शिक्षण : शाळा ते करिअर भाग चौथा मुल घडवताना

शिक्षण : शाळा ते करियर

 
भाग चौथा
 

मुल घडवताना

 

पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी

                        

                     मित्रांनो आपण गेल्या भागामध्ये सहा ते बारा वर्षे वयोगटातील मुलांचा शारीरिक विकास कसा होतो तिथे पाहिले. आजच्या भागामध्ये आपण या मुलांचा भाषेचा विकास कसा होतो ते पाहणार आहे. मित्रांनो  या वयामध्ये मुलं स्वतः स्वतंत्रपणे विविध गोष्टी शिकत असतात काही कौशल्य आत्मसात करतात हे आपण पाहिले.

भाषा विकास

                       

आज आपण मुलाची भाषा कशी विकसित होत जाते हे आपण पाहणार आहे . ते गोष्टी,गाणी ,ग्प्प्पा्  कार्यक्रम ऐक विकास मुलांचा होतो . मुलांशी चर्चा गप्पा गोष्टी गाणी केल्या पाहिजेत.  ज्या घरांमध्ये लोक कमी बोलतात त्या घरातील मुलं सुद्धा कमीच बोलतात .ज्या घरामध्ये सतत मुलांना गाणी गोष्टी चर्चा ऐकायला मिळतात त्या घरातील मुलं स्वतः जास्त शब्द वापरून बोलण्याचा प्रयत्न करतात या वयामध्ये मुलं शब्दापासून वाक्य तयार करतात .त्यांची बौद्धिक क्षमता वाढत जाते. अशावेळी तो घरामध्ये समाजामध्ये शेजारीपाजारी जितके जास्त शब्द मुलगा ऐकतो तितका तो भाषेवर प्रभुत्व मिळतो .

                         या वयामध्ये मुलींचा शब्दभांडार मात्र जास्त समृद्ध असतो .त्यांची वाक्यरचना सुद्धा शुद्ध असते आणि ते आपले विचार अधिक योग्य रीतीने इतरांशी सांगत असतात .मुलांमध्ये मात्र मुलींपेक्षा भाषा शिकण्याची क्षमता कमी आढळते .ज्या घरामध्ये पालक दोन भाषा बोलतात त्या घरातील मुल लवकर शाळेमध्ये भाषा बोलू शकत नाही .कारण दोन वेगळ्या भाषा ऐकल्यामुळे त्याचे शब्दांचे दृढीकरण होत नाही आणि त्यामुळे कोणता शब्द कोणत्या योग्य वेळी वापरावा हे त्याला समजत नाही. अशावेळेस आपल्या घरातील बोलण्याची भाषा ही किमान एकच असावे.

                          विविध कार्यक्रम रेडिओ टीव्ही आणि इतर कार्यक्रम हे मुलं जास्त पाहतात ऐकतात .त्या वेळी मुलांची शब्दसंपत्ती वाढत जाते .बघा ज्या घरातील मुलं हे किर्तनाला जातात प्रवचनाला जातात त्या मुलांमध्ये तसेच वातावरण निर्माण होऊन मुलंसुद्धा लहानपणापासूनच वेगवेगळ्या सुभाषित श्लोक अभंग म्हणण्याचा प्रयत्न सुद्धा करतात .आपण म्हणतो की त्या घरांमध्ये तसं वातावरणच आहे. पण आपण मुलांनाही वातावरण का नाही निर्माण करून देत .ज्यावेळेस वेगवेगळे सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम असतात त्यावेळेस प्रत्येक वेळेस मुलांना समृद्ध करण्यासाठी च्या गोष्टी आपल्या आपल्या अवतीभवती असतात आणि त्या संधी आपण आपल्या मुलांना उपलब्ध करून देत नाही आणि म्हणून मुल इथे कमी पडतात पण मोठी झाल्यानंतर आपण त्यांच्या कडून खूप अपेक्षा ठेवतो आणि म्हणून सर्वप्रथम आपण मुलांना भाषा शिकण्यासाठी जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत . या वयामध्ये मुलं पहिल्या इयत्तेमध्ये जवळजवळ वीस हजार ते चोवीस हजार शब्द सांगतो आणि सहावी मध्ये मुलगा जवळजवळ पन्नास हजार शब्द जाणतो .

                      या वयात तुम्ही जर पाहिला असेल तर मुलांच्या बोलण्यामध्ये शिव्यांचा भरणा सुद्धा आढळतो कारण आजूबाजूचे वातावरण असेल तसं मुलं शिकतात त्यांना शिव्या ही वाईट गोष्ट असते हे माहित नसतं त्यांना फक्त एवढेच माहीत असते की काहीतरी नवीन शब्द आहेत आणि तो मुलगा वापरतो या वयातच आपण जर मुलांना सांगितलं की शिव्या ही वाईट गोष्ट असते आपण त्या गोष्टी बोलल्या नाहीत पाहिजेत .अशा वेळेस मुलांना ती गोष्ट समजून मुलांचे शिव्या देण्याचे प्रमाण कमी होईल किंवा बंद होईल .आपण मुलांना मारून शिव्या बंद होणार नाहीत म्हणून आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की आपण मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे .

