आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता पालक, शिक्षक , विद्यार्थ्यांसाठी
शिक्षण : शाळा ते करिअर
भाग बारावा
आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता
पालक, शिक्षक , विद्यार्थ्यांसाठी
" तू आयुष्यात पुढे काहीच करू शकणार नाहीस ." असं लहानपणी अभ्यासात बोंबाबोंब असणाऱ्या मुलाला शिक्षिका म्हणाली होती. अखेर एक दिवस त्या मुलाने शाळा सोडून दिली. आई-वडिलांची काळजी फारच वाढली होती. शाळेचे शिक्षण त्याला पूर्ण करतानाही परंतु अखेरीस झुरीच पॉलिटेक्नीक ही संस्था प्रवेश परीक्षेच्या गुणांवर प्रवेश द्यायची . या परीक्षेत गणित विज्ञानात चांगले गुण मिळाले. बंद पडलेले शिक्षण पुन्हा सुरू झालं. पुढे शिक्षणात कधीच खंड पडला नाही.
वरील लिंक ला टच करा आणि अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे जीवन चरित्र खरेदी करा
मित्रांनो ,हे उदाहरण कुठलेही साध्यासुध्या माणसाचं असून जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांच आहे .त्यांनी सापेक्षतेचा फार महत्त्वाचा आणि मूलभूत सिद्धांत मांडला. अल्बर्ट आईन्स्टाईन हे एका बुद्धिमत्तेचे सर्वमान्य प्रतीक आहेत. स्वतः मध्ये रमण्याची सवय व प्रयोगशील स्वभाव असल्यामुळे ते मोठे शास्त्रज्ञ झाले. गणिती दृश्य अवकाशीय व व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता यामुळे हे घडले असणार आणि म्हणूनच मित्रांनो आज ज्या बुद्धिमत्ता विषयी आपण माहिती घेणार आहे ती बुद्धिमत्ता आहे आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता .
मिळून मिसळून वागणे ,इतरांना समजून घेणे ,कायम दुसऱ्यांच्या मदतीला धावत जाणं, गप्पा मारणं हीसुद्धा एक प्रकारची बुद्धी असते आणि ही बुद्धी उपजतच सगळ्यांकडे नसते. मित्रांनो आपल्या स्वतःमध्ये आणि आपल्या मुलांमध्ये कोणती बुद्धिमत्ता आहे हे शोधण्यासाठी या बुद्धिमत्ता ची नीट ओळख असायला हवी आणि म्हणूनच डॉ. गार्डनर यांनी सांगितलेली पाचवी बुद्धिमत्ता आपण पाहणार आहोत, आंतर व्यक्ती बुद्धिमत्ता.
लहानपणापासूनच आपण इतरांशी संवाद साधत साधत आपले काम करत असतो ,मात्र मोठी झाल्यानंतर नोकरी-व्यवसाय करायला लागल्यावर व्यवहारात मात्र ही बुद्धिमत्ता जास्त नेमकेपणाने आणि सतत वापरावी लागते. ज्यांच्याकडे ती बुद्धिमत्ता असते अशा व्यक्ती कायम लोकांच्या घोळक्यात दिसतात, इतरांशी चांगले संबंध ठेवतात. मित्रांशी गप्पा मारायला काय कोणालाही आवडेल आम्ही कितीतरी वेळ मित्रमैत्रिणींशी गप्पा मारू...... असं तुम्ही म्हणाल ,पण ही गोष्ट सगळ्यांनाच आवडते आणि जमते असे नाही .काहीच जण याबाबतीत जरा खासच असतात .ते कधीच कंटाळत नाहीत. शिवाय हे सर्व प्रकारच्या माणसांना ते समजून घेतात .
प्रत्येकाशी संवाद साधण्याची त्यांची इच्छा असते. समाजात डोकावलं तर असं दिसतं की नेतेमंडळी, कंपनीतले मॅनेजर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते या बुद्धिमत्तेचे असतात .ही बुद्धिमत्ता एखाद्या कलाकाराला किंवा शास्त्रज्ञाला किंवा खेळाडूला देखील प्रत्येकालाच वापरावी लागते. परंतु काही माणसं विशेष ' सोशल' असतात.
मित्रांनो आंतर व्यक्ती बुद्धिमत्ता ही एखाद्याचं अंतर्गत जग आणि भावना खूप मोठ्या प्रमाणावर स्वतःला आणि जगाला समजून घेण्याची क्षमता असणारे बुद्धिमत्ता आहे. या बुद्धिमत्ता मुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याची नियोजन आणि व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. मुलांना काय मिळवायचे ,ते कसे मिळ्ववू शकतात, त्याच प्रमाणे आंतर व्यक्ती बुद्धिमत्ता असणारी मुले ही बऱ्याचदा इतर प्रकारच्या बुद्धिमत्तेतही उच्च गुण मिळवतात.
आंतर व्यक्ती बुद्धिमत्ता असलेल्या लोकांची वैशिष्टे कोणती ?
तर या प्रकारची बुद्धिमत्ता असणारे लोक
- इतरांना समजून घेतात जाणून घेतात
- स्वतःच ज्ञान पहिल्यांदा जाणून घेऊन त्यानुसार इतर लोक, त्यांचे जग ,त्यांचे विचार समजून घेतात .
- मित्रांनो आंतर व्यक्ती बुद्धिमत्ता असणारे व्यक्ती या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी शिकलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी स्वतःच्या जीवनामध्ये आणि मूल्यांवर ती स्वतः लागू करतात ,म्हणजेच त्याप्रमाणे वागतात.
