मुल घडवताना भाग तिसरा

शिक्षण:  शाळा ते करिअर

 मुलं घडताना .....

 भाग तिसरा

                  मुलांच्या घडण्याची सुरुवात ही आपल्या घरापासूनच होते .आपल्या घरातील सर्व व्यक्ती, शेजारीपाजारी, नातेवाईक ,आजूबाजूचा परिसर यामध्ये मुलांचे शिक्षण घडते आणि पहिली सुरुवातीचे सहा वर्ष मुलांचे जडणघडणीमध्ये खूप महत्त्वाचा पाया रचणारी असतात . आपण मुलांना प्रत्येक वेळी समजून घेतला पाहिजे. आपण मुलांना लोकशाही मार्गाने घडवले पाहिजे मात्र आपण हुकूमशहा नसावे .मुलांच्या वाढ व विकासामध्ये नकारांचा अडथळा न बनता , आत्मविश्वास व शाबासकी या प्रेरणांची गती दिली पाहीजे.

                आज आपण मुलांच्या व्यक्तिमत्वाला घडवणारी वयाची सहा वर्षे बारा वर्ष असा किशोरावस्थेत मुलांचा विकास बघणार आहे .
                  
                 या काळामध्ये मुलांचे प्राथमिक शिक्षण सुरू होते .आपण मुलांना शाळेमध्ये घालतो. पण याच वेळी मुलांचा टोळीचा काळ सुरू होतो .आता तुम्ही म्हणाल टोळीच काळ म्हणजे काय ? तर आपला मुलगा त्याच्याबरोबरच्या वयाच्या मुलांबरोबर  समूहाचा सदस्य बनतो .यामध्ये तो गटाचे नेतृत्व करतो . जर मुलाच्या घरांमध्ये सर्व कौशल्यांना तीन ते सहा वर्षांपर्यंत वाव दिला असेल ,त्याच्याशी प्रेमाने वागले असेल, समजून घेतले असेल तर अशी मुले गटाचे नेतृत्व करतात. पण जर घरातील वातावरण तिरस्काराने  भरलेले, रागावलेले असेल मुलाला जर सारखी हेटाळणी होत असेल तर मात्र या गटामध्ये मुलगा बाजूला पडतो एकांगी होतो चिडचिडा होतो.

                   या अवस्थेमध्ये मुलांच्या शरीराची वाढ ही मोठ्या प्रमाणावर होत असते. मुलाच्या वयाच्या वाढीबरोबर त्याचं वजन वाढत असतं आणि त्याच्या शरीराच्या अवयवांना योग्य प्रकारची प्रमाण मिळते .म्हणजे त्याचे कायम दात आल्यामुळे त्याचा तोंडाचा चेहऱ्याचा आकार मोठा होतो. लहानपणी जर त्याचे डोके शरीरापेक्षा मोठे असेल तर मोठा होईल तसे वयाबरोबर त्याचे डोके ही शरीराच्या प्रमाणात बरोबर राहील . त्याचप्रमाणे या वयामध्ये मुलांची मानसिकता ही शरीर वाढीबरोबर बदलत असते. म्हणजे त्याचे केस ,दात ,हात-पाय हे वाढत असल्यामुळे त्याच बरोबर मुले या अवस्थेतून बाहेर पडत असताना सुंदर दिसायला लागतात,.

                    पण जर त्यामध्ये बिघाड झाले म्हणजे दात पडले ,मुलाचे डोळे - कान बिघडले टॉन्सिल्स वाढले, विकलांगपणा आला किंवा त्यांना काही काल्पनिक आजार होतात आणि या परिस्थितीमध्ये मुलंही काल्पनिक  आजारी पडतात किंवा छोटासा आजार असला तरी मुलांना तो खूप मोठा असं वाटायला लागतं आणि त्यामुळेच एकांगी बनतात, एकाकी पडतात .

