शारीरिक किंवा स्नायु विषयक बुद्धिमत्ता

शिक्षण : शाळा ते करिअर 


भाग तेरावा 

शारीरिक किंवा स्नायु विषयक बुद्धिमत्ता


 पालक शिक्षक विद्यार्थ्यांसाठी 


                                मित्रांनो प्रत्येक मूल हे अद्वितीय आहे आणि प्रत्येक मुलांमध्ये हे त्याच्या व्यक्तिमत्त्व कौशल्याचे संचावर आणि शिकण्याच्या शैलीवर परिणाम करतं .सध्याच्या शैक्षणिक परिस्थितीमध्ये मुलं त्यांच्या कलेने शिकतात हे आपण पाहिलं शारीरिक हालचाली आणि व्यस्तता असणाऱ्या मुलांमध्ये सर्वात जास्त कृती दिल्या ते मूल अधिक गतीने शिकतं  हे आपण पाहिलं. जी मुलं गतिशील आहेत, शारीरिक दृष्ट्या सक्रिय आहेत, खेळांमध्ये रस आहे अशी मुलं खेळ नाचणे हस्तकला आणि इतर कामांमध्ये आनंद वाटतो या मुलांमध्ये शारीरिक किंवा स्नायूविषय बुद्धिमत्ता असते.
मित्रांनो प्रत्येक मूल हे अद्वितीय आहे आणि प्रत्येक मुलांमध्ये हे त्याच्या व्यक्तिमत्त्व कौशल्याचे संचावर आणि शिकण्याच्या शैलीवर परिणाम करतं .सध्याच्या शैक्षणिक परिस्थितीमध्ये मुलं त्यांच्या कलेने शिकतात हे आपण पाहिलं शारीरिक हालचाली आणि व्यस्तता असणाऱ्या मुलांमध्ये सर्वात जास्त कृती दिल्या ते मूल अधिक गतीने शिकतं  हे आपण पाहिलं. जी मुलं गतिशील आहेत, शारीरिक दृष्ट्या सक्रिय आहेत, खेळांमध्ये रस आहे अशी मुलं खेळ नाचणे हस्तकला आणि इतर कामांमध्ये आनंद वाटतो या मुलांमध्ये शारीरिक किंवा स्नायूविषय बुद्धिमत्ता असते.

                            उत्कृष्टरित्या वाद्य वाजवण्यासाठी बोटांच्या स्नायूंवर योग्य नियंत्रण असावं लागतं. हे नियंत्रण असेल तरच वादक हवी ती सुरावट वाद्यांमध्ये काढू शकतात .म्हणूनच विविध वाद्य वाजवणारा वादक यांमध्ये देखील शारीरिक बुद्धिमत्ता असते .


                             नर्तक मध्ये सुद्धा ही शारीरिक बुद्धिमत्ता असणे आवश्यक आहे अभिनय ,हात आणि पाय यांच्या तालबद्ध समन्वयातून सुंदर नृत्य आकाराला येते नृत्य करताना समन्वय महत्त्वाचा असतो .


                 अभिनय क्षेत्रात करिअर करणाऱ्यांमध्ये शारीरिक बुद्धिमत्ता असते .अभिनेत्याला आपल्या चेहऱ्यावरच्या स्नायूंवर नियंत्रण ठेवावं लागतं .हे नियंत्रण योग्य असेल तर त्याचा अभिनय अधिकच खुलत जातो .अभिनयाला जोड हवी असते ती त्याच्या आवाजाची ! आनंद ,दुःख  त्याच्या आवाजातून व्यक्त करायचे असतात. आवाजाची पट्टी सांभाळायचे असते अभिनय हा कुठेही नकली असून चालत नाही .त्याचप्रमाणे 'लाऊड' असूनही चालत नाही.


     गायन क्षेत्रासाठी साठी सुद्धा आवश्यक असतं .आवाजाचे संबंधित स्नायू चांगल्या प्रकारे काम करतात .त्यातून त्यांचं गाणं बहराला येतं


                    फुटबॉल क्रिकेट खेळत असताना आपल्या शरीर आणि स्नायूंवर नियंत्रण राखून खेळावे लागतात .एखादा खेळ खेळायचा म्हणजे कमावलेले शरीर पाहिजे.  कित्येक तास खेळता आले पाहिजे. परंतु मित्रांनो फक्त शारीरिक बुद्धिमत्ता असून चालणार नाही तर त्याच्या जोडीला इतरही बुद्धिमत्ता असावे लागतात .


