खेळातून शिक्षण भाग- 9
शिक्षण : शाळा ते करियर
पालक शिक्षक आणि विद्यार्थी
https://www.educationschooltocareer.com/2020/10/7.html
खेळातून शिक्षण भाग- 9
मित्रांनो दररोज आपण प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घरच्या घरी दररोज नवीन खेळ व कृतीतून मराठी गणित आणि इंग्रजी विषयांची विविध कौशल्य शिकणार आहोत.
🦚 मराठी 🦚
शब्दांचा खजिना
उद्देश : विशिष्ट अक्षरापासून सुरू होणारे अधिकाधिक शब्द लिहिता येणे
कृती: हा खेळ दोन गटांत खेळता येईल.
वेळ वीस मिनिटे .
मुलांचे दोन गट करून त्यांना एक अक्षर द्यावे.
प्रथम एकेका गटातील मुलांनी त्या अक्षराने सुरू होणारे एक अक्षरी ,दोन अक्षरी ,तीन अक्षरी ,चार अक्षरी, पाच अक्षरी शब्द क्रमाक्रमाने लिहावे .
जा गटाने जास्तीत जास्त शब्द लिहिलेले आहेत तो गट जिंकेल.
☯️ उदाहरणार्थ - अक्षर क
अ गट
कण, कलश, कथानक, कलाकुसर
ब गट
कला ,कपट ,कलावंत ,कमकुवत
गेल्या भागातील फुलदाणी या खेळाची उत्तरे:
खेळ क्रमांक 1. एक अक्षरी शब्द
ती ,तो, खा, ने, जो, जा ,या, हा ,पै ,ऊ, भू,ख( आकाश), दे, घे, तू.
खेळ क्रमांक 2
1) वण 2) जंग 3) गळ 4) पंच 5) सूर 6) दर 7)डफ 8) गोल, भूल 9) पळ, पिंप 10) बाळ 11) पोळी ,फळी 12) खर 13) गज ,गरा ,जरा , राग 14) कळ ,मळ 15) सुरी
16) साय 17) नाक, नाट, कट, टक 18) वन ,जन, जव 19) प्रभा, प्रत ,भात.
खेळ क्रमांक 3: तीन अक्षरी शब्द
कसर, प्रचार, सुंदर ,भाकर ,मुरडा, गोवरी, लगट, कावीळ, एकाकी, चातक ,जागर, वाळणे, मदार, समान ,नायक ,घडव, लावण, वाळूक, करट, पसर.
मागील भाग पुन्हा वाचण्यासाठी खालील लिंकला टच करा.
गणित
दशक बनवणे
उद्देश: मुलांना एकक दशक संकल्पना समजणे.
साहित्य : माचीसच्या काड्या ,सुट्टी नाणी ,दहा रुपयांच्या नोटा, टिकल्यांची डबी, कागदाची पट्टी, आइस्क्रीमच्या काड्या, रबर, दोरा
कृती: फरशीवर दोन चौकोन आखावेत.
उजव्या चौकोनात माचीसच्या काड्या एक, दोन, तीन ,चार, पाच ,सहा ,सात ,आठ ,नऊ पर्यंत मोजून ठेवा.
आणखी एक काडी ठेवल्यानंतर काड्या होतात 10.
या दहा सुट्ट्या काड्यांना एकक असे म्हणतो.
परंतु गणितामध्ये दशमान पद्धती असल्यामुळे दहा सुट्ट्या काड्यांचा बंडल गठ्ठा बांधावा.
दहा सुट्ट्या काड्यांचा एक गठ्ठा तयार होतो .
हा गठ्ठा डाव्या चौकोनात ठेवावा. एक गठ्ठा म्हणजे एक दशक आणि म्हणून डावीकडील चौकोन हा दशकाचे घर तर उजवीकडील चौकोन हे एककाचे घर आहे .
म्हणजेच सुट्ट्या काड्या एकक आहेत तर बंडल किंवा गठ्ठा हा दशक आहे .
याप्रमाणे सुट्टे10 रुपये आणि दशकाच्या घरांमध्ये दहा रुपयांची एक नोट.
त्याचप्रमाणे टिकल्या, आइस्क्रीमच्या काड्या ,मनी असे सुट्टे आणि आणि दहा वस्तूंचा एक गठ्ठा म्हणजे एक दशक याप्रमाणे कृती करा.
इंग्रजी
स्वर i असणारे तीन अक्षरी शब्द.
कृती :
तीन अक्षरी शब्द वाचण्यासाठी आपण गेल्या भागांमध्ये वाचलेल्या पद्धतींचा वापर करणार आहे .
तीन अक्षरी शब्द वाचण्यासाठी आपल्याला पहिल्या दोन अक्षरांचा आवाज घ्यायचा आहे आणि त्याला तिसऱ्या अक्षराचा आवाज जोडायचा आहे .
☯️ उदाहरणार्थ: Bin = Bi चा आवाज बि + n चा आवाज न
त्यामुळे Bin उच्चार होतो बिन
याप्रमाणे खालील शब्द वाचा.
Dig Fig Fin Hit Kid Lid Lip Nib Pig Wig Win
याप्रमाणे आणखी शब्द शोधा व वाचा.
क्रमशः
सचिन बाजीराव माने
आरफळ सातारा


टिप्पण्या
अतिशय नाविण्य पूर्ण उपक्रम आहेत .