शिक्षण : शाळा ते करिअर भाग दुसरा मुल घडवताना
शिक्षण : शाळा ते करिअर
भाग दुसरा
मुल घडवताना....
http://www.educationschooltocareer.com/2020/05/blog-post.htmlआपण आपल्या मुलांना घडवणार आहे परंतु ही घडण्याची घडवण्याची सुरुवात ही शाळेत गेल्यानंतर होत नसून मूल जन्माला येण्याअगोदर आणि जन्मल्यानंतर सुरू होते घरापासून कुटुंबापासून.
शिक्षण म्हणजे मुलांच्या, व्यक्तीच्या वागण्याला योग्य वळण लावणे.
म्हणजे आपल्या मुलांना जाणून घेऊन त्यांमध्ये योग्य ते बदल करणे खरंच मुलं घडताना आपण आपल्या मुलांना कधी जाणून घेतले का??
समजून घेतले का ??
या पहिल्या प्रश्नाने आजच्या लेखाची सुरुवात होते .
आपल्या मुलांना आपण सर्वगुणसंपन्न बनवणे हे आपल्या हातातच आहे.
त्यामध्ये आपलं घर शाळा समाज या तिन्हींचा खूप मोठा वाटा असतो परंतु पहिली सुरुवात होते ते आपल्या घरापासून होते.
उदाहरण म्हणून आपण दोन मुलं पाहूया .
एक आहे शरद रोज सकाळी लवकर उठतो .
आईबरोबर देवाची पूजा करतो. सर्वांशी प्रेमाने बोलतो. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतो.
दुसरा आहे केदार.
घरात कोणाला ऐकत नाही .उशिरा उठतो. जेवण व्यवस्थित करत नाही. सतत खेळत राहतो. खोटं बोलतो.
मित्रांनो या दोन मुलांच्या वागण्यावरून आपल्याला असं दिसतं की शरद हा अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं वागणं.
मात्र केदार हा त्याच्या उलट दिसते.
याची कारणे कोणती असतील ?
याची खूप वेगळी वेगवेगळी कारणे आहेत .
आपण या मुलांच्या घडण याकडे आता बघणार आहे.
आजच्या लेखामध्ये आपण या मुलांच्या आयुष्याच्या पहिल्या सहा वर्षांची जडण-घडण पाहणार आहोत.
पहीली सहा वर्ष ही या मुलांना मोठेपणी माणूस म्हणून जगण्यासाठीची पायाभरणी असते.
मुलांचे वागणे जसे मोठे लोक करतात ते पाहूनच मुलं घडत असतात .
मुल जन्माला येण्या अगोदरच माझं मूल सुदृढ सक्षम निरोगी जन्माला घालणं हे माझ्या हातात असतं.
मुलांची गर्भधारणेपासून ते जन्म होईपर्यंत अनेक गोष्टींचा विकास वाढ होत असते आणि त्यामध्ये मुलांची वाढ चांगल्या प्रकारे करणं आमच्या हातात असतं .
ही वाढ होत असताना त्या मातेने उत्तम पोषण आहार घ्यावा.
स्वतःची काळजी घेणे.
चांगली पुस्तके वाचणे .
चांगल्या गोष्टींचा चिंतन करणे जसे संस्कार मातेच्या मनामध्ये असतात. तसंच सुदृढ मुल जन्माला येतं.
या गर्भ संस्कारांचे धडे आज प्रगत शहरांमध्ये घेताना सुशिक्षित लोक दिसतात परंतु आम्ही गर्भ संस्कार म्हणजे काय हेच माहीत नसल्यामुळे आम्ही जसे जसे आहोत अमेरिका इंग्लंड अशा प्रगतशील राष्ट्रांमध्ये मूल जन्माला येण्या अगोदरच मातेला गर्भसंस्कार वर्गास पाठवले जाते आज आपल्या भारतामध्ये ही सुरुवात झालेली आहे आपणास फक्त मुलांना सुदृढ सक्षम बनवायचं नाही तर त्याच्या सर्व क्षमता विकसित होतील यासाठी सुद्धा आपला सगळ्या गोष्टी करायचे आहेत.
गर्भावस्थेमध्ये मुलांची वेगवेगळे अवयव तयार होत असतात .