                      या परिस्थितीमध्ये आपण घरातील लोक मुलांना धीर देऊन त्यांचा आजार बरा होईल यासाठी त्यांना आत्मविश्वास देणे. या काळामध्ये आपण अंधश्रद्धा उपाय करु नयेत. म्हणजे जर मुलाच्या पोटात दुखत असेल तर रेच काढणे, लिंबू उतरणे  या अंधश्रद्धानी  मुलाचा आजार बरा होत नाही . परंतु आम्ही अंधश्रद्धेत अडकून पडतो. आपण असं बघितलं  तर  जसजसा मुलगा शरीराने वाढतो त्याचबरोबर  त्याच्यामध्ये मानसिक बदल होत असतात.  यावेळेस आपण पालक म्हणून  मुलांची काळजी नव्हे तर आत्मविश्वास म्हणून त्यांच्याबरोबर असावे .

                  मुलं शाळेमध्ये आणि खेळांमध्ये वेगळी कौशल्य वापरत असते. मुलांना स्वतंत्रपणे खेळण्याची कृती करण्याची संधी दिली तर मुलगा गटाचे नेतृत्व करतो आणि सर्व खेळातील कौशल्य आत्मसात करतो .पण जर आपण मुलाला पांगुळ बनवलं तर त्याला ती कौशल्य वापरता आली नाहीत. मुलगा मागे पडतो आणि एकटा राहतो .जर घरामध्ये आपल्या वातावरण सर्वांना सामावून घेणार असेल ,सर्वांचा विचार करणारं असेल तर मुलगा सुद्धा शाळेत मुलांमध्ये सामावून जातो .जर घरामध्ये भांडण, राग, द्वेष असेल किंवा खूप  मुलाविषयी चिंता काळजी असेल तर सहसा मुलगा सर्व मुलांमध्ये सहभागी होत नाही .

                   मुले या वयामध्ये वेगवेगळी कौशल्य, गोष्टी शिकत असतात.आपण त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे शाब्बासकी दिली पाहिजे .आपण समजतो की या छोट्याशा मुलांना काय जमणार परंतु या वयातच मुलगा पाहिजे ती गोष्ट करू शकतो, कौशल्य मिळवू शकतो .

                 या वयातच मुलं स्वतः सायकल चालवायला शिकतात .आता  सर्वांनाच माहीत आहे की सायकल शिकणे ही सोपी गोष्ट नाही. या सायकल शिकत असताना तोल सांभाळणं ,आपल्या सर्व इंद्रियांवर ती ताबा मिळवतात, नियंत्रण ठेवतात. एकाच वेळेला डोळ्यांनी बघायचय ,ब्रेक लावायचा ,सायकल चालवायची ,तोल सांभाळायचा आहे ही सगळी कौशल्य मुलगा प्राप्त करत असतो आणि अशा वेळेस जर आपण मुलांना ती कौशल्य प्राप्त करत असताना जर त्यांना अडवलं .तू पडशील, तुला लागेल ,सावकाश चालव सायकल ,मित्रांना घेऊन जा, अशी काळजी करत राहिलो तर मुलांच्या शिकण्याच्या अडथळे निर्माण होतात. त्याची शिकण्याची गती कमी होते . या वयातच मुलं पोहायला सुद्धा शिकतात .अशावेळेस आपण आधीच घाबरलेला असतो .माझ्या मुलाला पोहायला येईल की नाही काय होईल त्याचं परंतु जे धाडशी पालक असतात ते स्वतःच्या मुलांना स्वतः  पोहायला शिकवतात.

                     याच काळामध्ये मुली भांडी घासणे ,स्वयंपाकात मदत करणे, सफाई काम करणे या गोष्टी शिकतात .जर घरामध्ये लहान भाऊ किंवा मोठा भाऊ असेल तर तो सुद्धा घरात या कामांमध्ये मदत करतो. अशा वेळेस मुलांना आणि मुलींना हे काम करण्याची संधी दिली पाहिजे .जर आपण त्यांना अडवलं तर त्यांचं ते कौशल्य मिळवत नाहीत आणि मुलं मोठी झाल्यानंतर आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो मुलींनी स्वयंपाक करावा ,मुलांनी झाडू मारावे. त्यावेळेस मुलं आपलं ऐकत नाहीत.

