संगीतविषयक बुद्धिमत्ता. पालक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी

शिक्षण  : शाळा ते करिअर 
       
         भाग अकरावा

             संगीतविषयक बुद्धिमत्ता

                     पालक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी 
नसेल वाचला तर नक्की वाचा 


                     मित्रांनो सनई चौघडे यांचा आवाज जर कानावर पडला तर आपणास लग्न समारंभ यांची आठवण होते किंवा आपली पावले आपोआप तिकडे वळतात .जर बँड वाजायला सुरुवात झाली तर अनेक लोकांची पावलं पाहण्यासाठी ऐकण्यासाठी तिकडे वळतात तर काहीजण आपल्या ओळखीचं लग्न नसलं तरीसुद्धा नाचण्यासाठी पळतात.



                    मित्रांनो या सृष्टीमध्ये असा एकही माणूस नाही ,जीव नाही ज्याला संगीत आवडत नाही .कारण संगीताची नाळ जन्माला येण्या अगोदरच जोडलेली असते. तुम्ही म्हणाल हे नवीन काय ??  मित्रांनो जेव्हा बाळ आईच्या पोटात असतं तेव्हा आईच्या हृदयाचे ठोके बाळाला ऐकू येतात आणि हे पहिले ठोके म्हणजेच बाळाला ऐकू आलेला पहिला ताल असतो. जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा अनेक कारणांवरून रडत असतं. परंतु आपण जर त्याला थोपटलं .तर बाळाला त्या थोपटण्याचा ताल  सर्वात प्रथम ऐकलेल्या  आईच्या हृदयाच्या ठोक्यांची आठवण करून देतो आणि बाळाला सुरक्षित वाटून बाळ शांत होतं.


                       मित्रांनो एवढ्या वरूनच आपल्याला समजल असेल ते म्हणजे आज आपण पाहणार आहोत संगीतविषयक बुद्धिमत्ता .




                      लहान बाळ जसं मोठं होतं तसं घरातील आजी अंगाई गीत म्हणते .या अंगाई गीताचा त्याला तो ताल आनंद देतो .मित्रांनो ही काही जादू नाही .परंतु संगीत  आपल्या मेंदूमध्ये छान आनंद देणाऱ्या लहरी निर्माण करते  आणि त्यामुळे आपल्या भावना या हव्या तशा आपण संगीताच्या माध्यमातून वळ शकतो  .जसं  मुल तसं अंगणवाडीत जायला लागतं आणि अंगणवाडीमध्ये " खबडक खबडक घोडोबा घोड्यावर बसले लाडोबा"  अशी गाणी ऐकतो आणि ते गाणी म्हणतो सुद्धा आणि त्यावर नृत्य सुद्धा करतात.  मित्रांनो  अशावेळी जर आपण मुलांना छान बडबड गीत गाणी त्याला ऐकवलीत तर मुलाचं संगीताशी नातं पक्क होतं. संगीताचे वेगळे कार्यक्रम त्याला ऐकवले, पाहायला नेले ,तर अशा मुलांमध्ये नक्कीच संगीत विषयक जाण निर्माण होते व त्याला त्यात आनंद वाटतो.

                      ज्याचा कान चांगला तयार तो मुलगा  संगीत क्षेत्रामध्ये पुढे जातो.  मित्रांनो  संगीत आपल्याला मुळापासूनच आवडत असतं  .एखादं भितीदायक सिनेमांमध्ये वापरलेल संगीत आपल्या मनात भीती निर्माण करता. एखाद गाणं असं असतं की आपल्याला हळवं करून सोडतं.  याउलट ढोल ,लेझीम ,झांज सुरू झाल्या  तर आपल्या मनामध्ये एक प्रकारचं बळ निर्माण होतं  आणि आपण एका वेगळ्याच वातावरणामध्ये जातो. म्हणून संगीत हे मेंदूला केव्हाही पोषक असतं  .