त्यांची ऐकण्याची क्षमता विकसित होत असते . श्वसनक्रिया सहाव्या महिन्यात त्यांची स्पष्ट होते.
मूल जन्माला आल्याबरोबर आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात .
म्हणजे चोकणे, पकडणे या क्रिया मुलांच्या सुरू होत असतात .
आई जर मुलाच्या संरक्षण संदर्भात अवास्तव चिंता करत असेल तर त्याचा प्रभाव मुलावर पडतो.
जेवढी आई आनंदी शांत असते तेवढे ती मुलाला स्वातंत्र्य देत असते .त्याच्या विकासाला संधी देत असते.
विनाकारण काळजी करणे हे मुलाच्या विकासावर परिणाम करणारे ठरतात.
याउलट जर आनंदी मन राहील तर मुलगा स्वतंत्रपणे त्याच्या क्रिया करते.

जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा त्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते म्हणजे बघा आपण जर लहान बाळाच्या तळव्यांना स्पर्श केला तर हाताची बोटे पसरते गालातल्या गालात हसते. जर प्रकाश खूप असेल तर डोळे बारीक करते . त्याला खूप खूप प्रकाश सहन होत नाही याउलट अंधार असेल तर मोठं करतं.
मंद पुरेसा प्रकाश असेल तर बाळ नेहमी आनंदी राहते.
शेजारी असणाऱ्या वस्तू पकडण्याचा प्रयत्न करते .
पहिल्या दोन वर्षापर्यंत मुलांचे व्यक्तिमत्त्वमध्ये काही अनुवंशिक लक्षणे स्थिर होत असतात.
पहिल्या दोन वर्षांमध्ये भरपूर वेळ झोपतो .मुलांचे दुध लवकर तोडलं तर मुलगा अंगठा चोखू लागते .
त्याला जबरदस्ती अन्न खायला दिलं तर ते खात नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये मानसिक विकृती तयार होण्याची संभावना असते .
सुरुवातीला मूल पालथे होणे , रांगणे, कोणाच्याही आधाराशिवाय थोडा वेळ बसणे ,त्यानंतर मुल जेव्हा कोणत्या आधाराशिवाय उभा राहतो आणि त्या मुलाचं पहिलं पाऊल चालण्यासाठी पडतं तेव्हा होणारा आईचा आनंद हा जगातील सर्वात सर्वोच्च आनंद असतो.
त्यानंतर मुलं काही कौशल्य शिकतात स्वतः कपडे घालने, स्वतः खाणे ,खेळणे ,उडी मारणे त्या गोष्टी मुलं स्वतः शिकत असतात ज्यावेळी मुलांना या गोष्टी शिकण्यासाठी आपण उत्तेजन दिले पाहिजे अनुकरण करण्याची संधी दिली पाहिजे जर त्या मुलांना आपण सराव करण्यासाठी योग्य संधी दिली नाही तर ह्या गोष्टी शिकण्यासाठी मुलांना खूप उशीर लागतो .
मुलांचा भाषा विकास जर तुम्ही म्हणाल तर सहाव्या महिन्यापासून मा-मा ,डा -डा , ना- ना बोल बोलायला सुरुवात करते आपण जास्तीत जास्त मुलांची बोलण्याचा प्रयत्न केला तर मुलं आपलं पाहून पाहून शिकण्याचा प्रयत्न करते जर आपण सतत मुलांना रागावलो. तर मुलांच्या भाषा विकासात अडसर निर्माण होतो.
त्याला कोणी एकटे ठेवला असेल आणि जर हात पसरले तर आपण समजायचे की की तो आपणास कडेवर घ्या असे म्हणतोय .
जेवणाचे ताट बाजूला सारले तर मला खायचं नाही असं तो सांगत असतो.
मग या वेळेस आपण कोणत्या क्रिया कराव्यात? या प्रत्येक कृतीकडे आपण सकारात्मक घेऊन मुलांना काय हवंय काय नकोय हे बघितलं पाहिजे मुलांना पण सतत रागावले पाहिजे.