                   चांगला कसलेला अभिनेता किंवा खेळाडू हा गणिती बुद्धिमत्ता मध्ये सुद्धा तितकाच हुशार असतो कारण फक्त शरीर कमावलं म्हणजे खेळ खेळता आला असं नाही याउलट बुद्धिमत्ता ज्यांच्याकडे असेल ते शक्यतो इतर बुद्धिमत्ता त्यांमध्ये सुद्धा चपळ असल्याचे दिसून येते किंवा इतर बुद्धिमत्ता जास्तीत जास्त विकास होण्यामध्ये शारीरिक बुद्धिमत्ता एक घटक बनते. जर बुद्धीमध्ये मध्ये चपळता समन्वय तोल राखणे सांभाळणे समतोल या गोष्टी असतील तर अशा बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तींना कलाविषयक वाद्य विषयक इतर गोष्टींमध्ये कौशल्य प्राप्त करता येते 


                    मित्रांनो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या  मित्रांनो महेंद्रसिंग धोनीने त्याच्या क्रिकेट आणि फुटबॉल मधील असणाऱ्या आवडी मुळेच बारावी नंतरचे शिक्षण सोडून दिले आणि आपली आवड जोपासली. त्यानंतरचा सर्व प्रवास आपणास माहीत आहे.भारतीय क्रिकेट टीमचा कार्य कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी मित्रांनो उत्कृष्ट कॅप्टन कधी होतो ज्यावेळेस तो इतर सर्व खेळाडूंमध्ये समन्वय असेल आणि प्रतिस्पर्ध्याला हरवण्यासाठी चे सर्व कौशल्य पणाला लावेल उत्तम बॅट्समन, उत्तम बॉलर यांना योग्य दिशा देऊन आपला संघ कसा विजय होईल याचं परिपूर्ण प्लॅनिंग असेल.
मित्रांनो महेंद्रसिंग धोनीच्या धाडसी निर्णय टीम मधील समन्वय उत्तम बॅट्समन उत्तम प्रशासक सर्वांना सामावून घेण्याची शक्ती कौशल्य या जोरावर  2011साली आपण विश्वविजेते झालो. महेंद्र सिंग धोनी मध्ये असलेल्या गणिती बुद्धिमत्ता आणि आंतरबुद्धिमत्ता यांचा उत्तम समन्वय राखून जगातील सर्वोत्कृष्ट कॅप्टन झाला.


                         मित्रांनो महेंद्रसिंग धोनीच्या धाडसी निर्णय टीम मधील समन्वय उत्तम बॅट्समन उत्तम प्रशासक सर्वांना सामावून घेण्याची शक्ती कौशल्य या जोरावर  2011साली आपण विश्वविजेते झालो. महेंद्र सिंग धोनी मध्ये असलेल्या गणिती बुद्धिमत्ता आणि आंतरबुद्धिमत्ता यांचा उत्तम समन्वय राखून जगातील सर्वोत्कृष्ट कॅप्टन झाला.
वरील  लिंक ला टच करा आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवन चरित्र पुस्तके खरेदी करा

                                   मित्रांनो शारीरिक बुद्धिमत्ता असलेले लोक हे

  •  वस्तू बनवण्यात किंवा गोष्टी कशा कार्य करतात हे शोधण्यात आनंद घेतात
  •  त्यांनी आपले हात वापरतात आवडतात आणि खूप सक्रिय असतात 
  • त्यांच्याकडे उत्तम असे शारीरिक कौशल्य आणि समन्वय असतात
  •   बुद्धिमत्ता म्हणजे समन्वय ,संतुलन ,कौशल्य व  सामर्थ्य आणि धाडस आवश्यक असतं .
  • आपल्या शरीरात हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अचूकता लागते.

                        मित्रांनो आपला मुलगा डॉक्टर व्हावेसे वाटते आपण फक्त त्यांना गणित व बुद्धिमत्ता याविषयी कौशल्य आत्मसात करून उपयोगाचे नाही जर तो शल्यचिकित्सक झाला आणि एखादी शस्त्रक्रिया करत असताना जर त्याच्या हात पाय कापायला लागले तर फक्त गणिती बुद्धिमत्ता असून उपयोगाचे नाही तर शारीरिक किंवा बुद्धीमत्ता असावीच लागत.    यासाठी निरोगी खाणे व्यायाम करणे या गोष्टी सुद्धा येतातच