                      मित्रांनो  संगीत आनंद निर्माण करतात आणि आपण याचा वापर जर अभ्यासात संगीताचा वापर करून केला  तर ते जास्त लक्षात राहण्यासाठी मदत होते.  अभ्यासाला बसताना किंवा अभ्यास चालू असताना एखादं मंद संगीत लावलं तर अभ्यासात रुक्षपणा येत नाही आणि अधिक अभ्यास करण्यासाठी आनंददायी वातावरण निर्माण होतं.  अशा वेळेला वाद्यसंगीत किंवा अभिजात संगीताच्या सुरावटी ऐकलं चांगलं  .घरात लहान मुलं असतील तर बडबड गीत बालगीत  मुलांना आनंद निर्माण करतात  .



                      मित्रांनो याचा सकारात्मक परिणाम निश्चितच होतो .जेव्हा मूल वाद्य वाजवतो किंवा वाद्याच्या सुरावटी वाजवतो तेव्हा  डाव्या आणि उजव्या मेंदूत जास्तीत जास्त केंद्र उद्दीपित झालेली असतात. त्यामुळे मेंदूला चालना मिळते आणि तो एक प्रकारचा मेंदूचा व्यायाम असतो . आनंदाचं वातावरण निर्माण करत राहिलो तर आपल्या मेंदूला निश्चितच गती मिळते .



                       मित्रांनो जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर हॉवर्ड गार्डनर यांनी संगीतविषयक बुद्धिमत्ता ही नवीन संकल्पना सांगितलेले आहे  या संकल्पनेमध्ये संगीताची  आवड नाही तर संगीत विषयक बुद्धिमत्ता  असे म्हणतात.  ज्यांना  संगीताची मनापासून आवड आहे हे आतून जाणवतं त्या व्यक्तींमध्ये ही संगीतविषयक बुद्धिमत्ता असते असं म्हटलं तरी चालेल  . संगीतामध्ये ताल सूर लय ठेका  यांची जाण  या मुलांमध्ये जास्त असते .



मित्रांनो आपल्या मुलांमध्ये संगीत बुद्धिमत्ता आहे का हे शोधण्यासाठी प्रश्न विचारा 

* मनापासून  संगीत ऐकायला आवडतं का?
* वाद्य संगीत ऐकायला आवडतं का?
 *गाणं म्हणायला शिकायला आवडतात का?
* वाद्य शिकायला आवडतं का?
* संगीतावर कुठलं गाणं आहे हे ओळखता येतं का?
 *दोन चाली मधला फरक ओळखता येतो का?
 *दोन चाली मधील सारखेपणा ओळखता येतो का ?
*संगीताच्या मैफिली जायला आवडतं का ? 
 *नृत्य करायला आवडतं का ?
*संगीत क्षेत्रातल्या कोणत्या व्यक्ती त्यांना आवडतात किंवा आदर्श आहेत का?
* संगीतात काही करावं असं मनापासून वाटतं का ?


            असे प्रश्न विचारले असता जर आपणास हो उत्तर आले तर आपल्या मुलांमध्ये निश्चितच संगीतविषयक बुद्धिमत्ता आहे हे आपणास समजत  .



                आपल्या मुलांमध्ये संगीतविषयक बुद्धिमत्ता आहे का हे ओळखायचं असेल तर बघा लहानपणापासूनच काही मुलं  डिश , ताट घेतात  आणि त्यावर चमच्याने वाजवायला सुरुवात करतात.  किंवा काही मुलं  स्वतः त्यांना आवडणारी गाणी म्हणतात.  डान्स करून दाखवतात.  काही मुलं बँड  किंवा काही वाद्य वाजतअसतील तर आपोआप त्या मुलांचं मन तिकडेच वळत आणि मुलं त्यांच्या शेजारी जाऊन बसतात किंवा स्वतः वाजवतात. असे असेल तर आपल्या मुलांमध्ये निश्चितच संगीतविषयक बुद्धिमत्ता आहे आणि आपण त्यांना त्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत .


         मित्रांनो जर अशी संगीतविषयक बुद्धिमत्ता असेल तर मात्र आपण कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत .
 

