शिक्षण : शाळा ते करिअर भाग दहावा मुल घडवताना पालक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी
शिक्षण : शाळा ते करिअर
भाग दहावा
मुल घडवताना
पालक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी
मित्रांनो गोष्ट आहे भारतातील तामिळनाडू राज्यातील जन्मलेल्या इरोड गावातील मुलाची .लहानपणापासूनच या मुलाचा विकास हा सामान्य मुलांसारखा नव्हता. तीन वर्षेपर्यंत त्या मुलाला बोलता येत नव्हतं . घरामध्ये चिंता होती की हा मुलगा मुका आहे की काय ?त्याला शाळेत प्रवेश मिळाला इतर मुलांसारखा शिकू शकत नव्हता. त्याचं मन सुद्धा लागत नव्हतं. परंतु या मुलाला सारखे काहीतरी प्रश्न विचारायचे आणि सरांना भंडावून सोडायचं. या मुलाचे प्रश्न होते- पृथ्वीवर ती पहिला पुरुष कोण होता ? पृथ्वी आणि ढग यांच्यामध्ये किती अंतर आहे? असे अनेक विविध प्रश्न विचारून सर्वांना हैरान करायचा .जेव्हा बघेल तेव्हा गणित सोडवायचं .गणिताविषयी त्याला खूप प्रेम होते .मात्र इतर विषयांवर त्याचा अजिबात लक्ष नव्हतं. हा मुलगा पुढे हायस्कूल गेला आणि अकरावीत असताना गणित सोडून सर्व विषयात नापास झाला. त्याच्या डोक्यात सतत गणित असायची झोपला तरी तो प्रमेय उदाहरण सोडवत असायचा.हाच मुलगा मोठा होऊन प्रसिद्ध गणित तज्ञ बनतो .
या मुलाचं नाव आहे श्रीनिवास रामानुजन .रामानुजन पुढे गणितात हुशार असल्यामुळे प्रोफेसर हार्डी या गुरूच्या मदतीने 3584 प्रमेय तयार करतो. या प्रयोगांना रामानुजन जर्नल ,रामानुजन थिटा फलन ,कृत्रिम प्रमेय ,रामानुजन योग असे सर्वांना चकित करणारे गणितातील शोध लावून आपली असामान्य बुद्धिमत्ता संपूर्ण जगाला दाखवतो .आजही भल्याभल्यांना रामानुजन मांडलेली प्रमेय सोडवता येत नाहीत.
मित्रांनो या भागांमध्ये आपण गणिती बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि आपल्या मुलांमध्ये गणिती बुद्धिमत्ता आहे का हे पाहणार आहोत.काही मुलांना दुकानात किंवा बाजारात गेल्यावर पटापट आकडेमोड करायला येते .त्यांना वही पेन्सिल कॅल्क्युलेटर कशाचीही गरज भासत नाही .आकडे जणूकाही त्यांच्या मेंदूत एकदम फिट्ट बसलेले असतात. अशा पद्धतीने मोठ्या संख्यांची आहे बेरजा त्यांना करता येतात. काहींना तर पत्यातल्या जादू सुद्धा योग्य प्रकारे गणित करून करता येतात .याचा अर्थ असा की त्यांच्यात गणिती बुद्धिमत्ता असते.
मित्रांनो शकुंतला देवी यांनी गणिताचे कॅल्क्युलेशन त्यांनी कॅलक्युलेटर न वापरता केलेले आहेत .वयाच्या सहाव्या वर्षाच्या वयात त्यांनी भारतातील मोठमोठ्या विश्व विद्यालयांमध्ये आपल्या कौशल्याचे नमुने सादर केले होते. या भारतातील प्रसिद्ध महिला गणितज्ञ शकुंतला देवी आहेत.
गणिती बुद्धिमत्ता ही फक्त अंकाशी संबंधित नसते तर तर्क वापरून म्हणजे अंदाज बांधून कोणतीही समस्या उदाहरण योग्यप्रकारे सोडवणं यासाठी बुद्धिमत्ता आवश्यक असते .आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा अनेक समस्या समोर येत असतात .विविध प्रकारची कोडी कूटप्रश्न सोडवत असताना सर्वप्रथम आपणास त्या समस्येचा उदाहरणाचा योग्य प्रकारे विचार करावा लागतो. विचार केल्यानंतर ती समस्या उदाहरण कसे सोडवायचे याचा तर्क लावावा लागतो आणि वेगवेगळ्या प्रकारे म्हणजेच गणितामध्ये पायऱ्या वापरून उत्तरापर्यंत आपणास जाता येते . गणिती बुद्धिमत्ता सर्व माणसांमध्ये आढळते मात्र प्रत्येकात ती कमी-जास्त आढळते .
ज्यांचा मेंदूतील गणितीय भागाशी वायरिंग जोडणी होते. गणिताविषयी आवड ठेवून त्या त्या क्षेत्रामध्ये पुढे जात असतात मित्रांनो ही वायरिंग जोडणी करण्यासाठी अनेक विविध गणिताचे अनुभव देणे गरजेचे असते .काहीजणांना गणित हा विषय अवघड वाटतो तर काहीजणांना गणित सोपं वाटतं. मित्रांनो गणित हे शास्त्र अमूर्त संकल्पना गोष्टी संबोध यावर आधारलेले .अमूर्त म्हणजे काय जे आपण प्रत्यक्षात पाहू शकत नाही असे .म्हणजे भाषा विकासामध्ये अनेक मूर्त गोष्टीत म्हणजे दिसणाऱ्या गोष्टी ,वस्तू म्हणजे उदाहरण - पुस्तक .अनेक पानांची जोडणी केलेल्या वस्तू यास पुस्तक म्हणतात असे मुलांना सांगू शकतो ,शिकवू शकतो आणि त्याचा शब्दही मुलांना दाखवू शकतो. पुस्तक असे म्हटल्यानंतर मुलांना पुस्तक समजते . तसे गणितामध्ये नाही किंवा आपण मुलांस तसे सांगत शिकवत नाही म्हणून मुलांना गणित विषय अवघड वाटतो .
