मुलं फुलताना .....
शिक्षण : शाळा ते करिअर
भाग सोळावा
मुलं फुलताना .....
पालक शिक्षक आणि सर्वांसाठी
तोत्तोचान खूप चंचल असते . इयत्ता पहिलीतल्या या मुलीला शाळेतून काढून टाकले जाते. कारण तिचं लक्ष वर्गात नसतं. रस्त्यावरून जात असलेल्या बँड कडे ती बघत बसायची . खिडकीतून दिसणारे पक्षी बघायचे .झाडावरच्या चिमण्यांची गप्पा मारायची या गोष्टीमुळे तिला शाळेतून काढून टाकले जाते.
तिची आई तिला तोमोई नावाच्या नवीन शाळेत टाकण्यासाठी घेऊन जाते .झाडांच्या खांबांचे गेट असलेली आणि रेल्वेच्या डब्यात वर्ग भरणारी ही शाळा तिला पाहताक्षणीच आवडते. शाळेचे मुख्याध्यापक कोबायशी तिला बोलायलाच सांगतात आणि ती पूर्ण चार तास त्यांच्याशी गप्पा मारते. तेव्हापासूनच दोघांमध्ये मैत्रीचे बंध जुळतात .
पुढे शाळेत तिला नवीन मित्र भेटतात. शाळेतल्या स्वच्छंदी वातावरण. रोज शाळेच्या मुलांनी तास ठरवायचे. निसर्गरम्य वातावरणात सहली काढायच्या. जेवणाच्या डब्यासाठी पण नियम होता की रोज काहीतरी डोंगरातले आणि काहीतरी समुद्रातल्या यामुळे सगळ्यांना चौरस आहार मिळायचा. मुलांना आनंद वाटायचा.
मुलांची नाजूक मन जपत त्यांना शिकवणे ही कोबायाशीची पद्धत असते. मुलांना पोहायला नेणे. अपंग मुलांना क्रीडा स्पर्धेत भाग घेणे. संगीताच्या तालावर कवायत करणे. अशी मुलांच्या भावविश्वाला जाणून घेऊन मुलांच्या नजरेतून त्यांना काय हवे काय नको असे शिकवणारे शिक्षक.
परंतु तो त्यांच्या संपूर्ण आयुष्याला वळण देणारी घटना घडते .शाळेत पहिल्यांदाच गप्पा मारता मारता तिचे मुख्याध्यापक म्हणाले होते की ," तू चांगली मुलगी आहेस." या वाक्यामुळे मुलगी खूश होते .आपण चांगली मुलगी आहोत हे खूप महत्त्वाचं असं तिला वाटायला लागतं. ही मुलगी पुढे लेखिका होते . जपानी दूरदर्शन वरील कलाकार आणि युनिसेफच्या सद्भावना दूत बनतात .
मित्रांनो ही गोष्ट खरीखुरी आहे .आपण मुलांना समजून घेतो का ? मुलांचं मन जपलं जाईल असा पण त्यांच्याशी वागतो का? मित्रांनो आयुष्याची जीवनाची सुरुवात आणि संपूर्ण आयुष्य हे जोपर्यंत स्वतःला ,'स्वतः कोण आहे?' हे समजल्याशिवाय पूर्ण होत नाही.
मित्रांनो जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हा 'अहम' घेऊन जन्माला आलेला असतो .म्हणजे त्याला जाणीव असते की तो स्वतंत्र आहे . परंतु मूल जन्मल्यानंतर मोठा होईपर्यंत आपण त्याला असे समजतो की मी जे म्हणेल तेच त्यामुळे मुलांचा अहम् आणि आपण लाभलेले मुला वरती मी जे म्हणेल तेच या भांडणांमध्ये मुलाचा विकास खुंटतो .
स्वतः कोण आहे हे जोपर्यंत आपण आपल्या मुलांना समजून घेणार नाही .तोपर्यंत आपण मुलांच्या शिकण्यामध्ये, त्याच्या आयुष्यामध्ये अडथळे निर्माण करतोय. आपणच मुलांना,' तू किती मठ्ठ आहेस ?' , ' तुला दोन वेळा सांगितले तरी समजून कळत नाही, किती वेळा सांगायचं?' , ' तू किती मंद आहेस ,इतर मुलं किती हुशार आहेत' , असं बोलणं मुलाच्या मनावर ती परिणाम करतो.
आपल्या मुलांनी काय करायचं आणि काय नाही करायचं हे आपण प्रौढ व्यक्ती ठरवतो परंतु मुलाच मानसिक वय मुलाची बौद्धिक वाढ किती झाली याकडे विचार न करता आपल्याला काय हवंय आपल्याला काय नकोय हे सरळ-सरळ आपण मुलांवरती लादतो. मुलांचे शिक्षण अभ्यास खुंटतो .मुलाची बुद्धि चालेनासे होते .सतत आपण घरात मुलांना रागवलं बोल बोलतो आणि अभ्यास करूनही आपलं काहीतरी चुकतंय असं त्यांना वाटायला लागतं.
