22 व्या शतकासाठीचे शिक्षण भाग 2

 22 व्या शतकासाठीचे शिक्षण

 भाग 2 

https://www.educationschooltocareer.com/2020/12/22.html

मित्रांनो आज आपल्याला 2050 साल कस असेल ! याची काही कल्पना नाही !!!

2020 सालामध्ये जन्मलेली मुलं 2050 साली तीस वर्षांची असणार आहेत. या काळामध्ये जग कसे असेल ? लोक जगण्यासाठी कोणती काम करतील ? अत्याधुनिक तंत्रज्ञान कोणती प्रगती झाली असेल ? नोकर्यांच्या कोणत्या संधी असतील ?हे आज सांगता येणार नाही .

जैव अभियांत्रिकीमुळे मानवी देहामध्ये अभूतपूर्व क्रांती होईल आणि मेंदू संगणक यांच्यामध्ये संवाद साधण्याची प्रणाली विकसित झालेले असेल. त्यामुळे आजची मुलं जे शिकत आहेत त्यापैकी बरेचसे शिक्षण 2050 साली निरर्थक ठरेल का? पूर्वी शाळांमध्ये घोकंपट्टी करून घेतली जायची ,आधुनिक शाळा आल्यानंतर प्रत्येक मुलाला वाचन-लेखन शिक्षण मिळालं . विज्ञान इतिहास भूगोल जीवशास्त्र तंत्रज्ञान या विषयांचे पायाभूत तत्व शिकवण्यात येऊ लागली. की खूप मोठी सुधारणा झाली.

 मात्र एकविसाव्या शतकामध्ये स्मार्टफोन असेल तर मोफत ऑनलाइन कोर्सेस ,विकिपीडिया वाचणे हे करण्यात सर्वांचं लक्ष गुंतून  आहे. यामधून माहितीचा खूप मोठा स्त्रोत सर्वांपर्यंत मोफत पोहोचला आहे .यामध्ये वास्तवाचं भान न राहता एकाकीपणा मध्येच संपूर्ण जगात असल्याचं स्वातंत्र्य एकटेपणात मुल अनुभवताहेत .या सर्व माहितीचे एकत्र तुकडे जोडून संपूर्ण जगाचा सुसंगत चित्र बनवण्यासाठी या पिढीला घडवलं पाहिजे आणि हे भविष्यातील शिक्षण मुलांना स्वतःच्या पायावर निश्चीतच उभे करील .

आत्ताच्या काळामध्ये आपण निर्णय घेऊ त्यातून भविष्यातील जीवन घडणार आहे आणि हे निर्णय आपल्या आजच्या दर्शनावर म्हणजे वास्तवाच्या आकलनावर आधारलेले असणार आहेत. या पिढीकडे जगाचा सर्वसमावेशक दृष्टिकोन नसेल तर भविष्यातील जीवन निरर्थक असेल .

मित्रांनो जैवविज्ञान तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जगावर कोरोणाचे संकट पसरलेले आहे.  सर्व समाजातील घटक जगण्यासाठी धडपड करत आहेत अशातच शिक्षण हे मात्र दुरूनच घ्यावे लागत आहे. यामध्ये कोणीही कल्पना केली नसेल व्हर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना फक्त आपण ऐकत होतो ,वाचत होतो .मात्र प्रत्यक्षात मुलांना ऑनलाइन शिक्षण उपलब्ध झाले आणि व्हर्चुअल जगामध्ये मुले रमु लागली .

पुन्हा वास्तव आणि आभासी या दोन विरुद्ध गोष्टी असून वास्तव प्रत्यक्ष शिक्षण घेतले जाते तसे आभासी पद्धतीने फक्त ऐकू आणि पाहू शकतो कृतीमध्ये मात्र आणता येत नाही .आज आपण सर्वच जाहिराती पाहिल्या तर मुलं कोडींग करा शिकायला लागलेत. आपल्या काळामध्ये आपण संगणकाचा वापर सर्वत्र व्हावा यासाठी आपण एक रुपया दररोज देऊन संगणक शिक्षण घेण्यासाठी धडपड करत होतो .मात्र आत्ताच्या मुलांमध्ये संगणक मागे पडून संगणकाची आज्ञावली शिकणे हे खूप महत्त्वाचे झाले आहे .



अशा मध्ये मुलं कोडिंग शिकू लागलेले आहेत या काळात जर आपण पुन्हा वाचन-लेखन गणिती क्रिया इतिहास भूगोल विज्ञान यातील तत्त्व शिकत राहिलो तर भविष्यामध्ये मेंदू आणि संगणकाची भाषा मुलांपर्यंत कशी पोहोचेल आणि त्याचा वापर मुलं कशी करतील?  म्हणजेच संगणक न शिकलेला मुलगा जसे आपण अडाणी समजत होतो तसेच संगणकाची भाषा न शिकलेला मुलगा हा 2050 साली काय असेल? कारण 2050 सालापर्यंत संगणकाची आज्ञावली माणसांपेक्षा अधिक चांगल्याप्रकारे लिहिणे एवढा कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास झालेला असेल .

मित्रांनो इंग्रजी संभाषण शिकणे हे आज आपण सेमी इंग्रजी इंग्रजी माध्यमांमध्ये मुलं शिक्षणासाठी पाठवून उपयोग होणार नाही. कारण 2050 आली गुगल ट्रान्सलेशन एप  जगातील कोणत्याही भाषांमध्ये आपण संवाद साधू शकतो. 

 मुलांना कोणत्या गोष्टी शिकवले पाहिजेत याविषयी जगभरातील शिक्षण तज्ञ 4 C सांगतात क्रिटिकल थिंकिंग , कम्युनिकेशन, कॉलाबोरेशन आणि क्रिएटिव्हिटी. याचा अर्थ असा की शाळांमध्ये तांत्रिक कौशल्य अपेक्षा सामान्य जीवन कौशल्यांवर भर द्यायला हवे .याचे कारण हेच आहे की परिवर्तनाला सामोरे जाण्याची क्षमता , नवीन गोष्ट शिकणे अपरिचित किंवा अवघड परिस्थितीशी जोडून कसे घेणे , मनाचे संतुलन सांभाळणे ,स्वतःला ओळखणे .

2050 सालाची जुळवून घेताना नवीन संकल्पना, नवीन उत्पादने हे करत असताना स्वतःचा सतत शोध घ्यावा लागणार आहे पुन्हा आभासी जग यामध्ये वास्तविक सर्वजण एकटेच आहोत .आजही घराघरांमध्ये आपण परिस्थिती पाहिली तर घरामध्ये चार सदस्य असतील तर त्यातील तीन सदस्य घरात एकत्र असूनही मोबाईलमध्ये गुंतून पडलेले आहेत .त्यांना प्रत्यक्ष संवाद साधन्यापेक्षा पेक्षा आभासी संवाद साधणे खूप सुखावत आहे. 

अशा मध्ये सर्वजण एकटे पडलेले आहेत आणि या एकटेपणाच्या काळामध्ये स्वतःला ओळखणे ,स्वतःतील कौशल्य समजणे, विचार करणे, संपर्क साधने ,परस्परांशी सहयोग करणे आणि सर्जनशीलता या गोष्टींवर मुलांना शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे .यामध्ये माणसाच माणूसपण हरवलेल आहे. यासाठीच.......

क्रमश:

 सचिन बाजीराव माने 

आरफळ सातारा

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
बदलती व आवश्यक शिक्षणप्रणाली