भाषाविकास समृद्ध करणाऱ्या गोष्टी

  •                         या वयामध्येच मुलांच एक वेगळी भाषा सुद्धा आपणास दिसून येते .वेगळी भाषा म्हणजे काय तर या वयातच मुलं शब्द उलटा वापरतात . तोये का? ,लच की म्हणजे येतो का?  चल की . ही भाषा आपणास लवकर समजत नाही परंतु ही मुलं नवीन भाषा वापरून आपल्या मित्रांशी संवाद साधतात .
  •  मुलांना पण या वेळेस जास्तीत जास्त वाक्य तयार करणे ,चर्चा करणे, गप्पा मारणे, स्वतः कविता तयार करायला सांगणे, लिहायला सांगणे .
  • त्यांना जे वाटते त्या विषयावरती गप्पा मारणे अगदी आपल्या घरातील प्रत्येक वस्तू काय म्हणत असेल असे साधे साधे सोपे सोपे खेळ तर मुलांबरोबर घेतले तर मुलांचा भाषा शिकण्याचा वेग अतिशय वाढतो.
  •                                 यामध्येच तंत्रज्ञानाचा वापर केला तर मोबाईल मध्ये वेगवेगळे ॲप दिलेले आहे त्यामध्ये गुगल बोलो ॲप ॲमेझॉन किंडल ॲप असे ॲप वापरून मुलांना भाषा शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे .  
  • आपण मागेच पाहिलं होतं की मुलांना शब्द कार्ड तयार करून दररोज त्या कार्डांचे वाचन घेतले .
  • आता पण ते शब्द एकत्र करून मुलांना काही क्रियापद दिली ते शब्द आणि क्रियापद यांचे वाक्य तयार करायला शिकवली तर मुलांचा चांगला खेळ तयार होतो वाक्य तयार करणे शब्द घेऊन या शब्दा संदर्भातील येणारे वाक्य तयार करणे.  
  • घरांमध्ये आजी-आजोबा हे वेगळ्या म्हणींचा वापर करतात त्या म्हणींचा मुलांना अर्थ सांगणे वाक्प्रचारांचा अर्थ सांगणे. 
  • यावेळेस आपण प्राण्यांशी बोलणे प्रत्येक वस्तूशी बोलणे
buy kindal books


 जर अशाप्रकारे आपण मुलांचे भाषिक विकास केला अधिक समृद्ध होईल.
                         तुमच्या घरी गाई म्हशी आहेत का?   तुमच्या गायी-म्हशींची नाव काय आहेत तर मुलांना नाव सांगता येत नाही. बघा जर आपण त्या मुलांना त्या प्राण्यांची नावे दिली त्यांच्याशी बोलायला लावलं किंवा ते काय म्हणत असतील असं जरी विचारलं तरी मुलं त्यांच्या कल्पना भन्नाट सांगतात. जर आपणास हा प्रयोग करायचा असेल तर अवश्य करा आपणही विचार करणार नाही अशी मुलं बोलत असतात .

 मुलं आपोआप त्या गोष्टी शिकत असतात आणि म्हणून भाषा विकासामध्ये आपण मुलांना जसे भाषा समृद्ध विकास वातावरण निर्माण करू तशी मुलांचे शब्दभांडार झपाट्याने वाढते .आपणास भाषा विकासाचे आणखी कार्यक्रम किंवा माहिती हवी असल्यास आपण गुगलवर माहिती विचारू शकतो किंवा त्या संदर्भातील अनेक पुस्तके बाजारात आहेत एवढेच नाही तर मुलं आपल्या घरामध्ये असणारे वर्तमानपत्र पुस्तक छोटीची गोष्टीची पुस्तकं ही मुलांना उपलब्ध करून द्यावीत मुलांना भाषा शिकण्याची जेवढी संधी उपलब्ध करून देऊ तेवढे मुलं समृद्ध होतील .


क्रमशः

अवश्य वाचा पुढील भाग
http://dnyanhindola.blogspot.com/2020/05/blog-post_6.html


सचिन बाजीराव माने
आरफळ सातारा
98 81 32 35 84

टिप्पण्या

अरुण मोजर म्हणाले…
भाषा बोलण्याचा प्रयत्न करणे . फार गरजेचे आहे .वाचून व लिहून भाषा समजेल पण जेव्हा भाषेचा वापर दैनंदिन व्यवहारात करता येईल तेव्हाच भाषा आली असे म्हणता येईल .