शिक्षण : शाळा ते करिअर भावनिक विकास भाग पाचवा
शिक्षण : शाळा ते करिअर
भाग पाचवा
भावनिक विकास
पालक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी
मित्रांनो आज आपण सहा ते बारा वर्षे वयोगटातील मुलांचा भावनिक विकास कसा घडतो ते पाहणार आहोत . या भागांमध्ये मुलांचे मेंदूमध्ये बौद्धिक गोष्टींबरोबरच भावनांचे जाळे सुद्धा निर्माण होत असते .बौद्धिक गोष्टींबरोबरच मुले वेगवेगळी कौशल्ये शिकत असतात .हे करत असताना मुलांना भावनांचा ताळमेळ राखणे शिकत असतात.
यामध्ये मुलांना घरातून मिळणारे प्रेम शाब्बासकी कौतुक हे मुलांमध्ये आनंद निर्माण करणार असतं .याउलट जर घरामध्ये तिरस्कार शिव्याशाप रागावणे असे असेल तर मुलांच्या मनामध्ये मेंदूमध्ये पोकळी निर्माण होते आणि मुलं त्या नको असणारे गोष्टींपासून लांब जातात .मित्रांनो ही सतत घडणारी गोष्ट असते आणि म्हणूनच मुलं घडताना घडवताना या लेखमालेत मध्ये आपण पहिल्यांदाच पाहिलं होतं की मुलांना आपण समजून घेऊया. दुसरी गोष्ट म्हणजे आपण मुलांवर रागवलं नाही पाहिजे .सर्वप्रथम आपण संयम राखला पाहिजे .
मुले ही मुलं असतात. परंतु आपण सर्वांना प्रौढ माणसाच्या नजरेतून पाहतो आणि म्हणून मुलांना एखादी चूक केली की लगेच आपण त्याच्यावर त्यांच्यावर रागावतो. परंतु मुलांना त्यांची चूक कशी सुधारायची किंवा कसे बरोबर वागायचे कृती करायचे कौशल्य राखायचं हे कधीही आपण मुलांना सांगत नाही आणि त्यामुळे मुलांचे मेंदूमध्ये नवीन शिकण्याची, कौशल्य मिळवण्याची भावनिक कोणतीही जोडणी तयार होत नाही. मुलं आपल्यापासून लांब जातात.
या वयामध्ये मुलांना खूप राग येत असतो जर त्यांच्या मनासारखे घडले नाही .त्यांना कोणी चिडवले. एखादी गोष्ट करत असताना जर त्याची कुणी टर उडवली तर मुलांना यासंबंधी भीती वाटते आणि ते राग व्यक्त करतात . अंधार ,आजार या गोष्टींची भीती वाटते पण त्याचबरोबर काल्पनिक गोष्टी म्हणजे मृत्यू, एखाद्या काल्पनिक संकट जर आलं तर त्याची मुलांना खूप भीती वाटते .या वयातच आपण मुलांना भूत, राक्षस या काल्पनिक गोष्टीं विषयी भीती जास्त मुलांमध्ये निर्माण करतो आणि मुलं ही एकटी पडतात .
काल्पनिक विश्वात रमत या वयात आपण मुलांना जेवढे प्रत्यक्ष व्यवहारातील वस्तूस्थिती वरील ज्ञान मुलांना देऊ तेवढी मुले धाडसी बनतात . त्यांच्या मेंदूमध्ये नवीन जोडणी तयार होते. सोप्या भाषेत आपण याला मेंदूतील वायरिंग जोडणी म्हणू. जेवढी मेंदूमध्ये मुलांच्या वायरिंग जोडणी जास्त तेवढा मुलांचा बौद्धिक भावनिक विकास जास्त होत असतो .जर ही जोडणी होत असताना मुलांना भीती वाटली किंवा त्यांना रागावलं तर ही जोडणी होत नाही आणि मुलांचा विकास घडत नाही
या वयात मुलांना जास्त स्वातंत्र्य मिळवण्याची इच्छा असते. या वयात म्हणून जास्त महत्वकांक्षी बनतात. त्यांच्यामध्ये या वयातच काहीही नवीन धाडसी निर्माण करण्याची इच्छा असते . जर एखाद्या मुलाने अभ्यास पूर्ण केला किंवा एखादी कविता म्हणून दाखवली किंवा नवीन काहीतरी गोष्टी शिकला म्हणजे क्रिकेट खेळला चांगली बॅटिंग केली, चांगली सायकल चालवली तर ज्या मुलाला ही गोष्ट जमत नाही त्याच्या मनामध्ये इर्षा निर्माण होते आणि जर त्याला सुद्धा ह्या गोष्टी चांगल्या नाहीत ,तर मात्र तो अपयशी मनानं मागे पडतो आणि अशावेळी मात्र आपण त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याला शिकवले पाहिजे आणि त्याच्या मनामध्ये जिद्द निर्माण केली पाहिजे .
