22 व्या शतकासाठीचे शिक्षण भाग 1
22 व्या शतकासाठीचे शिक्षण
भाग पहिला
मित्रांनो आपणास माहीतच आहे की,
शिक्षणाची व्याख्या-
' विद्यार्थ्यांचा मन मेंदू आणि मनगट यांचा विकास करणे म्हणजे शिक्षण.'
' शिक्षण म्हणजे विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्त्वाचा सर्वांगीण विकास .'
' विद्यार्थ्यांचा बौद्धिक मानसिक आणि शारीरिक विकास करणे म्हणजे शिक्षण .'
अशा विविध व्याख्या मधून शिक्षण म्हणजे काय आपण पाहिले, ऐकले, वाचले.
परंतु मित्रांनो आपण जन्मलो 19 व्या शतकात ,शिक्षण घेतले विसाव्या शतकासाठीचे आणि आता आपण जगत आहोत एकविसाव्या शतकामध्ये.
मित्रांनो हा काळ काही सोपा नव्हता. आपणा सर्वांनाच माहिती एकोणिसाव्या शतकामध्ये औद्योगिक क्रांतीने जगामध्ये जलद बदल घडले आणि एकविसाव्या शतकामध्ये आपण बदल स्वीकारून जगत आहोत .
तुम्ही म्हणाल हे आता नवीन काय ?
आपण शिक्षण घेत असताना पाठांतर ,घोकंपट्टी यावर भर दिला जात असे आणि शिकण्याला संस्कारांची जोड देऊन आपले शिक्षण घडले .या संगणक युगात तरीसुद्धा आपण तग धरून उभे आहोत .
मित्रांनो जगात बदल हे प्रत्येक क्षणाक्षणाला खूप मोठ्या प्रमाणावर घडत आहे आणि अशा आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या मुलांसाठीचे शिक्षण काय असावे याविषयीचा उहापोह आपण या लेखात वाचणार आहोत.
![]() |
| #22 व्या शतकासाठीचे शिक्षण |
मित्रांनो शिक्षण, त्याची पद्धती बदललेली नाही .पूर्वीच्याकाळी शाळांमध्ये घोकंपट्टी करून घेतली जायची, तेव्हा ते गरजेचे होते .कारण माहितीची उपलब्धता कमी होती आणि यात थोड्या तसेच अतिशय संथपणे लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या माहितीवर निर्बंध होते. परंतु आजच्या काळामध्ये तसेच घोकंपट्टी करून शिक्षण दिले जाते आणि मुलांना रोजगार मिळवण्यासाठी शिक्षण मिळावं यासाठीची प्रत्येक घरातील आई वडिलांची धडपड असते .
परंतु मित्रांनो पूर्वीचा काळ आणि येणारा काळ यामध्ये हे खूपच अंतर असणार आहे .आपण भविष्यातील काळाचा कोणताही अंदाज लावू शकत नाही .पूर्वी पुस्तकांची उपलब्धता कमी होती ,रेडिओ ,टेलिव्हिजन ,वर्तमानपत्र फारशी मिळत नव्हती. अशा काळामध्ये आपण शिक्षण घेतले.
आज एकविसाव्या शतकामध्ये कोणालाही माहीत नव्हतं की मोबाईल हा माणसाचा एका अवयवासारखेच काम करेल .आज सर्वांच्या हातामध्ये मोबाईल चिकटलेले दिसतो .अशा काळामध्ये सुद्धा आपण तग धरून उभे आहोत.
आणि आपण अपेक्षा करतो की, माझ्या मुलाने त्याला भविष्यामध्ये रोजगार मिळण्यासाठीचे शिक्षण त्याला मिळाले पाहिजे! यामध्ये वाचन-लेखन ,गणिती क्रिया या मुलांना जमल्याच पाहिजेत, परंतु 2020 साली जन्मलेला आपला मुलगा 2050 साली 30 वर्षांचा असेल ! त्यावेळी आजचे रोजगार आहेत , त्या रोजगाराच्या संधी 2050 साली असतील का ? आणि त्यासाठीच शिक्षण आज आपण जे देत आहोत ते त्याला उपयोगी पडेल का ? याचा आपण कधीही विचार केलेला नाही.
