दृश्य अवकाशीय बुद्धिमत्ता

शिक्षण : शाळा ते करिअर


 भाग पंधरावा

 दृश्य अवकाशीय बुद्धिमत्ता 


पालक शिक्षक आणि सर्वांसाठी

नसेल वाचला तर नक्की वाचा 


                                      इयत्ता पाचवीच्या आमच्या वर्गास श्री शिव सुब्रमण्य नावाचे शिक्षक होते . एके दिवशी त्यांनी ' पक्षी कसे उडतात ?' या विषयावर तास घेतला .त्यांनी फळ्यावर पक्षाचे चित्र काढणे ,त्याला पंख ,शेपूट ,शरीर काढले आणि पक्षी पंख फडफडताना कशाप्रकारे'  लिफ्ट ' कसे करतात व उडताना दिशा बदलण्यासाठी कसा वापर करतात, हे सविस्तर समजून सांगितले . तास संपल्यानंतर त्यांनी विचारलं की," मी तुम्हाला जे शिकवलं ते तुम्हाला समजलं का ?" मी सांगितलं की ,"मला नाही समजलं." बाकीच्या मुलांनीही आम्हालाही नाही समजलं असं सांगितलं. या उत्तरावर चिडले नाहीत.

                            त्यांनी आम्हाला संध्याकाळी समुद्रकिनारी यायला सांगितले .त्या संध्याकाळी आम्ही सगळेजण रामेश्वरमच्या सागर किनाऱ्यावर जमलो .आमच्या सरांनी आम्हाला समुद्रपक्षी दाखवले आणि विचारलं," सांगा आता हे पक्षी उडताना कसे दिसतात ?,ते पंख कसे उडतात पंख फडफडतात. पक्षी आपल्याला वेगवेगळ्या दिशेला पंख वळवण्यासाठी शेपटी चा वापर कसा करतात याचं निरीक्षण आम्हाला करायला सांगितलं आणि त्यांनी प्रश्न केला पक्षाचे इंजिन कुठे आहे आणि त्याला शक्ती कशी मिळते त्यांनी समजावून सांगितले .

                             पक्षाला स्वतःची स्वतःला शक्ती असते आणि त्यामागे त्याला जे हव आहे त्या गोष्टीची प्रेरणा असते. या सगळ्या गोष्टी आम्हाला प्रत्यक्ष जीवनातल्या उदाहरणाने समजून दिल्या माझ्या दृष्टीने केवळ पक्षी कसे उडतात हे समजून घेतला विषय संपला असं घडलं नाही .पक्षाच्या भरारी वरच्या धड्यानं  माझ्या मनात एक खास जाणीव निर्माण केली .मनाशी पक्क ठरवलं की यापुढे अभ्यास करायचा तर उड्डाण आणि उड्डाण पद्धतींविषयी .

                             मित्रांनो अय्यर सरांच्या  शिकवण्याच्या या प्रसंगाने माझ्या भावी करियर ठरवायला मदत झाली. यानंतर मी सरांना पद्धतीविषयी विचारलं त्यांनी मला मार्गदर्शन केलं .पुढे मी भौतिकशास्त्राचा अभ्यास केला मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंग शाखा निवडली. माझ्या शिक्षकांचा उपदेश व आकाशात भरारी घेणारे पक्षांचे प्रत्यक्ष पाहिलेल्या उदाहरण यांनी मला काही उद्दिष्ट दिले .जीवन  दिल .हे माझ्या जीवनातील महत्त्वपूर्ण वळण ठरलं.


                     यानंतर मी रॉकेट इंजिनियर व स्वतंत्र व्यक्ती बनलो. या जोरावर मी भारताचा पहिला उपग्रह अंतराळात पाठवण्यासाठी चा प्रक्षेपक  slv-3 तयार करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली .


मित्रांनो ही थोर महान व्यक्ती म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम होत. अब्दुल कलाम यांच्या मध्ये व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता असल्यामुळे त्यांना स्व'ची जाणीव होती . त्याच बरोबर दृश्य अवकाशीय बुद्धिमत्ता असल्यामुळेच पुढे त्यांनी अनेक रॉकेट लॉन्च डिझाईन केले .' मिसाईल मॅन 'म्हणून ओळख असणारे डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुढे भारताचे राष्ट्रपती झाले.