  1. त्याला या संगीत शिक्षणाची जोड द्यायला हवी त्या दृष्टीने त्याच्या आवडीनुसार भारतीय किंवा पाश्चात्य संगीत यांचे गायन वादन नृत्य शिकण्याची संधी द्यायला हवी .
  2. एखादं वाद्य घरी आवश्य आणून द्यावं.
  3. विद्यार्थ्यांना मुलांना वाद्य वाजवायला वाजवायला आवडतं ते मुलांना आणून द्या त्याचं प्रशिक्षण देणे .
  4.   जर मुलांना गाणी म्हणायला आवडत असतील तर  वेगवेगळ्या गायकांची वादकांच्या सीडी कॅसेट्स आणून द्याव्यात.
  5. आवडीनुसार संगीतविषयक कार्यक्रमांना आवर्जून नेले पाहिजे .
  6. मुलांच्या गायनाला वादनाला घरी प्रोत्साहन दिले पाहिजे .
  7. घरगुती कार्यक्रमांमध्ये मुलांना एखाद्या कोणतही गाणं म्हणायला सांगितलं पाहिजे  .
  8. कवितांना चाली लावायला शिकवलं पाहिजे सांगितलं पाहिजे  प्रोत्साहन दिलं पाहिजे .
वरील लिंक ला टच करा आणि मुला साकी म्युझिकल खेळ, खेळणी, वाद्य खरेदी करा


                      अशा प्रकारच्या संधी मुलांना दिल्या तर संगीत क्षेत्रामध्ये असे अनेक क्षेत्रे आहेत की जेथे नुसते कलाकार घडत नाहीत तर संगीत क्षेत्रातील अत्युच्च कामगिरी करतात.

                   मित्रांनो  आपणा सर्वांना महाराष्ट्रातील प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल माहीतच आहेत. हे दोन्ही भाऊ उत्तम संगीत तयार करतात ,गाणी म्हणतात ,गायकही आहेत .परंतु यांचा जीवन प्रवास पाहिला तर हे दोघे शाळेमध्ये कधीही त्यांना इतर विषयांची गोडी नव्हती. इतकच काय तर अतुलने दहावीच्या गणिताच्या पेपरमध्ये अक्षरशः चित्र काढली होती .



अजय-अतुल यांच्या आई-वडिलांनी त्यांना लहानपणापासूनच विविध वाद्य वाजवण्याची आवड होती म्हणून त्यांना कधीही रोखलं नाही परंतु पैशांची अडचण असल्यामुळे त्यांना वाद्य विकत घेतली नाहीत अशा वेळेस काही जुनी पुरानी वाद्य विकत घेऊन त्यांनी स्वतः वाद्य वाजवण्यास शिकले आणि आज उत्तम प्रकारचे संगीतकार व गायक वादक म्हणून जगभर ओळख आहे.



                      मित्रांनो भाषा गणित या विषयांमध्ये मुलगा हुशार असेल तर तो आयुष्यात खूप मोठा होतो हा आपला गैरसमज बाजूला ठेवून आपल्या मुलांमध्ये नक्की कशाची आवड आहे हे ओळखून त्यांना समजून घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. पखवाज वाजवणारा यांच्या घरांमधील मुलंसुद्धा पखवाज वाजवतात किंवा गाणी म्हणणार यांच्या घरामध्ये नेहमी गायक तयार होतो. परंतु हे म्हणणं आणि असणे यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. कारण मित्रांनो या मुलांना लहानपणापासूनच संगीत गायन वादन यांच्या अनुभवांची मेंदूमध्ये वायरिंगची  जोडणी होते. आणि ही मुले त्या क्षेत्रामध्ये पुढे जातात. आपण आपल्या मुलांना त्यांना आवडणाऱ्या अनुभवांची जोडणी करण्यास संधी देतो का ?आणि अपेक्षा आपली काय (डॉक्टर /इंजिनिअर).......

           सर्वांनाच माहीत असलेले स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे जीवनपट काही असाच आहे .


                                              मित्रांनो भीमसेन जोशी यांचे वडील स्वतः शिक्षक होते. त्यांना वाटत होतं की माझा मुलगा हा डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावा .परंतु भिमसेन जोशी यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती आणि म्हणून वडिलांच्या इच्छेविरुध्द जाऊन वयाच्या अकराव्या वर्षी गाणं शिकण्यासाठी घरातून पळून निघून गेले आणि उत्तर भारतामध्ये घर खिशात पैसा नाही पोटात अन्न नाही अशावेळी अनेक मान्यवर गायक यांच्याकडे ते गाणे शिकले.  भीमसेन जोशी यांना संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने भारतरत्न हा किताब दिला.
 