आजच आपण पाहिलं तर मोबाईल हातात आल्यामुळे संपूर्ण जग आपल्या हातामध्ये आहे. म्हणजेच विकिपीडिया, गूगल, यूट्यूब ,किंडर ,ॲमेझॉन, फ्लिपकार्ट ,फेसबुक, युट्यूब, व्हाट्सअप, ऑडिओ बुक्स ,नेटफ्लिक्स या सर्वांच्या मार्फत माहितीचा महाप्रचंड स्रोत आपल्या खिशात आहे. आज कोणतेही पुस्तक ,कोणतीही माहिती , कोणतेही काम, कोणतेही कौशल्य शिकायचं असेल तर आपण मोबाईलवर पाहून शिकू शकतो ,पाहू शकतो, ऐकू शकतो ,वाचू शकतो अशा काळामध्ये मुलांना पाढे पाठांतर, प्रश्नांची उत्तरे लिहा, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार गणिते सोडवा ,धडा मोठ्याने वाचा , इंग्रजी संभाषण शिका या शिक्षण पद्धतीचा वापर केला तर 2050 साली ऐन उमेदीच्या काळामध्ये या शिक्षणाचा काय उपयोग होईल ? याचा आपण कधीही विचार केलेला नाही आणि म्हणूनच एकविसाव्या शतकाच्या मध्यावर आणि 22 व्या शतकाच्या उंबरठ्यावर येऊन आपली पुढची पिढी आपण कोठे पाहत आहोत याचा सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे .
आज एका क्लिकसरशी अंतराळ आत्ता कोणते संशोधन सुरू आहे हे पाहू शकतो ,अंटार्टिकामध्ये हिमशिखर वितळत आहेत ,शेतीसाठीची अत्याधुनिक अवजारे कशी तयार करावीत हे पाहून शिकू शकतो .याऊलट अश्लील व्हिडिओ पाहणे ,आत्महत्या कशी करावी, फटाके कसे तयार करावेत हेसुद्धा एका क्लिकसरशी मुलांना माहिती मिळते.
अशावेळी महत्त्वाचं ,समाजपयोगी ,मानवी जीवन सुखकर व्हावे यासाठी काय योग्य ? काय अयोग्य ? हे सांगण्यासाठी शिक्षणाचा खूप मोठा हातभार वाटा असणार आहे. यासाठीच शिक्षणाची गरज असणार आहे. एवढ्या प्रचंड माहितीचा अर्थ समजून घेणे ,येणाऱ्या बदलांना सामोरे जाणे, तांत्रिक कौशल्य पेक्षा जीवन कौशल्य आत्मसात करणे ,बदलांना सामोरे जाणे, नवीन गोष्टी शिकणे ,अपरिचित परिस्थितीशी जुळवून घेणे ,मनाचं संतुलन सांभाळणे हे शिकणे खूप गरजेचं असणार आहे . यासाठीच शिक्षण मुलांना दिलं गेलं पाहिजे.
कारण 2050 साला मध्ये जग कसे असेल हे आपण सांगू शकत नाही.
फार पूर्वीपासूनच जीवनाचे दोन भाग आहेत होते. एक होता शिकण्याचा आणि दुसरा होता काम करण्याचा. पहिल्या भागामध्ये आपण जीवनोपयोगी माहिती मिळवली ,कौशल्य शिकून घेतली ,जगाविषयी चा दृष्टिकोण समजून घेतला आणि आपल्या व्यक्तिमत्त्व घडवलं. जीवनाच्या दुसर्या भागामध्ये काम करण्यासाठी बाहेर पडलो तेव्हा जे शिक्षण घेतले त्याचा काम करण्याची असणारा संबंध आपणास समजला नाही किंवा तो तितका उपयोगी पडला नाही.
मात्र 2050 सालामध्ये आपल्या मुलांमध्ये हे कोणती कौशल्य असावीत, या कौशल्यांचा उपयोग त्या सालामध्ये होईल का? फक्त स्वतःला जगण्यासाठीच नव्हे तर समाजाला जगवण्यासाठीचा दृष्टिकोण मुलांमध्ये येणार आहे का ?
आज शिक्षण मिळत आहे ते म्हणजे जे खोल्यांमध्ये तीस-चाळीस मुलं वर्गात बसलेले आहेत . दर तीस मिनिटांनी एक नवीन व्यक्ती- शिक्षक समोर येतात .आपणास मराठी, गणित ,परिसर अभ्यास ,विज्ञान ,इतिहास ,भूगोल या विषयांचे माहिती पुरवतात आणि पुन्हा आपण ती माहिती घेऊन घरी येतो .
मात्र आजच्या काळामध्ये ही संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना मोबाईलच्या माध्यमातून मिळत असूनही आपण पूर्वापार चालत आलेल्या शिक्षण पद्धतीचा स्वीकार करत आहोत .जर 2050 साली जग कसे असेल हे जर आपणास माहित नसेल आणि आजच्या परिवर्तनाचा वेग पाहिला असता तंत्रज्ञानाने संपूर्ण मानवावर ताबा मिळवलेला आहे .अशा काळामध्ये वन टू थ्री फोर किंवा मराठी हिंदी इंग्रजी या भाषांवर अवलंबून न राहता आजची व उद्याची संपूर्ण जगासाठी वापरली जाणारी संगणकाची भाषा मुलं कशी शिकतील याकडेच आपणास लक्ष द्यावे लागेल.
https://www.educationschooltocareer.com/2020/12/22-2.html
क्रमशः
सचिन बाजीराव माने
आरफळ सातारा

टिप्पण्या