मुलगा चांगला बोबड्या बोलात बोलतो .त्याला आपण ही बोबड्या बोलात बोलतो.परंतु असे न करता आपण जे नेहमी बोलतो तसे स्पष्ट उच्चारात मुलांशी बोललो. तर भाषा विकासात त्याला अडथळा निर्माण होत नाही.
दोन वर्षापर्यंत पण बाळाचे खूप लाड करतो .त्याचं म्हणेल ते ऐकतो आणि नंतर आपण मोठे झाल्यानंतर त्याच्या हट्ट पुरवत नाही अशावेळी मुल रागीट चिडचिड बनते. आपल्या नकारात्मक गोष्टींचे भांडण सुरु होते .
जर बाळा खेळायचा असेल त्याला तर आपण त्याला दूध पाजतो.
जर त्याला झोपायचं असेल तर आपण त्याला खाऊ घालतो .
जर आपणास राग आला तर त्याला आपण एकटे ठेवतो.
या सर्व गोष्टींचा मुलांच्या मनावर परिणाम होत असतो .
मुलं जर खात नसतील तर आपण त्यांना भिती घालतो .
त्यांना अंधारात ठेवतो. अनोळखी माणसांना दाखवतो आणि त्यांची भिती घालतो .
ही भीती त्यांच्या मनामध्ये सतत राहते आणि मुलांची जिज्ञासा कमी होते.
म्हणजे त्याला दिसणारे अनोळख्या नवीन गोष्टी त्याला भीती वाटायला लागतात आणि मुलांचा शिकणं बंद होतं . जर त्याला सतत भीती घातली तर मात्र मुलगा एकटा पडण्याची संभावना असते .
जर आपण मुलांना लहानपणापासूनच खूप प्रेम दिलं तर मुलं सुद्धा प्रेमळ स्वभावाची बनतात. जर आपण त्यांचा राग केला तिरस्कार केला तर मुले एकलकोंडी बनतात.
दोन वर्षापासून सहा वर्षापर्यंत मुलांना स्वतंत्र कामे करण्यासाठी शिकण्यासाठी त्यांचा विकास वाढ करण्यासाठी महत्त्वाचा असतो .आता ही मुलं आपल्यावर अवलंबून असतात .ती प्रत्येक गोष्ट स्वतः करण्याचा प्रयत्न करतात .

बघा लहान मूल जेव्हा चालायला सुरुवात करतो त्यानंतर मोठ्यांचे अनुकरण करतो आपल्या घरातील मोठ्या ची चप्पल ते घालता आणि चालायला सुरुवात करतो .आपण लगेच त्याला ओरडतो अरे काय तुला कळत नाही पडशील .आपण त्याला कधीही मोकळीक देत नाही जेव्हा ते स्वतंत्रपणे कोणती गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण त्याला ती करून देत नाही आणि त्याचा परिणाम आयुष्यभर मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो.
आपण मुलांना स्वतंत्रपणे त्यांची त्यांची काम करून दिली तर मुलं हेच सर्व कौशल्य आत्मसात करतात म्हणजे
- स्वतः जेवण करणे ,
- कपडे घालने ,
- आरशात पाहून बटने लावणे, उघडणे,
- केस विंचरणे ,
- आंघोळ करणे ही कौशल्ये मुलं शिकतात हे कामे करतात पण आपण इथेच मुलांना अडवतो आणि आम्ही स्वतः त्यांना पांगुळ बनवतो . हेच मुले मोठी होतात तेव्हा आपणच मुलांना म्हणतो तुला अजून आंघोळ करायला येत नाही कपडे घालता येत नाही स्वतःच्या स्वतः जेवण करता येत नाही का म्हणून मुलांकडून आपण अपेक्षा ठेवावी ?
एक छान उदाहरण तुम्हाला देतो- लहान बाळाला आंघोळ घालण्यासाठी घरातील म्हातारी आज्जी असते तिला बोलावलं जातं आणि ती सांगते पाणी गरम करत ठेवा. पाणी गरम केलेले असते आणि या आजीच्या रहाट हाताला गरम पाण्याचा जेव्हा चटका बसेल तेव्हा ती म्हणते आता आंघोळ बाळाला आंघोळ घालू या आणि तुम्ही जर बघितली तर बाळाची त्वचा अतिशय कोमल असते आणि तिच्या हाताची त्वचा तुम्ही जर पाहिले तर अतिशय रहाट असते आणि तिला बसलेला पाण्याची चटका ती त्या बाळाच्या अंगावर टाकणारे पाणी .
