शिक्षण : शाळा ते करिअर भाग आठवा पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी

शिक्षण : शाळा ते करिअर 

भाग आठवा

 पालक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी


नसेल वाचला तर नक्की वाचा भाग सातवा 



                    मित्रांनो सातव्या भागामध्ये आपण मनुष्यमध्ये  असणाऱ्या बुद्धिमत्तेचे आठ प्रकार पाहिले. या आठ प्रकारांपैकी पहिला प्रकार म्हणजे भाषिक बुद्धिमत्ता !!या प्रत्येक बुद्धिमत्ता बद्दल आपण सविस्तर माहिती समजून घेऊया. मित्रांनो कोणाचे बुद्धिमत्ता एका साच्यात नसते. आपलं मूल नक्की कशात हुशार आहे हे शोधलं आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव दिले तर कदाचित यातून मुलांच्या करिअरची वाट आपणास स्पष्ट दिसते. म्हणून आपण प्रत्येक बुद्धिमत्ता समजून घेतली पाहिजे. मित्रांनो आपला मुलगा मोठेपणी कोण होणार हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज लागणार नाही .मूल  घडवणं हे माझ्या हातात आहे .


                   चला तर भाषिक बुद्धिमत्ता म्हणजे काय हे आपण पाहूया..... मित्रांनो 3 उदाहरण आपण पाहणार आहे यामध्ये बऱ्याच मुलांविषयीची आपण हे उदाहरण देत असतो.



 त्यातील पहिले उदाहरण म्हणजे माझ्या मुलीला पुस्तक वाचायला खूप आवडतं. कोणतही पुस्तक असलं तरी ती वाचत असतेच. मग समोर मित्र-मैत्रिणी खेळत असले तरी तिचं लक्ष त्या पुस्तकात असत.

        दुसरे उदाहरण पाहूया माझ्या मुलाला वर्गात शिक्षक नेहमीच गोष्ट सांगायला उभे  करतात. वक्तृत्व स्पर्धेतही बक्षीस मिळवतो.


 आणि तिसरा उदाहरण पाहूया आमच्या शेजारचा मुलगा पाचवीत आहे. पण तू रोजचा पेपर तर वाचतोच शिवाय त्यातला शब्दकोडे आवडीने सोडवतो.



                मित्रांनो ही तीन उदाहरणे पाहिली असतील तर या तिन्ही उदाहरणांमध्ये या मुलांना भाषा विषयाची खूप आवड दिसते. या सर्वांमध्ये भाषिक बुद्धिमत्ता असते असे आपल्याला म्हणता येईल. ही भाषिक बुद्धिमत्ता आपोआप विकसित होत नाही मित्रांनो आपल्या मेंदूमध्ये विविध क्षेत्र असतात आणि प्रत्येक क्षेत्र स्वतंत्रपणे आणि तरीही इतर क्षेत्रांशी जुळवून घेऊन आपलं काम करत असतं. मेंदूमध्ये भाषेचे क्षेत्र असते या क्षेत्रामध्ये सतत काही ना काही चाललेलं असतं .इतरांचे बोलणे ऐकणे ते समजून घेणे, मनातले विचार शब्दांत सांगणं ,मांडणं ,वाचनाचा छंद असणार अशा वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. काही जणांच्या मेंदूमध्ये ही भाषा खूपच प्रभावीपणे काम करत असतं म्हणजे असं की सगळीच माणसं मनाशी संवाद करत असतात .काही लिहित असतात. काही वाचत असतात. पण काहीच वाचन आणि संभाषण साधन या तिन्ही गोष्टी चांगले असतात.



