खेळातून शिक्षण भाग- 7
शिक्षण : शाळा ते करियर
पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यासाठी
https://www.educationschooltocareer.com/2020/10/5.html
खेळातून शिक्षण भाग- 7
🦚 मराठी 🦚
शब्दांची मालगाडी
कृती: हा खेळ दोन गटांत खेळता येईल.
पहिल्या गटाने दुसऱ्या गटास एक वर्णाक्षर द्यावे .
दुसऱ्या गटाने ते वर्णाक्षर प्रत्येक शब्दात प्रथम येईल असे वापरावे.
ही अट पाळून अर्थपूर्ण शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार करणे.
नंतर दुसर्या गटाने पहिल्या गटास एक वर्णाक्षर द्यावे .
त्या गटानेही ही वाक्य तयार करावे.
सर्वात लांबलचक वाक्य तयार करणारा गट जिंकेल.
वेळ प्रत्येक गटात दहा मिनिटे.
☯️ उदाहरणार्थ क हे इंजिन. क पासून सुरु होणारे शब्द हे डबे. वर्णाक्षर क
कुसुमच्या कजाग काकूने काशिनाथ काकांच्या कपाटातील कामाचे कागद कोऱ्या कात्रीने कराकरा कापले.
वर्णाक्षर प
पेडगावच्या पिराजी पंडित पाटलांच्या पडवीतील पवळ्या पाडसाला पाटलीनबाईंनी पाटाचे पाणी पाजले.
याप्रमाणे खेळ खेळावा.
1️⃣ गणित 2️⃣
☂️ संख्यानामाची गाणी तयार करणे.
उद्देश :1-9 संख्यानामे सांगणे.
कृती: विविध वस्तू घेऊन त्यांची संख्यानामे विचारणे.
उदाहरणार्थ :
☀️ आकाशात सूर्य एक
🚲 सायकलची चाके दोन
पळसाला पाने तीन
🐄 गाईला पाय चार
🖐 हाताला बोटे पाच
षटकोनाला कोन सहा
🌈 इंद्रधनुष्याचे रंग सात
☂️ छत्रीला काड्या आठ
नवरात्रीचे दिवस नऊ
याप्रमाणे मुलांचे एक ते नऊ संख्या नामे लक्षात राहण्यासाठी योग्य त्या वस्तू किंवा संकल्पनांचा वापर करावा.- म्हणजे सूर्य हा एकच आहे तर डोळे हे दोनच असतात, पळसाला पाने तीनच असतात असे मुलांच्या एक ते नऊ संकल्पना स्पष्ट होण्यासाठी योग्य त्या वस्तू चित्र घटना सण यांचा समावेश करावा आणि अशाच वस्तू शोधाव्यात की ज्यांना हीच संख्या नामे आहेत.
उदाहरणार्थ रिक्षाला चाके तीन ,याप्रमाणे अशी आणखी संख्या नावे असणाऱ्या वस्तू चित्र ठिकाण व्यक्ती शोधा आणि त्या वरून गाणे तयार करा.
🥎 इंग्रजी 🏀
स्वर e असणारे तीन अक्षरी शब्द.
☯️ उदाहरणार्थ :
Bed = Be चा आवाज बे + d चा आवाज ड .
त्यामुळे Bed चा उच्चार होतो बेड
याप्रमाणे खालील शब्द वाचा आणि आणखी नवे शब्द शोधा.
Beg Den Hen Jet Men Net
Pet Vet Web Wet Yes
याप्रमाणे असेच तीन अक्षरी शब्द शोधा व वाचा
मागील भाग पुन्हा वाचण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
https://www.educationschooltocareer.com/2020/10/6.html
क्रमशः
सचिन बाजीराव माने
आरफळ सातारा



टिप्पण्या
अक्षरांचा हा खेळ न संपणारा आणि मुलांना विचार करायला लावणारा आहे .