निसर्गविषयक बुद्धिमत्ता
शिक्षण : शाळा ते करिअर
भाग नववा
पालक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी
निसर्गविषयक बुद्धिमत्ता
मित्रांनो डॉ.हावर्ड गार्डनर यांनी सांगितलेल्या सिद्धांताप्रमाणे बुद्धिमत्तेचे आठ प्रकार असतात. या आठ प्रकारांपैकी आपण भाषिक बुद्धिमत्ता म्हणजे काय ते पाहिलं आणि आपल्या मुलांमध्ये भाषिक बुद्धिमत्तेचे संदर्भातील कोण कोणत्या गोष्टी आहेत हे जाणलं असेल .
मित्रांनो ही गोष्ट आहे मुंबई मधील खेतवाडी येथे एका मुस्लिम कुटुंबात जन्माला आलेल्या मुलाची .मित्रांनो सर्वांनाच भेटवस्तू मिळत असतात तसेच या मुलाला लहानपणी छऱ्याची बंदूक भेट मिळाली होती .हा मुलगा आपल्या मुलांसारखंच लहानपणी बंदुकीने अनेक चिमण्या टिपायचा हा त्याचा छंद होता. एके दिवशी मात्र एक विचित्र घटना घडते. हा मुलगा नेहमीप्रमाणे चिमण्या टिपायला गेला असताना त्या टिपलेले चिमण्या मध्ये त्याला एका चिमणीच्या गळ्याभोवती एक पिवळ्या रंगाचा ठिपका दिसतो. म्हणजेच इतर चिमणीपेक्षा ही चिमणी दिसायला वेगळे आहे आणि त्या मुलांमध्ये या चिमणी विषयी ची उत्सुकता ताणली जाते .
चिमणी घेऊन आपल्या मामाकडे जातो .चिमणी विषयी विचारतो .मात्र आपण जसे आपल्या मुलांबरोबर वागतो म्हणजे मला माहीत नाही ,जा निघ, माझ्यासमोर थांबू नको, मला असले प्रश्न विचारू नको . असे न म्हणता हा मामा आपल्या भाच्याला घेऊन थेट बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संचालकांकडे जातो. तेथे गेल्यानंतर त्या सोसायटीमधील संचालक या मुलाला तेथे भूशामध्ये भरलेले वेगवेगळे पक्षी दाखवतात . त्याचप्रमाणे या पिवळ्या रंगाच्या त्या चिमणी विषयी माहिती देतात .
मित्रांनो ही गोष्ट आहे 1900 ते 1910 सालातली. मित्रांनो जर या मुलाच्या मामांनी त्याचे कुतूहल मला माहीत नाही जा.... तुझे तू बघ .... असे सांगून जाणून घ्यायचा दरवाजा बंद केला असता तर आज भारतातील पहिले पक्षी शास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर सलीम अली यांची ओळख झाली नसती.
म्हणून आपण वारंवार असे सांगत आहे की मुलांना समजून घेऊया आणि मुलांमध्ये कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे हे समजून त्यांना त्या संदर्भातील विविध अनुभवांच्या आधारे मुलांच्या मेंदूमध्ये असणाऱ्या निसर्गविषयक बुद्धिमत्तेला खतपाणी घालू या .
मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच निसर्ग विषयाची ओढ असते आणि म्हणून आज आपण पाहणार आहे निसर्गविषयक बुद्धिमत्ता .मुलांचा ओढा लहानपणापासूनच निसर्गाकडे असतो .त्यांना डोंगर चढायला, किल्ले पालथे घालायला, नदी किंवा समुद्रात डुंबायला खूप आवडतं .अगदी छोट्या मुलांना तर प्राणी पक्षांकडे बघायला ,त्यांच्या अंगावर हात फिरवायला, त्यांच्याशी खेळायला खूप आवडतं किंवा त्यांना खायला द्यायला सुद्धा ही मुलं अतिशय आनंदाने काम करतात .त्यांना स्वतः ला भूक लागू दे नाहीतर तहान लागू दे ती या प्राण्यांबरोबरच खेळत असतात.एवढेच काय तर जिथे जिथे जातील तिथे तिथे असणाऱ्या प्राण्यांवर ती कुत्र्या मांजरांचा वरती मनापासून प्रेम करतात .त्यांच्याबरोबर आलेल्या मित्र-मैत्रिणी किंवा टीव्ही हे सगळं सोडून प्राण्यांच्या जवळ घोटाळत असतात . या मुलांमध्ये निश्चितच निसर्गविषयक बुद्धिमत्ता असणार हे नक्की .
