अष्टावधानी बुद्धिमत्ता
शिक्षण : शाळा ते करिअर
अष्टावधानी बुद्धिमत्ता
भाग सातवा
मित्रांनो आज आपण मुलांच्या बुद्धिमत्तेवर विशेष विचार चिंतन मनन करून आपला मुलगा जीवनात कसा यशस्वी होईल याचा पाया घालण्यासाठीचा हा भाग आहे .
मित्रांनो निसर्गात कमी अधिक प्रमाणात सर्वच प्राणी शक्तिमान आहेत. कोणाकडे अवाढव्य शरीर आहे ,तर कोणाकडे टोकदार दात आहेत. प्रत्येक प्राणी हा वेगळा आहे. यांमध्ये माणूस हा मात्र निराळा प्राणी आहे, कारण माणसाकडे मेंदू आहे .
मेंदूमध्ये असणारी एक विशेष क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता . मेंदूच्या आधारे आपण वेगळे काम सोप्या पद्धतीने करतो .आपला मेंदू हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे आणि त्यामध्ये अनेक विविध प्रकारच्या विशेष क्षमता असतात .जीवनाशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये चाकाच्या शोधा पासून ते कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा शोध माणूस हा केवळ बुद्धीच्या साह्याने करू शकला.
मेंदू शेकडो प्रकारची कामे करतो . मुलांनी जीवनात यशस्वी व्हावे. आपल्या पायावर उभं राहावं यासाठी पालक मुलांना शाळेत घालतात. शिक्षण देण्याचा हा एक उद्देश असतो, परंतु मला सामाजिक व्हावा यासाठी शाळा असते .शाळेत शिकायचं खेळायचं दरवर्षी नवीन इयत्तेत जायचं यात मुला-मुलींनी यशस्वी व्हावं लागतं .
परंतु बुद्धीही अशी संकुचित नाही. तिला अनेक आयाम आहेत. ते फक्त शाळेतील विषयांवर जमत नाही ? फक्त पुस्तकात असते असं नाही ! तर ती सर्वत्र वापरावे लागते. मात्र सर्व पालकांनी या बुद्धिमत्तेला एकाच ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला आणि परीक्षा भोवती सगळे घुटमळत राहिले .
परीक्षा ही आजच्या काळासाठी महत्त्वाचे आहे हे जरी मान्य असलं तरी ते एका मर्यादेपर्यंतच ठीक आहे. शाळांनी बोर्डाने परीक्षा घेतली आणि त्यात पास झालं किंवा त्यात पहिला नंबर मिळाला म्हणजेच बुद्धिवान असा त्याचा अर्थ होत नाही. यातून मेंदूच्या एकच क्षमतेला आपण जोखतो.
मित्रांनो आपण पाहिलं की मुलगा सहा वर्षाचा झाला की शाळेत जायला शिकतो. शाळेत वेगवेगळे विषय शिकायचे .दरवर्षी नवीन इयत्तेत जायचं आणि यात मुलांनी यशस्वी व्हायचं . म्हणजे काय तर माझा मुलगा वर्गात पहिला यायला पाहिजे . तरीसुद्धा वर्गातील सगळी मुलं वर्गात पहिली येतात का ? असं का होतं ?
हे सगळं होत असताना मुलाला मदत करते ती म्हणजे त्याची बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता म्हणजे आपोआप मुलांच्या मेंदूत उगवलेली जादूची गोष्ट नसते . तर आपण पहिल्या भागापासून चर्चा करतोय की मुलाचं त्याच्या आजूबाजूचे प्रसंग अनुभव विविध गोष्टी उपक्रम खेळ यातून अनुभवांच्या जोरावर मुलाच्या मेंदूमध्ये वायरिंगची जोडणी सुरू असते जितकी जास्त मुलांच्या अनुभवांची जोडणी मेंदूमध्ये घडत राहील तितका जास्त मुलगा हुशार होईल असं साध्या भाषेत आपण समजून घेतलं.
मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहे ती म्हणजे आपण लहानपणी ठरवतो की माझा मुलगा डॉक्टर होणार आहे किंवा वकील होणार आहे किंवा इंजिनियर होणार आहे, परंतु जी गोष्ट आपण लहानपणी मुलाच्या जन्मानंतर ठरवतो तसंच आयुष्यात घडते का? नाही ना ??? पण तरीसुद्धा आपण प्रत्येक मुलांकडून अपेक्षा करतो की माझा मुलगा हुशार असावा परंतु तो हुशार होईल आणि आयुष्याच्या शेवटी यशस्वी होईल .नाही ?? असं का घडतं??
मुलांना जर आपल्याला हुशार करायचा असेल त्याची हुशारी सगळ्या बाजूने फुलवायची असेल ,त्याला केवळ पास-नापास आणि वेगवेगळ्या गुणांमध्ये पहिला यायचा असेल स्पर्धेत पहिले यायचं असेल असा आपला ठासून भरलेला जो अंधविश्वास असतो ! तो अंधविश्वास आपण आता विसरायला पाहिजे . मुलांना आयुष्याच्या परीक्षेमध्ये सामोरं जाण्यासाठी कोणतेही दडपण मुलांवर द्यायचं नाही आपण पहिल्या प्रमाणेच मुलांच्या अनुभव घेण्याच्या गोष्टींमध्ये हे अडथळे निर्माण करायचे नाहीत हे करू नको ते करू नको असं करू नको तसं करू नको त्याच्याशी बोलू नको त्याच्याशी बोलू नको बाहेर जाऊ नको घरात येऊ नको टीव्ही बघू नको असे नको असणाऱ्या गोष्टी बंद करून त्याला हव्या असणाऱ्या गोष्टी जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्याची संधी आव्हान मुलांना दिली पाहिजेत जेणेकरून त्यांच्या मेंदूमध्ये वायरिंगची जोडणी अधिक बरोबर होऊन मुलगा हुशार बनेल
एक छोटे उदाहरण पाहूया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो सचिन तेंडुलकर हा जगातील विश्वविक्रम करणारा एक क्रिकेटर बनतो हा सचिन वयाच्या 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर क्रिकेटर होत नाही तर सचिनच्या हातामध्ये वयाच्या तिसऱ्या वर्षी येते आणि त्याचे वडील त्याला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन देत असतात मैदानावर नेतात त्याला हवे ते क्रिकेटचे सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देतात तेव्हा सचिन तेंडुलकर क्रिकेटर बनतो .