                 त्याचप्रमाणे लता मंगेशकर, उषा मंगेशकर, आशा भोसले ,हृदयनाथ मंगेशकर यांच्या घरांमध्ये सुद्धा लहानपणापासूनच गायनाची परंपरा होती .
         
                   गानकोकिळा म्हणून लता मंगेशकर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. त्यांनाही भारतरत्न या किताबाने भारतात सन्मानित केले आहे .
             

                  सर्वांना माहीत असलेले ए आर रहमान
  
                भारतातील पहिले गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित. रहमान यांचा जीवन प्रवास असाच आहे .

                त्याचबरोबर झाकीर हुसेन, पंडित शिवकुमार शर्मा ,पंडित हरिप्रसाद चौरसिया शिवमणी हे त्याच्या क्षेत्रातील प्रसिद्ध वादक आहेत . तर सुनिधी चौहान, श्रेया घोषाल, कैलास खेर, अर्जित सिंग ,सोनू निगम ते सनी हिंदुस्तानी हे गायक . त्याचप्रमाणे प्रल्हाद शिंदे, शाहीर साबळे , विठ्ठल उमप,आनंद शिंंदे ते आत्ताचे नंदेश उमप, आदर्श शिंदे ,गणेश चंदनशिवे यांसारखे लोक कलावंत,शाहिर हे निश्चितच संगीत क्षेत्रांमधील अजरामर व्यक्ती आहेत . 


                     "रसिक मायबाप हो तुम्ही माझ्यासाठी सर्वकाही आहात .मी जाण्यापूर्वी तुम्हाला भेटायला हवे. माझी सृष्टीला एकच विनंती आहे की तुम्ही माझे गाणे ऐकता ऐकता मला मरावेसे करावे ." मित्रांनो जिवंतपणी एका वृत्तपत्राला मुलाखत देणारे



             ज्यांचा श्वास ,ध्यास आणि जीवन हे फक्त आणि फक्त गाणं होतं असे,
 आयुष्यभर जांभूळ आख्यान, कलामंच ,लोकगीत ,भीम गीत कोळीगीत ,रंगभूमी यांनी सर्वांना आपल्या लोक गीतांनी झपाटून  टाकणाऱ्या अवलियाने गाणे गातच गातच आपला श्वास सोडला. हा अवलिया म्हणजे म्हणजे शाहीर विठ्ठल उमप.
                       

                एवढेच काय तर आजच्या आधुनिक डीजे युगामध्ये डिस्क जॉकी या क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत. आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यातील श्रेया डोनकर हिने डीजे क्षेत्रामध्ये यशाचे शिखर गाठले आहे.




                                  जगातील शंभर अव्वल डीजे महिलांमध्ये  एकमेव भारतीय असणारी डीजे आपल्याला पार्ट्यांमध्ये पाय थिरकायला लावणारी गाणी वाजवते. 

                 मित्रांनो आपल्या मुलांमधील बुद्धिमत्ता ओळखून त्यांना त्या-त्या क्षेत्रामध्ये अत्युच्च कामगिरी करण्याची संधी दिली पाहिजे.

संगीतविषयक बुद्धिमत्ता असणारे व्यक्ती करियरच्या संधी

 गायक ,
वादक 
नृत्य करणारे,
 संगीत शिक्षक,
 एवढेच काय तर वाद्य बनवणारे, 
दुरुस्त करणारे, 
संगीतकार, 
संगीत संयोजक ,
संगीत समीक्षक,
लोकगीत गायक
शाहिर,
डीस्क जॉकी
 अशा क्षेत्रातील करिअरच्या संधी  मिळवतात  आणि मोठे होतात .


https://amzn.to/2MG0uKh
BUY MUSICAL INSTRUMENTS AND BOOK

नक्की वाचा भाग बारावा

 

क्रमशः 


सचिन बाजीराव माने
 आरफळ सातारा
 98 81 32 35 84

टिप्पण्या

अरुण मोजर म्हणाले…
संगीत हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे . जीवन आणि संगीत या जीवनाच्या दोन बाजू आहेत जसे पैशांच्या नाण्यासारखे त्याशिवाय परिपुर्णता नाही