मित्रांनो पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे यांची गोष्ट सर्वांना माहितीच असेल. सुरुवातीला भामरागड येथील हेमलकसा येथे जेव्हा त्यांनी आदिवासी लोकांच्या साठी काम सुरू केले. तेव्हा हे आदिवासी लोक पोटासाठी प्राण्यांना मारून शिकार करून खायचे .असेच एकदा आदिवासी एका माकडाला मारून घेऊन निघालेले होते. परंतु ते मादी जातीचे माकड त्याच्यासोबत त्याचे पिल्लू सुद्धा होतं आणि पिल्लू दुधाच्या भुकेने व्याकूळ झालेलं होतं .तेव्हा प्रकाश आमटे यांनी आपल्या जवळचा तांदूळ या आदिवासी लोकांना देऊन त्या पिल्लाची सुटका केली आणि तेव्हापासूनच त्यांनी अडचणीत असणारे प्राण्यांना जखमी प्राण्यांना उपचार करून त्यांच्या घरातच ठेवलं. पुढे साप ,अजगर , वाघ, मगर, घुबड असे अनेक हिंस्र प्राणी त्यांच्या घरांमधून राहू लागले आणि अशा प्राण्यांचं आमटे ऍनिमल आर्क सुरू झालं . खालील लिंक ला टच करा आणि पहा प्रकाश आमटे या अवलियाला.
आपण सगळे बागेत खेळायला मुलांना घेऊन जातो. तिथे सगळीच मुलं खेळण्यात दंग असतात मात्र काही एखादी दुसरी असतात की झाडाकडे बघतात झाडांच्या पानांचे फुलांचे निरीक्षण करतात किंवा अशी मुलं वाळलेल्या पानांमध्ये छोट्याशा काड्यांमध्ये सौंदर्य शोधतात .अगदीच काय ढगांमध्ये सुद्धा त्यांना प्राणी दिसायला लागतात. समुद्र किंवा नदीवर खेळताना सापडलेले शंखशिंपले ती जपून घरी आणतात आणि त्यापासून नक्षीकाम करतात . अशा मुलांमध्ये निसर्गविषयक बुद्धिमत्ता असते .
मित्रांनो असंच एक उदाहरण म्हणजे डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनाही ही झाडांना सुद्धा भावना असतात संवेदना असतात असा शोध लावणारे भारतीय शास्त्रज्ञ. हे लहानपणी आपल्या आपल्या आईला नेहमी प्रश्न विचारायचे," आई सगळ्या झाडांना एकाच वेळी का फळ येत नाहीत किंवा एका झाडाची पाने हिरवी तर दुसऱ्या झाडाची पाने तांबड्या रंगाची का असतात ?" अशा अनेकविध प्रश्न विचारून भंडावून सोडायचे .निसर्गाचे निरीक्षण करायचे आणि झाडांना सुद्धा भावना असते हे त्यांना दिसून आले आपणा सर्वांना माहीतच आहे लाजाळूच्या झाडाला स्पर्श केला असता त्याची पाने मिटतात . यावरून वनस्पतींना सुद्धा संवेदना असते हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.
मित्रांनो डोंगरावर चढायला ,किल्ल्यावरती जायला तेथे निसर्गाचे निरीक्षण करायला खूप आवडतं .गो नी दांडेकर यांना दुर्गप्रेमी असे म्हणतात. ते सुद्धा लहानपणापासूनच निसर्गाची आवड असणारे होते . ताना डोंगर किल्ल्यांवर जाऊन तिथं निरीक्षण करून झाडांविषयी किल्ल्यांविषयी अफाट माहिती कोकणातील निसर्ग वर्णन पाहिले गोळा केले आणि पुस्तक लिहिले आपल्या मुलांना अशी आवड आहे का ?
