खेळातून शिक्षण भाग-4
शिक्षण : शाळा ते करियर
पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी
https://www.educationschooltocareer.com/2020/10/2.html
खेळातून शिक्षण भाग-4
मित्रांनो दररोज आपण प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घरच्या घरी दररोज नवीन खेळ व कृतीतून मराठी गणित आणि इंग्रजी विषयांची विविध कौशल्य शिकणार आहोत.
मराठी
शब्दजिना
उद्देश : एकाच व्यंजनाला स्वरचिन्हे लावून शब्द तयार करणे.
कृती: हा खेळ 28 मुले खेळू शकतील.
वेळ पाच मिनिटे.
खालील उदाहरणात काही शब्द दिले आहेत. त्याप्रमाणे एक-एक अक्षर घेऊन त्यापासून शब्द तयार करा.
अशा एकेक शब्दाला एक एक पायरी समजून जिना तयार करा.
जो जास्त पायऱ्यांचा जिना बनवेल तो जिंकेल.
उदाहरणार्थ.
प- पट- पाट- पिवळी- पीळ- पुतळा- पूर- पेठ- पैसा- पोर- पौष- पंप
व्यंजने:
क ख ग घ
च ज झ
ट ठ ड ढ
त थ द ध न
प फ ब फ भ म
य र ल व श
स ह क्ष ज्ञ
याप्रमाणे व्यंजने घेऊन त्यापासून शब्दजिना तयार करा.
गणित
लहान-मोठा
उद्देश: लहान-मोठा संकल्पना समजणे
कृती:
आकारावरून लहान व मोठा ओळखता येणे.
मुलांना सिंह आणि उंदीर यांची गोष्ट माहीतच असेल.ही गोष्ट मुलांना सांगा किंवा मुलांनी ही गोष्ट सांगावी .
त्यामधील सिंह व आणि उंदीर यांपैकी मोठा कोण आणि लहान कोण हे विचारावे यावरून लहान-मोठा ही संकल्पना स्पष्ट होईल.
त्याचप्रमाणे घरातील किचन मधील विविध वस्तू तांब्या- वाटी, ताट -डिश ,डबे, पातेले.
त्याचप्रमाणे दप्तरातील विविध वस्तू पुस्तक, वही, कंपास ,पेन्सिल ,पट्टी यांची तुलना करून लहान-मोठे वस्तूंची यादी तयार करणे.
इंग्रजी
व्यंजनांना स्वर ' a ' जोडल्यावर बनणारा आवाज.
यामध्ये सर्वप्रथम आपण तीन अक्षरी शब्द वाचायला शिकणार आहोत.
तीन अक्षरी शब्द वाचण्यासाठी आपल्याला एका व्यंजनाला स्वर जोडल्यावर दोन अक्षरांचा आवाज काय होतो हे माहीतच होणे जरुरीचे आहे .
चला तर आता a हा स्वर वेगवेगळ्या व्यंजनांना जोडल्यावर त्या दोन अक्षरांचा आवाज काय होते ते शिकूया .
उदाहरणार्थ :
ba= b चा आवाज ब +a चा आवाज ॲ
दोन्ही आवाज एकत्र केले तर ba चा आवाज होतो बॅ.
Ba चा आवाज बॅ
Ca चा आवाज कॅ
Da चा आवाज डॅ
Fa चा आवाज फॅ
Ga चा आवाज गॅ
Ha चा आवाज हॅ
Ja चा आवाज जॅ
Ka चा आवाज कॅ
La चा आवाज लॅ
Ma चा आवाज मॅ
Na चा आवाज नॅ
Pa चा आवाज पॅ
Ra चा आवाज रॅ
Sa चा आवाज सॅ
Ta चा आवाज टॅ
Va चा आवाज वॅ
Wa चा आवाज वॅ
वरील व्यंजनांना जोडलेला स्वर a या नुसार वाचावेत व सराव करावा.
https://www.educationschooltocareer.com/2020/10/3.html
क्रमशः
सचिन बाजीराव माने
आरफळ सातारा


टिप्पण्या