वरील लिंक ला टच करा आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवन चरित्र पुस्तक विकत घ्या

                  मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अवकाशीय बुद्धिमत्ता.


 मित्रांनो रिकाम्या जागेचा योग्य वापर करून नीट योजना आखून कागदावर एखादं चित्र चितारणं. तर कधी एखाद्या इमारतीचा प्लॅन तयार होतो .धरण ,रस्ते ,पूल आकारले जातात. अवकाश म्हणजे अंतराळ नाही तर कुठलीही मोकळी जागा, मोकळ्या जागेचा विचार त्यांना अतिशय उत्तम पद्धतीने करता येतो .ते दृश्य बुद्धिमत्तेचे असतात केवळ कल्पना करणं आणि त्यातून म्हणजेच काही अस्तित्वात नसताना नवीन वस्तू तयार करता येणे आणि ती वस्तू उत्कृष्ट बनवणे यासाठी ही बुद्धिमत्ता लागते .


एखाद्या वस्तूत नवीन आणि अत्यंत उपयुक्त बदल सुचवतात .केवळ मनाने कल्पना करून एखादी संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे ही एक विशेष बुद्धिमत्ता असते.


अवकाशीय बुद्धिमत्ता असणारी काही उदाहरणे


 चित्रकार कल्पनेने चित्र तयार करतो. ते चित्र पूर्ण झाल्यानंतर कसे दिसेल, त्यात कोणते रंग भरले तर ते खुलून दिसतील, कोणता रंग चांगला दिसणार नाही या कल्पनेने ताडून बघत असतो आणि त्यानुसारच कागदावर किंवा इतर कोणत्याही माध्यमातून व्यक्त होत असतो .

आर्किटेक्ट कागदावरती इमारतीचा प्लॅन मनात दृष्टीने  तयार करतो सर्व उतरून तयार होतो आणि हा तयार झालेला प्लॅन प्रत्यक्ष इमारत उभी झाल्यानंतर कागदावरचा प्लॅन प्रत्यक्षात येतो. परंतु सुरुवातीला केलेला प्लॅन हा दृश्य अवकाशीय बुद्धिमत्तेचे उदाहरण आहे . 
इंजीनियर ने तयार केलेले यंत्र आधी मनात तयार झालेलं असतं .

त्याचप्रमाणे अनेक ड्रायव्हर्स गुंतवणुकीच्या रस्ते लक्षात ठेवून रहदारीतून मिळालेल्या जागेतून सफाई पणे मार्ग काढत जात असतात हे सुद्धा याच बुद्धीमत्तेचे उदाहरण आहे . 
कापडाचं रूपांतर कपड्यात करणारे कारागीर, फॅशन डिझायनर ,मेकअप आर्टिस्ट ,तज्ञ विविध वस्तू निर्माण करणारे डिझाईनर या बुद्धिमत्तेचे असतात. 
साध्या सुई पासून ते थेट रॉकेटचे डिझाईन बनवणारे संशोधक हे  दृश्य अवकाशीय बुद्धिमत्तेचे उत्तम उदाहरण असतात. 

चित्रकार, शिल्पकार ,ड्रायव्हर्स ,फोटोग्राफर्स, इंटेरियर डिझायनर हे या प्रकारची बुद्धिमत्ता  उदाहरणे आहेत.

                          मित्रांनो आपल्या घरातील मुलांमध्ये अवकाशीय बुद्धिमत्ता आहे का?