मित्रांनो आपण सगळे जण टीव्ही पाहतो परंतु सगळ्यांनाच डिस्कवरी चॅनेल आवडतोच असे नाही .आता डिस्कव्हरी चॅनेल च नाव काढलं तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल ते म्हणजे बियर ग्रिल्स याचा ' मॅन वर्सेस वाईल्ड ' हा कार्यक्रम .
या कार्यक्रमांमध्ये बियर ग्रिल्स हा निसर्गातच राहणारा माणूस आहे निसर्गावर प्रेम करणारा प्राणी-पक्षी यांचे निरीक्षण करणारा हा ब्रेड ग्रिल्स एका दिवसात जगप्रसिद्ध झाला नाही त्यालासुद्धा निसर्गाची खूप आवड होती आणि म्हणून तो निसर्गातील धाडसी काम करून प्राणी पक्षी डोंगर निर्णय प्रदेश आपणास पाहता येतात निरीक्षण करता येतं माहिती मिळते .
एवढेच काय तर मित्रांनो आपल्या खानदेशातील बहिणाबाई चौधरी या कोणत्या शाळेत गेले नाहीत परंतु निसर्गाचं वर्णन करणाऱ्या अतिशय सुंदर मनाला भावणाऱ्या कविता गाणी त्यांनी लिहिल्या
- मित्रांनो निसर्गाची आवड असणाऱ्या मुलांना खेळण्यापेक्षा किंवा वाचन करण्यापेक्षा निसर्गातच रमायला जास्त आवडतं.
- त्यांना चार भिंती मध्ये बसायला राहायला आवडत नाही .
- आपल्या घराला अंगण असावं त्यांना अंगणामध्ये किंवा कुंडीमध्ये रोपे लावावीत असं वाटत असतं .
- जर अशा गोष्टींची त्यांना जास्त आवड असेल तर त्यांच्यामध्ये निसर्गविषयक बुद्धिमत्ता आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्यातल्या निसर्गविषयक बुद्धिमत्तेला आपण प्रोत्साहन देऊन त्यांच्यामध्ये असणाऱ्या मेंदूतील निसर्गविषयक बुद्धिमत्तेच्या वायरिंग जोडणी आपण जास्तीत जास्त आव्हाने संधी देऊन केली पाहिजे.
यासाठीच्या काही कृती बघूया या मुलांना आकाश निसर्ग तारे यांच्याविषयी वाचन व्हिडिओ किंवा स्वतः निरीक्षण करून त्यांच्या नोंदी ठेवणे .
- त्याचप्रमाणे निसर्गातल्या विविध घटकांविषयी सादर होणारे कार्यक्रम म्हणजेच डिस्कवरी चैनल बघणे किंवा इतर चॅनेल पाहणे .
- संधी मिळेल त्या त्या वेळेला मुलांना निसर्गात फिरायला नेणे
- सहलीला घेऊन जाणे
- डोंगर टेकड्या किल्ले येथे नेऊन तेथील विविध गोष्टींचे निरीक्षण करायला लावणे.
- शक्य असल्यास तर छोट्या वस्तू प्राणी पक्षी कीटक यांचे निरीक्षण करण्यासाठी त्यांना भिंग किंवा मायक्रोस्कोप आणून देणे.
या प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टींनी मुलं निश्चितच निसर्ग विषयक करिअरच्या संधी त्यांना सापडतील म्हणजेच मुलं
- गिर्यारोहक,
- गाईड,
- पक्षी शास्त्रज्ञ ,
- प्राणी शास्त्रज्ञ,
- पक्षी प्राणी निसर्ग यांचं छायाचित्रण करणारे छायाचित्रकार म्हणजेच फोटोग्राफर ,
- दुर्गप्रेमी ,
- वनस्पतीशास्त्रज्ञ
बनतील अशा संधी आपण मुलांना उपलब्ध करून देऊ या.
क्रमश:
सचिन बाजीराव माने
आरफळ सातारा
98 81 32 35 84






टिप्पण्या