शिक्षण : शाळा ते करियर भाग सहावा फक्त पालकांसाठी
शिक्षण: शाळा ते करियर
भाग सहावा
संबोध विकास
शिक्षक पालक आणि सर्वांसाठी
मित्रांनो कालच्या भागांमध्ये आपण मुलांच्या भावनांचा विकास कसा होतो ते बघितलं आजच्या नवीन भागांमध्ये आपण मुलांचा संबोध विकास म्हणजेच थोडक्यात मुल अनुभवांच्या आधारे कसे शिकतात हे आपण पाहणार आहे.
मित्रांनो मुलाचा शिकणे एका महत्त्वाच्या अवयव द्वारे घडतं आणि तो अवयव असतो मेंदू . मेंदू नावाच्या राजा मध्ये नक्की घडतं काय ? मुलाच्या आजूबाजूला कळत नकळत कितीतरी गोष्टी घडत असतात आणि तो ते मुलगा पाहतो ऐकतो तेव्हा त्याच्या मेंदूमध्ये त्या साठत असतात .हे करण्यामागे ज्ञानेंद्रियांचा खूप मोठा हात असतो . मित्रांनो मेंदूला मदत करणार हे पाच मित्र म्हणजे त्वचा डोळे कान नाक जीभ हे होत. ज्ञानेंद्रिय वेगवेगळी माहिती मेंदूपर्यंत आणतात त्यावेळेला त्या त्या क्षेत्रातले मेंदूतले भाग उद्दीपित होत असतात. जेव्हा एखादी नवीन माहिती येते तेव्हा मेंदूमध्ये विद्युत रासायनिक प्रक्रिया घडते आणि माहिती दुसऱ्या पेशी कडे पाठवतो .दुसरी पेशी ती माहिती घेते आणि त्या वेळी त्यांच्यामध्ये बंध निर्माण होतात. या बंधांना सीनप्स म्हणतात. सीनप्स ( बंध ) तयार झाला म्हणजेच शिकण्याची प्रक्रिया घडली .
मित्रांनो थोडक्यात आपल्या मेंदूमध्ये वायरिंग जाळं निर्माण होत असतं .जेव्हा एखादी माहिती ती मेंदूपर्यंत येते तेव्हा यावर एकमेकांना जोडण्याचे काम सुरू होतं जेव्हा या मेंदूमध्ये वायरिंग जोडणी खूप अधिक वेगाने घडेल तेव्हा मित्रांनो मुलांच्या मेंदूचा अधिक विकास होईल . दिलेला अनुभव वाढत जातो त्याच्या शेजारी असणारे ओळखीचे चेहरे अनोळखी चेहरे स्पर्श त्याने घेतलेल्या त्याला डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टी या सर्वांवरून स्वतः शिकत असतं .
मित्रांनो अनुभवांच्या आधारे ज्यावेळेला हे अनुभव एकमेकांच्या जेव्हा अनुभवांची जुळणी तयार होते . आपण एक छोटसं उदाहरण पाहूया पोहणे . मुल धाडस करून पालकांबरोबर स्वतः तो पोहायला शिकला त्याला त्यामध्ये आनंद वाटतो आणि तो पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करतो आणि एक दिवस चांगल्याप्रकारे पोहायला शिकतो त्यातील अधिक आव्हाने स्वीकारतो उलट पोहणे. परंतु काही मुलं हे गटांगळ्या खाल्ल्या किंवा मित्र ओरडले घाबरला तर मात्र त्यांना पोहण्याची भीती वाटते आणि ती पुन्हा पोहण्यासाठी जात नाहीत . काही मुलं तर पालक ओरडतात कशाला पोहायला जायला पाहिजे .पडशील ,वाहून जाशील पोहणे चांगलं नसतं .असं जर त्याला सांगितलं तर त्याला पाहण्याचा अनुभव मिळणार नाही आणि तो पोहायला शिकणार नाही . मित्रांनो पोहणे हे पुस्तकात वाचून, हवेमध्ये कृती करून येणार नसतं, तर प्रत्यक्ष जेव्हा मुलगा कृती करतो तेव्हा पोहू शकतो .म्हणून पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही असं म्हटलं जातं. परंतु मुलांच्या शिकण्याकडे आपण गांभीर्याने घेत नाही म्हणून प्रत्येक गोष्ट मुलाला स्वतः शिकू द्या अनुभव घेऊ द्या अशाच प्रकारे मुलांचे शिक्षण घडतं. .
मित्रांना उदाहरणांमध्ये प्रत्येक अनुभवांतून मुलांच्या मेंदूमध्ये जोडणी सुरू होत असते म्हणजेच थोडक्यात वायरिंग जोडणी सुरू होते आणि प्रत्येक अनुभवांचा मुलाच्या शिक्षणावर परिणाम होत असतो .पावसात भिजायला मुलांना आवडतं ती हट्ट करतात पावसात भिजत असताना छान वाटतं पण आपला अनुभव असतो की मुलांना सर्दी होईल परंतु जर मुलांना सर्दी झाली नाही आणि त्यांना आनंद मिळाला तर तो विशेष अनुभव मुलांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतो. या प्रत्येक वेळी आपणास होणाऱ्या धोक्याची जाणीव करून देते मात्र त्यांना तो अनुभव घेण्यापासून परावृत्त करायचं नाही किंवा तो अनुभव घेऊ द्यायचा नाही असं करायचं नाही मित्रांनो मुलांना प्रत्येक अनुभव घेऊ द्या .आपण त्यांना अनुभव घेऊ दिला नाही तर मला शिकणार नाहीत ती शिकण्यापासून लांब पळतील.