आपणास जर कल्पना केली तर आपणास चटका बसलाय.
आपणास जर कल्पना केली तर आपणास चटका बसलाय.
मग मला सांगा त्या लहान बाळावर जेव्हा हा पहिला तांब्या अंगावर पडतो तेव्हा ते बाळ इतक्या मोठ्या मोठ्यांदा रडू लागते.
जेव्हा बाळाला समजते की आपल्याला आंघोळ घालण्यासाठी ची तयारी सुरू आहे तेव्हा बाळाचा आरडाओरडा सुरू होतो यावरून आपल्याला जर समजले असेल तर सहा-सात वर्षांचा होईपर्यंत ते स्वतः कधी आंघोळीला जात नाही. आपल्याला सतत त्याच्या मागे लागावे लागते किंवा आपण आंघोळ घालताना ते सतत रडत असतं याचं कारण समजलं तुम्हाला....
ह्या गोष्टींपासून आपण आपल्या मुलांना कसं घडवावं आणि आपण मुलांना कसे समजून घ्यावं....
जसजसं मोठं व्हायला लागतं तसं त्याच्या कानावर गोष्टी, रेडिओवरील संवाद, टीव्हीवरील चित्र संवाद पाहत ऐकत असतात . जर घरामध्ये प्रेमाचं आनंदाचं शांत वातावरण असेल तर मुलगा सुद्धा स्वतंत्र विचारांचा शांत आणि प्रेमळ बनतो .
मित्रांनो याच काळामध्ये जर आपण त्यांना अनेक नवीन नवीन शब्द शिकवले तर मुलांचा एका वर्षांमध्ये 1800 नवीन शब्द मुलगा शकतो .कसे काय ?? तर आपण स्वतः घरी वेगवेगळ्या शब्दांची चित्रांची कार्ड तयार केली आणि ती कार्ड पांढऱ्या कागदावर ती लाल रंगाने अक्षरे लिहिली . लाल रंग मुलांना जास्त उद्दीपित करत असतं.म्हणजे त्यांच्या लक्षात राहण्यासाठी लाल रंग हा खूप महत्त्वाचा ठरतो.
या लाल रंगावर लिहिलेले अक्षर शब्द त्यांना सतत दाखवू दाखवून दिवसाला पाच शब्द आठवड्याला 35 शब्द जर आपण घेतले तर एका वर्षामध्ये मुलांची 1800 शब्द हे त्यांचे शब्दभांडार वाढवण्यासाठी मदत करतात आणि शब्दभांडार वाढलेली मुलं ही सहज समाजामध्ये स्वतःला सिद्ध करतात.
यानंतर बघा मुलांचे तिसऱ्या वर्षापासून प्रश्न विचारण्याची वेळ सुरू होतं ते सहा वर्षांपर्यंत .खूप त्याची जिज्ञासु म्हणजे नवीन नवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती वाढलेले असते. आपणा सर्वांना हे घरात माहीत असेल की ज्या वेळेला मला बोलायला सुरुवात करतो त्याला ते म्हणतात हे काय? ते काय? मला हे सांग ते सांग अशी सुरुवात मुलांची जिज्ञासा नवीन गोष्टी जाणून घेण्याची असते .त्या प्रत्येक वेळेला आपण त्या मुलांना नाही नाही असं म्हणतो.
मला नाही माहिती ,आम्हाला वेळ नाही जा आईला विचार...
आणि मग मुलांची शिकण्याची वृत्ती आम्ही तिथेच बंद करून टाकतो .
तो मुलगा सहा वर्षांचा होईपर्यंत त्यांची जिज्ञासा बंद झालेले असते. तो मुलगा कधीही सहा वर्षांपर्यंत प्रश्न विचारायला धाडस करत नाही. पण जर आपण ह्या मुलांना जर मुलगा एखादा प्रश्न विचारत असेल हे काय आहे ते काय ?आपण जर त्याच्या मुलांना त्याचे उत्तर दिलं तर मुलं ही खूप पुढे जात असतात त्यांचा विकास खूप मोठ्या प्रमाणावर होत असतो.