 शारीरिक बुद्धिमत्ता असणाऱ्या मुलांच्या कृती

  1. सायकलची शर्यत लावायला अशा मुलांना आवडतं
  2.  व्यायाम करायला अशा मुलांना मनापासून आवडतं 
  3. अशी मुले मैदानावर  एकटी  रमतात 
  4. मुलं सहजपणे नाच करून दाखवतात
  5.  अशा मुलांना पण फेयर मधले खेळ मनापासून आवडतात 
  6. हे मुलं एका जागी स्थिर राहत दिसत नाहीत हे मला सतत गतिमान असल्याचे दिसून येतं म्हणजे वाचन करताना लिहीत असताना पाया पडणे खांदे उडवणे मान हलवणे अशा क्रिया करतात
  7.  या मुलांना वैयक्तिक क्रीडा प्रकारात किंवा सांघिक खेळ खूप आवडतात ,खेळ खेळतात
  8.  मार्शल आर्ट्स, वाद्य वादन ,अभिनय, नृत्य यांसारख्या कृतींना पसंती देतात .
  9. हस्तलेखन ,चिकन मातीसह काम करणे, पकडणे ,वस्तू बनवणे.
  10.  चालणे ,धावणे, बसणे यावर त्यांचे नियंत्रण असतं आणि तशातच कृती करण्यात पसंती देतात .
                     या शारीरिक कौशल्यांची संधी मुलांना दिली तर मुलाच्या विकासासाठी उत्कृष्ट फायदा होतो

 गतिमंद मुलांच्या शिक्षणामध्ये मदत होते .मुलांचा फिटनेस आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींमुळे मेंदूला अधिक ऑक्सिजन पाठवले जातो. ज्यामुळे मुलांचा विचार करण्यासाठी खूप मदत होते .आपल्या मुलांमध्ये अशी कौशल्ये येण्यासाठी मुलांना खेळू द्या. खेळामुळे त्यांच्या शिक्षण प्रक्रिया गती मिळते.

https://amzn.to/2Ybqi6q

वरील लिंक ला टच करा आणि मुलांसाठीची विविध खेळसाहित्य खरेदी करा


  शारीरिक विषय बुद्धिमत्ता वाढवण्यासाठीचे काही कृती मुलांना दिले पाहिजेत.


  1.  यामध्ये मुलांना दररोज व्यायाम करणे  
  2. वैयक्तिक खेळ खेळणे
  3.  नृत्य करणे
  4.  वाद्य वाजवणे 
  5. अभिनय करणे
  6. मातीपासून वस्तू आकार तयार करणे
 दररोज मुलांना शारीरिक खेळाची साखळी देणे-  म्हणजेच उड्या मारणे> सरपटणे>  चालणे > वेगाने धावणे > नागमोडी पळणे >अडथळ्यांवरून उडी मारणे >लंगडी > सायकलिंग> एका पायावर उडी मारणे >उलटे चालणे अशी दररोज दहा कृतींची साखळी देणे.


                   अभ्यासाबरोबरच खेळांच्या कृती मुलांना दिल्या तर मुलांची अभ्यासाची   गती  वाढते. 


शारीरिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तींना खालील करिअरच्या संधी 


आरोग्य विषयक व्यवसायांमध्ये
 शस्त्रक्रिया
 नर्सिंग 
शारीरिक चिकित्सा 
आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ आणि करमणूक थेरपीचा समावेश होतो

 जर कला क्षेत्रामध्ये आवड असेल तर त्यात 
अभिनेता 
नर्तक
 कलाकार 
चित्रकला शिल्पकला हस्तकला किंवा डिझाईन 
   या क्षेत्रांचा समावेश होतो 

शारीरिक शिक्षण आणि क्रिडा व्यवसायांमध्ये
 वैयक्तिक प्रशिक्षक
 एरोबिक्स प्रशिक्षक
 शारीरिक शिक्षण शिक्षक आणि व्यवसायिक खेळाचे प्रशिक्षक यांचा समावेश होतो

 व्यापारविषयक 
सुतारकाम 
लाकूडकाम 
मेकॅनिक
 फॅक्टरीचे काम यांचा समावेश होतो

 आणि इतर व्यवसायांमध्ये
 टपाल वाहक  
अग्निशामन कर्मचारी
 पोलिस अधिकारी
 रेंजर आणि सैन्य दलातील  अधिकारी  कर्मचारी  अशा संधी मुलांना  प्राप्त होतात.

buy gymnastics equipments



क्रमश
 सचिन बाजीराव माने 
आरफळ सातारा 
98 332 35 84

टिप्पण्या