जन्मापासून अनुभवांच्या रचनेवर मुलाचा शिक्षण अवलंबून असतं या शिक्षणामध्ये एक नवीन शिक्षण पद्धती आलेले आहे तिचं नाव आहे ज्ञानरचनावाद. ज्ञानरचनावाद म्हणजे मुलगा पूर्वीच्या घेतलेला अनुभवांवरून स्वतः नवीन ज्ञान मिळवतो.
म्हणजे आपण शाळेमध्ये मुलांना धडे वाच, कविता पाठ कर ,पाढे पाठ कर ,गाणी म्हणून दाखव या गोष्टी केल्या म्हणजे मुलगा हुशार आहे आपणास वाटतं .परंतु ज्ञानरचनावाद यामध्ये मुलांनी स्वतः वाचन करणे, स्वतः कविता तयार करणे ,वेगवेगळ्या वस्तू गोष्टी प्राणी पक्षी यासंदर्भात स्वतः गप्पा मारणे, गोष्टी तयार करणे.
गणितामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार म्हणजे काय हेच समजत नाही .आपण मुलांना गणिते लिहून देतो आणि मुलांना सांगतो उत्तर काढा परंतु बेरीज म्हणजे नक्की काय हे मुलांना कधीही कळत नाही याचं कारण मुलांना बेरीज द्या संबंधाची कृती माहीत नसते . बेरीज म्हणजे मिळवणे मिसळणे एकत्र करणे जमा करणे गोळा करणे आणि हे गोष्टी मुलांना प्रत्येक वेळी कृतीतून दाखवल्या तर मुलांची जोडणी अधिक पक्की होते म्हणजे मुलांना दगड चिंचोके मनी अशा कोणत्याही वस्तू एकत्र करायला सांगितल्या आणि त्या मोजायचा सांगितल्या तर मुलांची बेरीज ही संकल्पना पक्की होते .
मात्र आपण जर मुलांना दोन अधिक दोन किती असं विचारलं तर मुलं एक तर चुकतील किंवा बरोबर येतील आणि त्या मुलांचा संबोध स्पष्ट होणार नाही. परंतु जर मुलांना पण सांगितलं 2 दगड घे त्यात आणखी दोन दगड मिळव एकूण किती दगड झाले असं विचारलं तर मुलगा आपणास कृती करून दाखवेल आणि त्याच्या मेंदूमध्ये बेरीज या संबंधाची जोडणी घट्ट होईल आणि म्हणून मित्रांनो प्रत्येक अनुभव आपणास मुलांना जाणीपूर्वक द्यायचे आहेत जेणेकरून मुलाचा शिकणे आहे उत्तम घडेल आणि मुलांच्या मेंदूमध्ये अनुभवांची जोडणी होऊन अधिक संबोध स्पष्ट होतील .
मित्रांनो जुनी घोकंपट्टी बंद करून मुलांना आपल्या घरातील एखाद्या वस्तू विषयी बोलायला सांगा पेन काय म्हणेल ?टीव्ही काय बोलेल ?गॅस काय म्हणेल? मुलांना आव्हानात्मक प्रश्न निर्माण करा आणि मग बघा मुलांचं शिकणं किती सोपं होऊन जाईल मुलांना पाढे पाठांतर न करता त्यांना तयार करायला सांगा किंवा एखादी नवीन गोष्ट स्वतः तयार करा सांगा जेवढी आपण मुलांसमोर आव्हान निर्माण करू तेवढे मुलांचं शिकणं अनुभवांच्या आधारे सुरू होईल .
मित्रांनो यामध्ये मुलगा चुकू शकतो आणि या वेळेस आपण मुलांच्या चूक करण्याकडे दुर्लक्ष करून, चुक सुधारण्याकडे लक्ष दिले पाहिजे अशा वेळेस मुलांना रागावून ओरडणे मंद आहेस असं न बोलता मुलांना वेगवेगळ्या कृती देऊन आणखी चांगले मार्ग निर्माण करून मुलांचे शिक्षण सुकर करूया . चुकली तरच मुले शिकतील नाहीतर त्यांचं शिकणं घडणार नाही .मुलांना आव्हान नव्या संधी निर्माण करून दिल्या आणि त्याच्या मेंदूला जितका खुराक देता येईल तेवढा देऊया .
मात्र पाढे पाठांतर त्यांनी कविता पाठांतर करणे प्रश्न उत्तर पाठांतर करणे या अभ्यासाच्या कंटाळवाण्या पद्धती मुलांच्या शिकण्या मध्ये अडथळे निर्माण करतात . कृतीतून शिकणे हे मुलगा जेव्हा स्वयंप्रेरणेने करेल तेव्हा ज्ञानरचनावाद द्वारे मुलांचे शिकणे अधिक बळकट होईल .
क्रमशः
सचिन बाजीराव माने
आरफळ सातारा
98 81 32 35 84
टिप्पण्या
शिकण्याकरता प्रयत्न करणे आवश्यकच आहे