मुलं या वयात वेगवेगळे खेळ खेळत असतात. त्यांना खेळायला खूप आवडतं आणि अशा खेळांमध्ये मुलांच्या अनेक क्षमता विकसित होत असतात .लंगडी असेल,लपाछपी असेल सायकल चालवणे या वेगवेगळ्या खेळांमुळे मुलांच्या विविध क्षमता विकसित होत असतात. त्यांची सहनशीलता, संवेदनक्षमता विकसित होत असते .म्हणजे अचूक नेम गोष्टीचा कसा लागला पाहिजे किती अंतरावरुन गोटी मारली पाहिजे किंवा लपाछपी मध्ये आपण किती वेळ स्वतःला कंट्रोल कमी करून ठेवला पाहिजे .या सर्व गोष्टी मुले शिकत असतात म्हणून आम्ही या खेळा मध्येच म्हणून सतत त्यांना ओरडत असतो तिथे जाऊ नको असं करू नको ते करू नको हे करू नको अशा आमच्या नकारात्मक गोष्टींची घंटा सुरू होते आणि मग मूल ते एकाकी पडायला सुरुवात होते.
मित्रांनो या काळामध्ये मुलांचा व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो आणि म्हणून मुलांना कधीही शिक्षा देऊ नये मला सांगा मला अजूनही आठवते माझ्या लहानपणी माझ्या आजोबांनी ज्या गोष्टी सांगितलेलं होतं त्या आजही माझ्या लक्षात येतात.
त्यामध्ये आजोबांनी सांगितलेली भिम आणि बकासुर याची गोष्ट किंवा धम्मकलाडू ची गोष्ट ही आजही मला आठवते. मित्रांनो आपण आपल्या मुलांना कधी जवळ घेऊन रात्री झोपण्यापूर्वी किंवा दिवसातून अशा छान छान गोष्टी मुलांना कधी सांगितलेत का?
त्यांच्याशी प्रेमाने कधी बोललो का? दोन वर्षापर्यंत आमचं प्रेम खूप उफाळून आलेले असते पण त्यानंतर आपण मुलांकडे जसजसा मोठा होईल तसं दुर्लक्षच करत आलेला असतो आणि त्यामुळे मुलगा आपणास कधीही गृहीत धरत नाही. जर आपण लहानपणापासूनच त्याच्यावरती संस्कारांची धडे दिले. मोठेपणी आपणास मुलांना ओरडण्याची गरज भासणार नाही ह्या सर्व गोष्टी आपणास मुलांच्या लहानपणापासूनच घडवावे लागतात आणि हे काम मुलांच्या सर्वप्रथम घरातून सुरुवात होते
.आपण मुलांना दररोज छान छान गोष्टी सांगितल्या पाहिजेत छान छान धडे दिले पाहिजेत
.जर आपणच घरांमध्ये दिवसातील आठ तास टीव्ही बघत राहू तर मुलं सुद्धा टीव्ही पाहणारे जर आपण मुलांना खेळण्यासाठी संधी दिली नाही त्यांना वेगळ्या कृती स्वतः करण्यासाठी संधी दिली नाही तर मुलगा आपण जे करू तेच करणार आहे आणि मोठे झाल्यानंतर आपणच मुलांना ओरडतो.
असे करू तसे करू नको पण लहानपणी चे संस्कार लहानपणीच्या गोष्टी त्याची सवय मुलांना मोठेपणी लागलेली असते आणि ते आपण बदलू शकत नाही.
म्हणूनच मुलांना घडवताना सर्वप्रथम आपण मुलांशी प्रेमाने वागले पाहिजे मुलांना कधीही शिक्षा दिली नाही पाहिजे जर आपण मुलांना शिक्षा दिली रागावलो तर मुलं नवीन गोष्टी शिकणे पासून लांब जातात.