                        ज्या घरांमध्ये असे वातावरण असेल ती दोन्ही मुले किंवा म्हणजे मुलगी किंवा मुलगा असा भेद न राहता दोघे एकत्र काम करतात आणि प्रत्यक्षात ज्या वेळेला समाजामध्ये ती मोठी होतात तेव्हा कोणत्याही कामांमध्ये त्यांना लाज वाटत नाही.म्हणून लहानपणातच या गोष्टींची वळण आपणास लावता आले पाहिजे आणि  वळण लावणे म्हणजेच खरे शिक्षण होय .यामध्ये मूलं झाडावर चढणे ,स्केटिंग करणे ,मातीच्या लाकडाच्या वस्तू बनवण्याचे शिकतात .

                    मुलाच्या सहाव्या वाढदिवसापर्यंत हा मुलगा डावखुरा आहे की  उजव्या हाताने कामे करणार आहे  हे स्पष्ट होते .आपल्या आजूबाजूला सर्व ठिकाणी वेगवेगळे अवजारे ,वस्तू या उजव्या हाताने काम करण्याच्या दृष्टीनेच बनवलेले असतात. कारण जगामध्ये बरेच लोक हे उजव्या हातानेच काम करणारे असतात .जर डावखुरा मुलगा असेल तर त्याला मात्र काही अडचणी येतात. मुलाचा शरीराचा विकास या वयामध्ये घडवून आणायचं असेल तर आपण प्रत्येक वेळी मुलांबरोबर स्वतः  ती गोष्ट केली तर मुलांमध्ये अधिक आत्मविश्वास येतो आणि मुलं घडण्यामध्ये आपलाही खूप मोलाचा वाटा राहील !

                      या काळामध्ये आपण पालक शक्यतो दुर्लक्षच करतो . या छोट्याशा बाळाला माझ्या काहीही जमणार नाही हा समज पहिल्यांदा पण डोक्यातून काढून आपण मुलाच्या बरोबर स्वतः उभे राहून प्रत्येक गोष्ट करू लागलो तर तो मुलगा कधीही मोठा झाल्यानंतर धडपडणार नाही  तर  मोठेपणी  आपल्याच पाठीशी खंबीरपणे उभा राहील .



 क्रमशः

सचिन बाजीराव माने
आरफळ सातारा
 98 81 32 35 84

टिप्पण्या

अरुण मोजर म्हणाले…
याच वयात मुले हट्ट सुद्धा करतात . त्यांचा हट्ट म्हणजे त्यांना इतराकडून आदर हवा असतो . आणि तो मिळवण्यासाठी मुले त्यांना न जमणाऱ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात .
आपण नुसते शाब्बास! म्हणायचे मग पाहा किती आनंदी होतात .
खर आहे मुलांना प्रत्यक्ष अनुभव देणं गरजेच आहे .
लेख छान अभ्यासपूर्वक लिहिला आहे .आवडला .
Unknown म्हणाले…
मुलं अनुकरणप्रिय आसतात,म्हणून या वयात घरातील मोठ्या सदस्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे. मुलं हट्टी होऊ नये यासाठीही विशेष काळजी घेणे गरजेचे असते.कारण हाच हट्टीपणा त्याच्या भविष्याच्या दृष्टीने घातक होऊ शकतो.
असो,खूप छान लेखन.
💐पुढील लेखासाठी शुभेच्छा💐
YES ! I CAN !!! म्हणाले…
सर असेच अनुभव लिहा.
YES ! I CAN !!! म्हणाले…
खुप छान विचार मांड्लेत. आपले नाव व नंबर कळवा