मित्रांनो आपण आपला मुलगा डॉक्टर होईल असे लहानपणी विचार करतो मग मला सांगा आपण मुलाच्या हातात काय देतो कुरकुरे बिस्कीट चॉकलेट आणि अपेक्षा काय आपली बघा !!! मग आता मला सांगा आपण ठरवू ते आपली मुलं होणार नसतील तर आपला अट्टाहास मुलांच्या मागे का असावा की
तू सगळ्या स्पर्धेमध्ये पहिल्याच नंबर मिळवायचा !
तू सगळ्या खेळाच्या स्पर्धांमध्ये पहिला नंबर मिळवायचा !
तू चित्रकलेच्या स्पर्धेत सुद्धा पहिला नंबर मिळवायचा आणि पोहण्याच्या स्पर्धेत सुद्धा पहिला नंबर मिळवायचा.
घराच्या बाहेर जायचं नाही, मुलांशी खेळायचं नाही ,टीव्ही पहायचा नाही, मोबाईल वर काहीच बघायचं नाही , गाणी ऐकायची नाहीत ही असे अनेक बंधन आपण मुलांना घालतो आणि मुलांकडून खूप मोठ्या मोठ्या अपेक्षा ठेवतो.
मित्रांनो जर आपण मनातून मनापासून असा जर विचार केला तर खरंच आपली मुलं हुशार घडतील का? मग आता मला सांगा हे असं का होत नाही याचं कारण आहे माणसांच्या मेंदूमध्ये वेगवेगळे अनुभव घेत असतो त्यानुसार त्याची बुद्धिमत्ता ठरते आणि जगातील शास्त्रज्ञांनी अनेक सिद्धांत मांडून कोणत्याही मनुष्यप्राण्याची बुद्धिमत्ता ही एकाच प्रकाराने दिसत नाही प्रत्येक मेंदूची रचना वेगळी असते आणि या बुद्धिमत्तेचे एकूण आठ प्रकार जगात पडलेले आहेत .
डॉ. हॉवर्ड गार्डनर यांनी सांगितलेल्या आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता पुढील प्रमाणे
1) भाषिक बुद्धिमत्ता ,
2)गणिती बुद्धिमत्ता ,
3) संगीतविषयक बुद्धिमत्ता ,
4)निसर्गविषयक बुद्धिमत्ता ,
5)शारीरिक बुद्धिमत्ता ,
6)अंतर व्यक्ती बुद्धिमत्ता ,
7)व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता ,
8) दृश्य अवकाशीय बुद्धिमत्ता .
या आठ प्रकारांपैकी प्रत्येकात दोन ते तीन प्रकारच्या बुद्धिमत्ता दिसून येतात .आता तुम्ही म्हणाल हे नवीन काय? याच नवीन विषयाचा अभ्यास आणि त्याची मांडणी आपण सुरु करत आहोत .काही मुलं अतिशय चांगली लिहितात ,भाषण करतात, तर काही मुले अतिशय सुंदर चित्र काढतात ,काही मुलं स्वतःची संवाद साधतात, त्याचबरोबर कोणी म्हातारा दिसेल तर म्हाताऱ्या माणसांचा बरोबर गप्पा मारतात तर काही मुलं आपल्या वयापेक्षा मोठे मुलांशी गप्पा सुद्धा मारतात तर आपल्या वयापेक्षा लहान मुलांची सुद्धा गप्पा मारणारी मुले आहेत त्यांची बुद्धिमत्ता कोणत्या प्रकारची ?
अशा प्रकारच्या आठ बुद्धिमत्ता यांचा आपण विचार करून आपल्या मुलांना त्या त्या बुद्धिमत्तेचे मध्ये येणारे जास्तीत जास्त अनुभव आव्हाने संधी जर मुलांना दिल्या तर सचिन तेंडुलकर , मेरीकोम ,आशिष मोरे, रोहित पवार, विश्वास नांगरे पाटील, भूषण गगराणी ,शशिकांत धोत्रे ,राजीव खांडेकर ,गणेश चंदनशिवे ,रेमो डिसूजा, सनी हिंदुस्तानी यांच्यासारखीच आपली मुले जीवनामध्ये नक्की यशस्वी होतील
यासाठीच आपल्या मुलांमध्ये कोणत्या बुद्धीमत्ता आहे आणि त्यासाठी आपण मुलांना जास्तीत जास्त तसे अनुभव देऊन मुलांना त्या त्या क्षेत्रामध्ये आयुष्यात यशस्वी करण्यासाठी भरारी देऊया या भरारी साठीचा हा भाग पुढे चालू राहील .पुढील भागात भाषिक बुद्धिमत्ता म्हणजे काय हे पाहणार आहोत .
क्रमशः
सचिन बाजीराव माने
आरफळ सातारा
98 81 32 35 84
टिप्पण्या
बौध्दिकतेबरोबर कृतीही हवी .