मित्रांनो आपण रोज नवीन प्रयोग पाहतोय आज आपण आई-वडील आजी आजोबा हे कोणी घरी नसताना मुलं कशी वागतात? यासंदर्भात आपण स्वतः निरीक्षण करावे किंवा कोणाला तर निरीक्षण करा सांगावे .म्हणजे घरात मध्ये जर मोठा भाऊ मोठी बहीण असेल तर आपण काही वेळ मुलांना एकटं ठेवले पाहिजे आणि ती अशा वेळेस काय कशी वागतात याचं निरीक्षण करावं .
जर मुलांनी घरातील वस्तू स्वयंपाक केलेली भांडी घासली ,व्यवस्थित जेवण केले .घरातील केरकचरा काढला आपण नसताना किंवा भांडी घासली किंवा जेवण व्यवस्थित केले तर आपण मुलांवर ती केलेले संस्कार प्रेम हे बरोबर होते असे आपण समजले पाहिजे. बघा जेव्हा आपण घरामध्ये असतो तेव्हा आपण प्रत्येक गोष्ट मुलांना त्यांच्या हातात घेऊन देतो म्हणजे त्यांच्या समोर जेवणाचं ताट पाण्याचा तांब्या भरून देतो त्याचबरोबर आपण स्वतः घरातील झाडू मारत असतो भांडी घासत असतो परंतु जेव्हा आपण घरात नसू तेव्हा जर मुलांनी स्वतःच्या मनाने या सर्व गोष्टी केल्या तर मात्र मुलं समाजात घरात समायोजन करून चांगल्या प्रकारे भावनांवर नियंत्रण मिळू शकतात .
- याबरोबरच आपण स्वतः म्हाताऱ्या माणसांना मदत करणे .
- आजारी लोकांची काळजी घेणे.
- मित्रांना मदत करणे
- आपल्या आजूबाजूला जर कोणी अडचणीत असेल तर त्यांना त्यांच्या मदतीला धावून जाणे
- एवढेच काय तर विविध सण समारंभात काम करणे मदत करणे
- छोटे उदाहरण द्यायचं झालं तर लग्न समारंभामध्ये पत्रावळीवर जेवण वाढणे ही कामे मुलांना आवडता
- यातूनच मुलांचा भावनिक विकास घडत असतो
फक्त माणसांवरील प्रेम दाखवल्याने भावनांचा विकास होतो असे नाही .जर घरामध्ये प्राणी असतील तर त्या प्राण्यांना खायला देणे ,पाणी पाजणे, त्यांची काळजी घेणे ,त्यांच्याशी बोलणे. एवढेच काय तर मुलं लहानपणी जेव्हा बाहुला-बाहुलीचा खेळ खेळतात तेव्हा निर्जीव वस्तूंशीसुद्धा ती प्रेमाने बोलतात आणि आपलं प्रेम व्यक्त करतात. या गोष्टींनी मुलांच्या मनामध्ये भावनांच जोडणी तयार होते.
याउलट प्राण्यांना मारणे , त्यांना विनाकारण त्रास देणे , झाड तोडणे, प्राण्यांच्या हत्या करणे या कृती मुलांच्या भावनिक विकासाला मारक ठरतात .मित्रांनो जसे प्रेम आपण आपल्या घरामध्ये मुलांना देऊ तसेच मुलं प्रेमळ बनतात.
क्रमशः
सचिन बाजीराव माने
आरफळ सातारा
98 81 32 35 84



टिप्पण्या