मित्रांनो म्हणूनच आपण डॉ. हावर्ड गार्डनर यांच्या बहुआयामी बुद्धिमत्तेच्या सिद्धान्तानुसार प्रत्येकाच्या वेगवेगळ्या बुद्धिमत्ता असते पाहिलं. आपल्या बुद्धिमत्ता कोणत्या, याचा नेमका शोध लागला तर अभ्यासाचे कष्ट निश्चितपणे कमी होणार आहेत. आपण आपल्या बुद्धिमत्तेने अभ्यास करायला लागलं हे मेंदू पूरक आणि सर्वात नैसर्गिक आहे.मुलाच्या मेंदूला काय आवडतं त्यानुसार जर त्याला अनुभवांची जोड देत राहील तर निश्चितच त्याच्या बुद्धिमत्तेला खतपाणी मिळणार आहे.
मित्रांनो ज्याप्रमाणे आपले चेहरे ,शारीरिक ठेवण, स्वभाव हे सगळं वेगळं असतं त्याचप्रमाणे आपल्या बुद्धिमत्ता ही वेगवेगळ्या असतात याची जाणीव जेवढ्या लवकरात लवकर वयात होईल तेवढं आपल्या मुलांच्या फुलण्यासाठी खतपाणी घालण्यासाठी, त्यांची वाढ होण्यासाठी आपण निश्चितच मुलांच्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मदत करू. मुलांच्या आयुष्यात पालकांच स्थान हे खूप महत्त्वाच आहे. आपल्या आई बाबा जसे आपल्याला समजतात तसे आपण आहोत अशी त्यांची समजूत लहानपणापासूनच झालेले असते आणि ती पुढेही चालूच असते .
आपण मुलांना " तू किती छान करतोयस" ," तू खूप चांगला आहेस "असं जर म्हटलं तर मुलाच्या मनात पक्क होऊन बसते की आपण चांगले आहोत ,आपल्याला प्रत्येक गोष्ट चांगली करता येते यातून मुलांचे मन घडतं .पण जर त्याला आपण वाईट म्हणालो तर आपण वाईट आहोत असं त्याच्या मनात फक्त होतं मोठे होण्याच्या काळामध्ये अशी बोलणी ऐकावी लागली तर मनाचा झगडा सुरू होतो.
एकीकडे शरीरातील हार्मोन्स म्हणत असतात की तू आता मोठा होतोय ,तुझ्या शरीरात बळ आहे, एक चांगला माणूस आहेस .याच वेळेस घरातील मंडळी मात्र त्याला कमी लेखतात .अशा परिस्थितीमध्ये पालकांचं खरं की स्वतःच्या मनाच खर हे कळेनासं होतं आणि तो मुलगा त्याच्या व्यक्तिमत्त्वाला नीट आकार देऊ शकत नाही. कारण आपण नक्की कसे या संभ्रमातच संपूर्ण आयुष्य जगत राहतो.
मित्रांनो मुलांना स्वतःवर प्रेम करायला शिकवा .खूप भारी आहेस ,चांगला आहेस असं सकारात्मक प्रेरणा देत राहा. त्याच्या व्यक्तिमत्त्वातले दोष सांगू नका .ते सांगितले पाहिजेत ,परंतु सांगण्यासाठी त्याला योग्य पद्धतीचा वापर करून ते दोष कसे दूर करायचे हे सांगा. आपण सतत मुलांना अभ्यास कर, अभ्यास कर असे म्हणतो परंतु आपला मुलगा अभ्यास करत नाही याचं कारण त्याला काय शिकायला आवडतं हे आपण पाहत नाही, त्याला कशामध्ये आनंदही पाहत नाही आणि त्यामुळे मुलगा अभ्यासापासून दूर पळतो.
म्हणून आपल्या मुलाला शिकायला नक्की काय आवडतं हे पाहूया. मित्रांनो शिकण्यासाठी त्याला शिकवलं पाहिजे कोणी ,याची आवश्यकता नाही .प्रत्येक जण शिकत असतो. ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीने मुलांचा अभ्यास करण्याची आवड निर्माण होते. फक्त त्याला सकारात्मक प्रेरणा देण्याची आवश्यकता असते.
वाचन करणे ,गणित सोडवणे ,प्रश्नोत्तरे पाठ करणे ,पाढे पाठ करणे या शिक्षणपद्धतीतील कंटाळवाण्या गोष्टी मुलांना अभ्यास करण्यापासून दूर ठेवतात. याउलट मुलांना खेळातून, मनोरंजनातून, कृतीतून जेवढ्या अभ्यासाच्या गोष्टी आहेत तेवढ्या सांगितल्या तर मुलांची शिकण्याची गती दुप्पट वाढते.
भाषा विकासामध्ये मुलांना एकदा लिपीची जाण झाली तर मुले सहज वाचतात ,एकदा त्यांना शब्दांचा अर्थ समजला तर मुलं त्या शब्दांबरोबर खेळतात, कविता करतात, लिहितात ,स्वतःचं म्हणणं मांडतात या गोष्टी जास्तीत जास्त मुलांना करायला लावल्या पाहिजेत. गणित हा कृतीतून खेळातून मुलं पटकन शिकतात मुलांना अभ्यास पूरक वातावरण निर्माण केले पाहिजे. त्यांच्यामध्ये वाचनाची लिहिण्याची प्रेरणा निर्माण होईल अशा सकारात्मक गोष्टी आपण केल्या पाहिजेत. यातून मुलाचा शिकणे घडतं आणि शिक्षणाने मुलाच्या व्यक्तिमत्वाला योग्य वळण लागते.
क्रमशः
सचिन माने
आरफळ सातारा
98 81 32 35 84





टिप्पण्या