तुम्हाला माहिती आहे का जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट शिकतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये न्यरॉन नावाच्या पेशी तयार होत असतात आणि त्यांची साखळी ( सिनॅप्स ) जितकी वाढेल तितक्या नवीन गोष्टी मुलगा शिकत असतो किंवा माणूस शिकत असतो. जर आपण एखाद्या मुलांना रागावलो त्यांना शिक्षा दिली तर त्यांनी पेशींमध्ये खंड पडतो आणि त्याची शिकण्याची इच्छा शिकण्याची क्षमता तिथेच बंद होते किंवा कट होते.
मुलांना आपण नक्की काय हवंय काय नकोय याचा आपण स्वतः विचार केला पाहिजे .त्याप्रमाणे आपण मुलांशी प्रेमाने आदराने बोलले पाहिजे .जसे आपण मुलांशी वागू बोलू तसेच मुलं इतरांचे सुद्धा प्रेमाने आदराने बोलतील वागतील .
मित्रांनो आपणही आपल्या मुलांना समजून घेऊया त्यांना शिक्षा करायची नाही रागवायचं नाही तर प्रेमाने तुम्ही त्यांना गोष्टी त्या समजून सांगा.
मुलांचा हट्ट फक्त काही वेळापुरता असतो त्यानंतर ती विसरून जात असतात. परंतु आपण जर मुलगा हट्ट करत असेल तर आपण त्याच्यावर चिडतो रागावतो त्याला ओरडतो .अशा वेळेस मुलांना शांत करून त्यांना त्यांच्या त्या गोष्टीपासून परावृत्त कसे करता येईल एखादी दुसरी गोष्ट त्याला सांगून त्याचे मन कसं वळवता येईल याकडे आपण लक्ष दिले पाहिजे .मुलांचा हट्टी स्वभाव हा त्या वयानुसार असतो .त्या वयानंतर मूल हट्टीपणा करण्याचं सोडून देतो परंतु जर आपण त्याच्या हट्ट करण्याकडे लक्ष दिलं तर मुलं हट्ट करणार सोडत नाही.
मुलांना पाहिजे त्या गोष्टी करू द्या फक्त त्याला एकच सांगा हे चांगलं आहे हे वाईट आहे याची आपण आठवण करून द्या .
मुलांना भौतिक सुविधा भरपूर दिल्या परंतु त्याला घडण्यासाठी आत्मिक बळ आम्ही कधी देणार ........ मुलांना प्रत्येक गोष्ट करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांनी केलेल्या कोणत्याही गोष्टीसाठी आपण पण कौतुक केलं पाहिजे . त्याला छान शाब्बास म्हटलेलं खूप आवडतं .जेव्हा ते स्वतंत्रपणे लहानपणी कामे करायला शिकतो तेव्हा आपण त्याला तू लहान आहेस तु हे करु नकोस तुला हे जमणार नाही तरी करू नको आणि मोठे झाल्यानंतर त्याच्या एकच लक्षात आता आपल्याला पण नाही करायचं आपल्याला जमणार नाही आणि आपण त्याच्याकडून मोठेपण अपेक्षा ठेवतो की त्यांनी हे काम करावे.
मित्रांनो आपण लहानपणीच त्यांची वाढ विकास थांबवण्यासाठी प्रयत्न करतो आणि मोठेपणी त्यांच्याकडून अपेक्षा करतो .म्हणून मुलांना दोन वर्षानंतर स्वतंत्रपणे जगू द्या त्यांना स्वतंत्रपणे स्वतःची कामे करू द्या आजही आपण असंख्य युट्युब वर किंवा व्हाट्सअप वरती लहान मुलांचे मुलींचे व्हिडिओ पाहतो त्यामध्ये लहान मुली ह्या स्वयंपाक करताना दिसतात आपणास खूप कौतुक वाटतं ते जर आपल्या घरामध्ये आपल्या मुलांनी असं करावं अशा अपेक्षा ठेवली तर मदत करत नाहीत म्हणून मुलांना स्वतंत्रपणे काम करू द्या शाबासकीची थाप द्या शिक्षा करू नका मुलांना घडू द्या.
http://www.educationschooltocareer.com/2020/05/blog-post_4.html
क्रमशः
सचिन बाजीराव माने
आरफळ सातारा
98 81 32 35 84
क्रमशः
सचिन बाजीराव माने
आरफळ सातारा
98 81 32 35 84
टिप्पण्या