खेळातून शिक्षण भाग- 5
शिक्षण : शाळा ते करियर
पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यासाठी
https://www.educationschooltocareer.com/2020/10/3.html
खेळातून शिक्षण भाग- 5
मराठी
सर्वांचा मित्र कोण ?
उद्देश : सर्वव्यापी अक्षर शोधून दोन अक्षरी शब्द तयार करणे .
कृती: हा खेळ चार मुले खेळू शकतील.
वेळ पाच मिनिटेे.
प्रत्येक मुलाला नऊ अक्षरे दिले आहेत.
त्यातील नऊ अक्षरांना जोडले जाणारे समान अक्षर घेऊन नवीन शब्द तयार होतात.
खालील उदाहरणाप्रमाणे चारही मुलांनी सर्वांचा मित्र असणारे अक्षर कोणते ते ओळखावे आणि शब्द तयार करावेत .
☯️ उदाहरणार्थ
अक्षर - सा ना रा गा वा भा का हा.
यावरून या सर्व अक्षरांना जोडणारे समान अक्षर आहे - त
त हे अक्षर जोडून तयार झालेले शब्द खालील प्रमाणे-
सात नात रात गात वात वात भात कात हात
अक्षर गट 1 - का पा गा वा जा डी सा मा ना
अक्षर गट 2- चू धू भू र सू शू पू तू खू
अक्षर गट 3 - न च प त क घ ग स ट
अक्षर गट 4- क व म प घ ण स ख ग
वरील अक्षरे घटना समान असणारे अक्षर जोडून नवीन शब्द तयार करा जो सर्व शब्द तयार करेल तो जिंकेल .
याची उत्तरे पुढील भागात मिळतील.
गणित
जड हलका
उद्देश : जड व हलका या संकल्पना समजणे.
वजनाने जड व हलक्या वस्तू ओळखणे.
1️⃣ मुलांनो आपला जेवणाचा डबा भरलेला असतो तेव्हा आणि जेवण केल्यानंतरचा मोकळा डबा यामध्ये जड कोणता व हलका कोणता हे ओळखा?
2️⃣शाळेमध्ये येत असताना डब्याची पिशवी आणि घरी जात असतानाची डब्याची पिशवी यामध्ये कोणती पिशवी जड आणि कोणती हलकी सांगा.
3️⃣ मुलांनो आपण जेवताना तांब्या भरून घेतो तेव्हा , मोकळा तांब्या आणि पाण्याने भरलेला तांब्या यामध्ये हलका कोणता आणि जड कोणता ओळखणे
4️⃣ आता सर्वांच्या घरी सोयाबीन मळून आणलेले आहे .मोकळे पोते आणि सोयाबीनचे भरलेले पोते यामध्ये हलके कोणते व जड कोणते?
5️⃣ मोकळे दप्तर आणि भरलेले दप्तर यामध्ये हलके कोणते व जड कोणते ओळखणे?
▶️ याच प्रमाणे किचन मधील वस्तू ,
➡️ दगड - कापूस
↪ लोखंडी गज - लाकडी काठी
↪ दोन बादल्या यामध्ये मोकळी आणि पाण्याने भरलेली बादली
अशा विविध वस्तू घेऊन जड व हलक्या वस्तू फरक ओळखणे.
इंग्रजी
स्वर a असणारे तीन अक्षरी शब्द
तीन अक्षरी शब्द वाचण्यासाठी आपल्याला आधीच्या भागांमध्ये शिकवलेल्या पद्धतीचा वापर करावयाचा आहे.
तीन अक्षरी शब्द वाचण्यासाठी आपल्याला पहिल्या दोन अक्षरांचा आवाज घ्यायचा आहे आणि त्याला तिसऱ्या अक्षराचा आवाज जोडायचा आहे
bat = ba चा आवाज बॅ + t चा आवाज ट
त्यामुळे bat चा उच्चार होतो बॅट
याप्रमाणे खालील शब्द वाचा
Bag Cap Cat Dad Dam Fan Fat
Gap Hat Jam Lab Lap Man Map
Mat Nap Pan Pat Rat Sad Tap
Van Wax
याप्रमाणे आणखी तीन अक्षरी शब्द इंग्रजी पुस्तकातून शोधा आणि वाचा.
मागील भाग पुन्हा वाचण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
https://www.educationschooltocareer.com/2020/10/4.html
क्रमशः
सचिन बाजीराव माने
आरफळ सातारा.

टिप्पण्या
अशा नवनवीन खेळातून मुलांच्या कृतीशीलतेला आव्हान मिळेल .