गणितामध्ये १ यास एक म्हणायचे, २ यास दोन म्हणायचे. असे सांगतो परंतु आत्ता ज्ञानरचनावाद पद्धतीने मुलांना गणिताची आवड निर्माण होत आहे. कशी तर एक म्हणजे फक्त एकच वस्तु दिसणारी मुलांना दाखवायचे. एक सुर्य एक चंद्र अशा एकच वस्तू व यास एक १ अंक असे म्हणतात .कोणत्याही दोन वस्तू मुलांना दाखवायचे आणि २ ही संकल्पना मुलांना सांगायचे .अशाप्रकारे ज्ञानरचनावाद पद्धतीने मुलांमध्ये अतिशय गणिताची आवड निर्माण होण्यास मदत होते .शाळांमध्ये आत्ता पण पाहिलं तर शिक्षक मुलांना बिया ,मणी,दगड ,काड्या, चिंचोके ,बांगड्यांच्या काचा,गोट्या अशा वस्तू आणायला सांगतात .त्यांच्या मदतीने मुलांमध्ये अवघड वाटणाऱ्या गोष्टी मुलं वस्तूंच्या साहाय्याने सहज सोपे सोडवतात . या वस्तूंच्या साहाय्याने अंक , संख्या , बेरीज वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया मुलं सहज शिकतात.
मित्रांनो अपूर्णांक ही संकल्पना लवकर मुलांना समजत नाही यासाठी दररोज आपल्या जेवणामध्ये भाकरी/ चपाती असते .आई एका भाकरीची चार सारखे तुकडे करते त्यातील मुलाने एक तुकडा खाल्ला म्हणजे एक चतुर्थांश भाकरी खाल्ली .1/4 हा झाला अपूर्णांक .अपूर्णांक म्हणजे काय तर अपूर्ण संख्या. अशाप्रकारे मुलांना अपूर्णांक रोजच्या जीवनामध्ये आपण अनेक गोष्टी करत असतो अशा उदाहरणांतून जर शिकवलं तर मुलं पटकन शिकतात आणि त्यांना गणिताची गोडी वाटायला लागते जर मुलांना पण फळ्यावर वहीवर पुस्तकात फक्त गणित सोडवणे म्हटलं तर मुलांना ते समजत नाही आणि मुले गणित शिकण्यापासून लांब पळतात. त्यांना त्याची गोडी वाटत नाही.
मुलांना गणित आवडत असेल तर त्यांच्यासाठी पुढील गोष्टी करा -
1) विज्ञानातल्या नवनवीन शोध यांची माहिती घ्या. हे शोध लावण्यासाठी कोणकोणत्या प्रक्रिया झाले याची माहिती घ्या.
2) त्यांना बाजारात पाठवा स्वतः वस्तूंची खरेदी करायला सांगा.
3)तुमचं बँके / पोस्ट खाते असेल तर पैशाची छोटे-मोठे व्यवहार मोठ्या माणसांच्या मदतीने करायला लावा.
4) फावल्या वेळामध्ये गणिती कोडी सोडवा.
5)घरातल्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करा जमाखर्च लिहा.
6)दररोजचा खर्च जमा लिहून काढायला वा शाळेची फी पुस्तकांचा खर्च इतर साहित्याचा खर्च लिहून काढायला वा खर्च झाला की लगेच लिहायला सांगा.
7)गणित आणि विज्ञानाची इतर वर्गाची पुस्तके नजरेखालून घाला.
8)लहानांना गणित शिकवायला लावा .
9)अनेक गणित विषयाची पुस्तके वाचायला सांगा. त्यामध्ये गणित गप्पा भाग-1,2 .वैदिक गणित, गणित कोडी असे अनेक विविध पुस्तके आपणास बाजारात आहेत या पुस्तकांचा अभ्यास करून मुलांना गणित विषयाची आवड निर्माण करा.
वरील लिंक ला टच करा आणि आपल्या प्रत्येक घरामध्ये गणिताविषयी चे खेळ बुक्स असावेत ते खरेदी करा
मित्रांनो आपण हि मुलांना वस्तूंच्या साह्याने अनुभवाच्या ,साहित्याच्या साह्याने गणित शिकण्यासाठी मदत करूया .जेणेकरुन मुलांच्या मेंदूत गणित विषयाच्या अनुभवाची जोडणी घडेल.दैनंदिन जीवनामध्ये अनेक गणिती प्रक्रिया मुलां बरोबर घडत असतात. आपण त्यांना जाणीवपूर्वक त्या कृती करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
गणिती बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तींमध्ये काही ओळखीची नावे शास्त्रज्ञ जयंत नारळीकर ,गणितज्ञ मंगला नारळीकर, आईन्स्टाईन, डार्विन ,आर्यभट्ट ,सी आर राव ,सी एस शेषाद्री अनेक शास्त्रज्ञ आहेत
यातून अनेक करिअरच्या संधी मुलांना उपलब्ध आहेत ही मुलं गणित तज्ञ ,शास्त्रज्ञ ,संख्याशास्त्रज्ञ, अभियंते, आर्किटेक्ट अशा क्षेत्रांमध्ये चमकताना दिसतात .या व्यक्तींमध्ये गणिती बुद्धिमत्ता असते
क्रमशः
सचिन बाजीराव माने
आरफळ सातारा
98 81 32 35 84



टिप्पण्या