- हे लोक सहसा त्यांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी खूप दृढनिश्चयी असतात म्हणजेच एखादी गोष्ट जर त्यांनी ठरवली तर ती पूर्ण केल्याशिवाय गप्प बसत नाहीत.
- या लोकांना एकत्र राहण्यात तेवढेच एकट्याने वागण्याचा आनंद मिळतो.
- या व्यक्तींचे आंतरज्ञान हे मजबूत असतं .
- त्यांना त्यांच्या स्वतःच्या सामर्थ्याबद्दल माहिती असते परंतु ते कधी अभिमान बाळगत नाहीत
- अशा व्यक्ती स्वतंत्र असतात आणि त्यांच्यामध्ये उच्च आत्मविश्वास असतो .
- या व्यक्तींचा स्वतःच्या भावनांवर नियंत्रण असतं .म्हणजेच विशेषत: व्यक्ती रागावत नाहीत किंवा स्वतःच्या रागावर त्यांचे नियंत्रण असतं .
- अशा व्यक्ती विविध कार्यक्रमांमध्ये स्वतः पुढे असतात आणि स्वतःच्या कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रम पूर्ण पार पाडण्यासाठी धडपडत असतात आणि यशस्वीपणे कार्यक्रम पूर्ण करतात .
- अशा व्यक्तींच्या मेंदूमध्ये कार्यक्रमाचे नियोजन ,राबवणूक आणि यशस्विता याचे तिन्ही टप्पे पूर्ण करण्याची क्षमता असते.
- भविष्यात येणाऱ्या परिस्थिती त्या सहज हाताळतात.
- घडलेल्या चुका सुधारायच्या कशा या स्वतः ह्या व्यक्तीना माहित असतात.
- अशा व्यक्ती आपल्या भावना आणि विचार सर्जनशील मार्गाने व्यक्त करतात म्हणजेच या व्यक्ती लिहितात किंवा संगीत तयार करतात त्यातून त्या व्यक्त होतात .
चला तर बघूया आपण आणि आपली मुलं तर व्यक्ती बुद्धिमत्तेची आहेत का? हे ओळखण्यासाठी एक सोपी टेस्ट आहे हे जरूर करा ती करण्यासाठी कुठे बाहेर जायला लागणार नाही ,पेपर लागणार नाही .मुलांना घरच्या घरी स्वतःबद्दल आणि आपल्या मुलांबरोबर चार प्रश्न विचारा.
- मित्र मंडळ आहे का?
- इतरांना मदत करायला मनापासून आवडतं का?
- इतरांनाही तुम्हीच हवे असता का ?
- जवळचे म्हणता येतील असे अनेक मित्र-मैत्रिणी तुम्हाला आहेत का ?
या चार प्रश्नांची उत्तरे जर होय आली तर आपल्या मध्ये किंवा आपल्या मुलांमध्ये निश्चितच आंतर व्यक्ती बुद्धिमत्ता आहे हे स्पष्ट होईल.
मित्रांनो या प्रश्नांची उत्तरे होय आल्यानंतर आपण आणि आपल्या मुलांमध्ये आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता क्षमता विकसित करण्यासाठी कोणत्या कृती कराव्यात
हे आपण पाहूया
- आंतर व्यक्ती बुद्धिमत्ता असणाऱ्या मुलांना कार्यक्रमाचे निवेदन करणे ,वर्ग पुढे किंवा एखाद्या कार्यक्रमात बोलण्याचा ,गोष्ट सांगण्याचे ,पाहुण्याचं स्वागत करण्याचे काम आवश्य करू द्या .
- आपल्या मुलांना आपल्या वस्तीत ,सोसायटीत इतरांच्या मदतीने एखादा कार्यक्रम स्वतः आयोजित करायला लावा .
- त्यात मुलांना भाग घेऊ द्या.
- क्रिकेट, फूटबॉल, हॉकी असे समूहाने खेळायचे खेळ आवश्यक खेळूद्या .
- आजी आजोबांबरोबर वेळ घालू द्या ,त्यांच्या लहानपणाच्या विषयी माहिती घेऊ द्या .
- आपल्या बरोबर खरेदीला घेऊन जा.
- घरी पाहुणे आले असतील तर नियोजनात त्यांची मदत आवश्य घ्या .
- खेळ ,कार्यक्रम, सहली यांचे नेतृत्व करायची संधी द्या.
यातून मुलं जबाबदारी घ्यायला शिकतील आणि आणि वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून त्यामध्ये होणाऱ्या चुकीच्या संधी मुले शिकतील.
नेहमी आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती या प्रत्येक कठीण परिस्थितीतून सकारात्मक विचार करून मार्ग काढतात आणि जीवनामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही की जे आपण मिळवू शकत नाही, प्राप्त करू शकत नाही किंवा त्यातून मार्ग काढू शकत नाही .अशा व्यक्ती जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाहीत .
आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता असणाऱ्यासाठी करिअरच्या कोणत्या संधी आहेत ते आपण पाहूया:
प्रशासक
व्यवस्थापक
शाळेचे मुख्याध्यापक
कार्मिक कामगार
लवाद
समाजशास्त्रज्ञ
मानववंशशास्त्रज्ञ
समुपदेशक
मानसशास्त्रज्ञ
नर्स
जनसंपर्क व्यक्ती
ट्रॅव्हल एजंट
सामाजिक संचालक
या क्षेत्रांमध्ये यशस्वी होताना दिसतात
आपल्या मुलांमधील आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता ओळखून त्यांना त्या विकसित करण्याच्या तसेच आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विविध करिअरच्या संधी उपलब्ध करून देऊ या .
क्रमशः
सचिन बाजीराव माने
आरफळ सातारा
98 81 32 35 84


टिप्पण्या