               मित्रांनो हे घडतं कसं तर लहानपणापासूनच मुलांची विविध क्षेत्र विकसित होत असतात हे आपण पाहिलं. हे होत असताना मुलांना जसे आपण अनुभव देऊ तसे मुले घडतात. म्हणजेच मुलं जितके जास्त अनुभव इतरांचं बोलणं ऐकतील तितका मुलांचा भाषा विकास समृद्ध होत जाईल. यामध्ये आपण पाहिलं होतं की लहानपणापासूनच मुलांना आपण जर वेगवेगळ्या वस्तूंची नावं, शब्द दररोज मुलांना पाच शब्द लहानपणापासूनच दाखवले सांगितले तर मुलं तो शब्द लक्षात ठेवतात त्या वस्तू संदर्भातील शब्द लक्षात ठेवतात .आठवड्याला मुलांचे पस्तीस शब्द तयार होतात. अशाप्रकारे वर्षाचे जवळजवळ एक हजाराच्या वर शब्द तयार होतात आणि सहा वर्षांपर्यंत मुलाचे जवळजवळ तीन ते चार हजार शब्द तयार होत असतात .जर असा शब्द सम्राट मुलगा शाळेत आला तर नक्कीच त्याचा भाषाविकास समृद्ध झालेला दिसेल. यामधून अशी मुलं इतरांशी बोलताना संवाद साधताना किंवा एवढेच काहीतरी भाषण करताना ही अडखळत नाहीत ,थांबत नाहीत. बघा आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येईल.



              मित्रांनो जितके भाषा संदर्भातील शब्दसंपत्ती विद्यार्थ्यांकडे जास्त असेल तितका तो मुलगा वाचन करेल ,लिहील आणि इतरांबरोबर संवाद सुद्धा चालेल. 
  • यासाठी मुलांबरोबर सतत बोलले पाहिजे ,
  • त्यांनी नेहमी टीव्हीवरील बातम्या, 
  • विविध प्रसंग ऐकले पाहिजेत, 
  • वेगवेगळे कार्यक्रम पाहिले पाहिजेत ,
  • वक्तृत्व स्पर्धा असेल तर त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे 
  •  भाषणांचे कार्यक्रम ,कीर्तन, प्रवचन हे सतत ऐकलं पाहिजे, 
  • संवाद नाटक पहिले पाहिजेत, ऐकलं पाहिजे ,


                 मित्रांनो मुलाचा कान तयार होईल तितका मुलांचा भाषा विकास जास्त तयार होईल. आता कान तयार होईल याचा अर्थ तुम्हाला समजला असेल .म्हणून भाषाविकास समृद्ध करण्यासाठी आपण जास्तीत जास्त मुलांना बोलण्याची ऐकण्याची इतरांशी संवाद साधण्याची संधी दिली पाहिजे .

buy language books

              आता संवाद वरून छान उदाहरण .... रवींद्रनाथ टागोर यांच्या घरामध्ये इकडून तिकडे फिरत होते अशाच त्यांच्या घराच्या बाहेरून लांब वरून त्यांना कानावरती आवाज येत होता. "ये राणी ऊठ ना, चल , आता अंधार पडत चालला आहे ,जायचे आपणास, घरी चल, घरी जाऊया."  हा संवाद ऐकल्यानंतर वाटलं असेल वेगळेच कोणतरी दिसते .म्हणून त्यांनी घराच्या बाल्कनीतून बाहेर डोकावलं तर नदीच्या किनारी गवतावर एक म्हैस बसलेली होती आणि तिचा गुराखी तिच्याशी बोलत होता. मित्रांनो संवाद साधण्यासाठी फक्त आपणासमोर माणसेच असावीत असे नाही तर आपण वस्तुंशी, प्राण्यांशी, माणसांशी कोणाशीही संवाद साधता यायला पाहिजे.



               भाषा समृद्ध करणारा भाग म्हणजे 
  •  शब्द कोडी सोडवणे ,
  • भाषण स्पर्धेत भाग घेणे ,
  • मुलांना जास्तीत जास्त पुस्तके वाचायला देणे ,
  • यामध्ये बघा सकाळ बालमित्र पुरवणी येत असते ही पुरवणी मुलांना सोडवायला देणे, वाचायला सांगणे, 
  • त्याच बरोबर वेगवेगळे  व्याख्यान, कीर्तने, प्रवचने येथे मुलांना घेऊन जाणे.
  •  टीव्हीवरील रेडिओवरील बातम्या ऐकणे . 
  • त्यांना दररोज दैनंदिनी लिहायला सांगणे .
  • दैनंदिनी म्हणजे दररोज काय करतो किंवा वेगवेगळे प्रसंग अनुभव आपणास दररोज दिसतात ते स्वतः डायरीमध्ये लिहिणे. 
               
