासाठी सतत प्रयत्नशील असतात .

बघा जन्म झाल्यापासून माझा मुलगा कोण होणार याच्या खूप मोठ्या बढाया त्याच्या आई वडील मारत असतात.
आई म्हणते माझा मुलगा पोलीस होणार तर बाबा म्हणतात माझा मुलगा डॉक्टर होणार आणि मग पाळण्यात असल्यापासूनच वकील डॉक्टर पोलीस अधिकारी बनणार यासाठीची धडपड (बडबड )
सुरू असते

जेव्हा मुलगा थोडा मोठा होतो अंगणवाडी जायला लागतो तेव्हा सर्वांनी कौतुक माझा मुलगा छान गाणी म्हणतो गोष्टी म्हणतो.
 जसं शाळेत जायला लागतो तसे अचानक एकदम काय झालं होतं की त्याचं बोलणं बंद करतो.


 मित्रांनो इथेच खरी एक अडचण ????
 आपण लहानपणापासूनच मुलांना कोणत्या शाळेत पाठवणार आहे तो काय शिकणार आहे हे आपणच ठरवतो
हा सर्व ठिकाणी एक फॅडच निघालेले उचल मुलगा टाक इंग्लिश मीडियम शाळेत आणि आमच्या घरी काही तर आम्ही सगळे शेतकरी माणसं आमच्या घरातलं वातावरण काय सर्वजण मराठी म्हणणारे बोलणारे.
 स्वप्न माझा मुलगा शिकून मोठ नोकरी करण्यासाठी अमेरिकेत जाईल यासाठी आम्ही जीवाचं रान करतो.
 पण याची खरंच गरज आहे का?

 कोणीही मुळापासून विचार करत नाही हे छान उदाहरण तुम्हाला देतो,
 पुणे मुंबई ची मुलं तुम्ही पाहिली असतील तर बघा छान हिंदी बोलतात जर त्यांच्या शेजारी एखादी गुजराती कुटुंबा राहणार असेल तर ते गुजराती छान बोलतात जर त्यांच्या शेजारी एखाद्या तामीळ कुटुंब असेल तर तमिळ छान बोलतात.
 याचं कारण काय??
 ठाऊक आहे तुम्हाला त्यांनी कोणता कोर्स केला होता ते कोणत्या शाळेत शिकले ते कोणत्या हिंदी शाळेत शिकले काय नाही!!!
 असं काय झालं की ती तमिळ हिंदी तेलुगू गुजराती कन्नड बोलायला शिकले..
 याचं कारण म्हणजे त्यांचा आजूबाजूचं वातावरण आणि तिथे बोलणारे लोक हे ऐकून ऐकून ती म्हणू शकले.
 आमच्या घरात सगळे मराठी बोलत आम्ही मुलांकडून अपेक्षा काय करतो माझ्या मुलांनी इंग्रजी बोलले पाहिजे इंग्रजी वाचायला पाहिजे.
 बघा आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार ??
पण आम्ही खूप पैसा लावतो काय माझा मुलगा इंग्रजी शिकवा इंग्रजी बोलायला यायला पाहिजे.

 खरंच आपल्या मुलांचे करिअर घडवण्यासाठी लहानपणी आमची चांगल्या शाळेत मुलांना पाठवण्यासाठीची धडपड असते.

 मित्रांनो ज्या वेळेला आपण कोणती गोष्ट मातृभाषेतून शिकतो तेव्हा ती आपल्या पक्की मनामध्ये कोरलेली असते आणि मंग आपले शिक्षण मातृभाषेत असले पाहिजे.
 मग ही मुलं पुढे कधीही धडपडताना दिसत नाहीत .
तुम्ही म्हणाल की मराठी शाळेत शिकलेली म्हणून ऑफिसर डॉक्टर वकील इंजिनिअर झाली नाहीत.

आपलं सर्व शिक्षण मराठी माध्यमातून झाले आपले बरेचसे वर्गमित्र हे डॉक्टर झाले वकील पोलिस अधिकारी झाले आणि तेही जिल्हा परिषद शाळेत ??

 इंग्रजी माध्यमामध्ये शिकलेली मुलं डॉक्टर वकील इंजिनिअर खूप झालेत आणि ती सर्वच मुले चांगल्या कामधंद्याला लागले असे दिसते तुम्हाला ??

मग मगाशीच पडलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगतो.
 कोणता प्रश्न ?
पहिलीत गेल्यानंतर मुल अजिबातच बोलत नाही .
मित्रांनो भाषा हा मुलाचे शिक्षणातील आडसर बनता कामा नये .
आणि म्हणून जी मातृभाषा आहे त्यातून शिक्षण दिले पाहिजे.

 मला पडलेले प्रश्न तुम्हाला सांगतो.
 माझी आजी कधीच कोणत्या शाळेत गेली नाही .
तिला वाचता येत नाही ,
लिहिता येत नाही पण तरीसुद्धा आजही ती एकटी मुंबईला जाऊन पुन्हा माघारी सातारा येते .
तेच जर एखादा दहावी शिकलेल्या एखाद्या मुलाला जर आपण सांगितलं किंवा बारावी शिकणाऱ्या एखाद्या मुलाला सांगितले की हे या ठिकाणी मुंबईला जाऊन तू पुन्हा माघारी सातारला ये.
 येईल का ?
नाही .
 मला प्रश्न पडलेला आहे तुम्हाला याचे उत्तर नक्कीच कळलं असेल.

 काय नक्की घडतं तर  मित्रांनो आजी ही व्यवहारज्ञानाच्या शाळेत शिकली.

 तिला वाचता आला नाही पण  पोहोचता आलं आणि आम्हाला वाचता आलं पण पोहोचता आले नाही .


यासाठीच शेवटचं वाक्य सांगतो आणि थांबतो.

 सर्व पक्षांनी आपल्या पिल्लांचे पंखांमध्ये चैतन्याचे भरलेले आहे आणि आकाशात उंच भरारी घेत आहेत .
माणसांनी आपल्या बाळांना शिक्षणाचे ओझी असणारे डिग्रीचे पंख चिटकवले.
 कशी घेतील मुले भरारी...........


 क्रमशः

सचिन बाजीराव माने
आरफळ सातारा
 98 81 32 35 84

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
खूपच छान लेखमाला आहे .समाजाचे परिवर्तन करणारी लेखमाला आहे .आपणास सदर उपक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
अरुण मोजर म्हणाले…
होय शिक्षण हे मातृभाषेतूनच हवे . तरच ते दर्जेदार आणि आकलन वाढवणारे असेल
Shri Koteshwar Vidyalaya,Gove म्हणाले…
सर अप्रतिम लेख !!! आपणास लेखनाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा - उवाळे सर (ल्हासुर्णे )