 लहान मुलं केवळ कल्पना करून खरंच सुंदर चित्र काढत असतील तर ही एक विशेष बुद्धिमत्ता आहे .कागदाचा आकार किती आहे बघून ते कसे सुबक दिसेल  अशा पद्धतीने चित्र काढणे ,चित्र कधीकधी खोलीचा देखील विचार केलेला असतो .रंगसंगती कोणती चांगली दिसेल हा   विचार मनात करून  ठेवलेले असतात .
नाहीतर माती कामातून एखादी वस्तू बनवलेली असते. पुतळा बनवणे, चित्र काढणे हे पाच सहा वर्षाच्या मुलांकडून अपेक्षित नाही असू शकते अर्थात यातही कौशल्य मात्र त्यापेक्षा एकदम मजेत मजेशीर केवळ त्यांच्या असू शकतील अशा कल्पना. प्रत्यक्षात उतरल्या तर त्यांना म्हणायचं बुद्धिमत्तेची चमक .
                 साधे चित्र मात्र त्याची सजावट मात्र अफाट आणि अचाट पद्धतीने करतात अवकाशीय बुद्धिमत्ता असणाऱ्यांच्या काही माणसांमध्ये नक्कीच असते .


ज्या मुला-मुलींमध्ये बुद्धिमत्ता असते त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेला योग्य आकार देण्यासाठी अशा काही गोष्टी जरूर कराव्यात


  •  कागद पेन्सिल माती कॅमेरा आपल्याला आवडतील त्या गोष्टी जवळच ठेवाव्यात त्याचा केव्हाही उपयोग होऊ शकतो
  •  नकाशे काढण्याचा सराव करावा.
  •  5-6 वस्तू गोळा करून त्यातून स्वतःच्या कल्पना वापरून नवीन वस्तू तयार करावी.
  •  एकच वस्तू विविध दृष्टिकोनातून काढून बघावी उदाहरणार्थ बाटली वर्ग फुल यांची वेगवेगळ्या दिशेने दिसतील अशी सर्व चित्रे काढावीत .
  • रुबिक्स क्यूब खेळणे .
  •  जोडो ढोकळे या पासून विविध वस्तू तयार करणे .
  • कोडी सोडवणे.
  • बुद्धिबळ / लेगोस हे खेळ खेळणे.
  • संगीत तयार करणे.
  • ओरिगामी कागद काम करणे .
  • मूर्ती , मातीच्या विविध वस्तू बनवणे.
वरील लिंकला टच करा आणि आपल्या मुलांचे कौशल्य विकसित होणारे खेळ खरेदी करा



यासारख्या गोष्टी केल्यामुळे अवकाशी बुद्धिमत्तेचा चालना मिळेल.



लिओनार्दो दा विंची ,पाब्लो पिकासो ,वॉल्ट डिस्ने, रवींद्रनाथ टागोर, एस एच राजा, एम एफ हुसेन, सर विश्वेश्वरय्या, एपीजे अब्दुल कलाम असे अनेक अवकाशी बुद्धिमत्तेचे तारे आहेत .


वरील लिंक ला टच करा व डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या विषयीचे मराठी पुस्तके खरेदी करा वाचा

  अवकाशीय बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींना खालील करिअरच्या संधी आहेत 


आर्किटेक्ट
 कला दिग्दर्शक 
कलाकार 
संगणक 
फॅशन डिझाइनर 
ग्राफिक डिझायनर
 अंतर्गत सजावटकार
 छायाचित्रकार 
व्हिडिओ संपादक 
सर्वेक्षण करणारा 
संशोधक 
इंजिनीयर
 ॲनिमेटर 
दिग्दर्शक 
खगोल शास्त्रज्ञ 
या संधी आपल्या  मुलांना उपलब्ध करून देऊ या.
वरील लिंकला टच करा आणि आपल्या मुलांमध्ये ही बौद्धिक कौशल्य येण्यासाठीचे खेळ खरेदी करा


 मुलांना समजून घेऊया.

तेव्हा नक्की वाचा

 क्रमश: 
 सचिन बाजीराव माने 
आरफळ सातारा 
98 81 32 35 84

टिप्पण्या

प्रेरणा म्हणाले…
खूपच प्रेरणादायी गोष्टी उदाहरणांसहित मांडत आहात.खूपच छान..!!
rajumeshram म्हणाले…
सुंदर लेख.समर्पक उदाहरणे.छान स्पष्टीकरण