             अशा गोष्टी केल्यामुळे मूल भाषा विकासात समृद्ध होत जाते .ह्यासाठी मुलाची निरीक्षण शक्ती अफाट असली पाहिजे .म्हणजे मुलांना आपण या गोष्टी सांगितल्या पाहिजेत की जाताना-येताना जाणीवपूर्वक एखादा प्रसंग पाहायचा .त्यामुळे नक्की काय घडतंय हे लक्षात ठेवायचं आणि तो प्रसंग लिहायचा .



              मित्रांनो भाषाविकास फक्त कार्ड दाखवून ऐकून लिहून होणार नाही तर जाणीवपूर्वक आपण वर्तमानपत्र किंवा एवढेच काय तर आपण बाजारातून आणलेल्या पिशव्या त्यावर लिहिलेले शब्द वाक्य सतत वाचणे किंवा दुकानांच्या पाट्या वाचणे,वेगवेगळे बोर्ड वाचणे, ते लक्षात ठेवणे ,वेगवेगळ्या गोष्टी वाचणे  अशाने मुलांचा भाषा विकास समृद्ध होण्यासाठी निश्चित मदत होईल. 

  
              भाषा समृद्ध झाल्यानंतर मोठेपणी ही मूलं कोण होत असतील ??? ज्या मुलांचा भाषा विकास समृद्ध होतो ती शिक्षक, लेखक ,कवी ,पत्रकार, स्क्रिप्ट राईटर ,निवेदक, वक्ते ,चित्रपट कथाकार ,मालिकांची कथालेखक, संपादक म्हणून प्रसिद्ध होतात अशा विविध करियरच्या संधी मुलांना मिळतात.
 
              .या सर्व माणसांमध्ये भाषेत बुद्धिमत्ता असते .मित्रांनो आपल्या मुलांमध्ये ही भाषिक बुद्धिमत्ता आहे का ? या प्रश्नाचे उत्तर शोधा. 

  1. आपलं मूल प्रभावीपणे बोलतो का? 
  2. त्याला वर्गासमोर येऊन बोलण्याची भीती वाटते का ?
  3.  त्याला पुस्तक वाचायला आवडतात का ? 
  4. मनापासून वाचायला आवडतं का ?
  5. लिहायला कंटाळा तर करत नाही ना?  
  6. स्वतःहून कधी गाणी गोष्टी लिहिल्या आहेत का ? 

अशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला मुलांचा कल सांगतील.


जर मुलांना आपणास घडवायचे असेल तर आपण लहानपणापासून भाषिक अनुभव देऊया.






 क्रमशः 
मित्रांनो पाने फुले झाडे , पक्षी ,प्राणी, डोंगर, किल्ले ,नद्या, समुद्र पहायला ,निरीक्षण करायला, आनंद घ्यायला, लिहायला ,वाचायला आवडतं तर निसर्ग संबंधी असणाऱ्या निसर्गविषयक बुद्धिमत्तेची माहिती घेणारा आणि त्यातील करिअरच्या संधी सांगणारा आजचा लेख नक्की वाचा .

Yes ! I can !!!
या ब्लॉग वरील 



सचिन बाजीराव माने
आरफळ सातारा 
98 81 32 35 84

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
खूप छान लेख प्रसिद्ध होत आहेत,यामधून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतायत.,������
अरुण मोजर म्हणाले…
लेख अतिशय छान आहे . माहिती उपयुक्त आहे . हि काहि गोष्ट नाही ऐकली विसरली वाचली सोडून दिली .
हे मर्म आहे मुलांना ओळखण्याचे मुलाच्या गुणांना हेरुन जाणीवपूर्वक त्याच्या वाढीसाठी प्रयत्न करण्याचे .