22 व्या शतकासाठी शिक्षण. भाग तिसरा

 22 व्या शतकासाठी शिक्षण

 भाग तिसरा

भारत असो वा अमेरिका असो 

जपान असो वा चीन असो 

 तिथल्या कालबाह्य झालेल्या शाळेमध्ये शिक्षण घेण्यात अडकून पडलेल्या एका नववीत शिकणाऱ्या मुलाला जर आपण असं म्हटलं की ,तुझी काळजी करणारे तुझ्या घरातील मोठ्या माणसांवर फार अवलंबून राहू नकोस, ते सगळेजण माणूस म्हणून तर चांगले आहेतच, पण त्यांना जग फारसे कळत नाही .

भूतकाळात मोठ्या माणसांवर भरोसा ठेवणे योग्य होतं कारण त्यांना जग चांगला माहीत होतं आणि त्यांना माहीत असलेल्या जगामध्ये बदल ही अतिशय हळूहळू होत होते. परंतु 21 वे शतक हे वेगळेच आहे. या काळात बदलाचा वेग एवढा मोठ्या प्रमाणात होत आहे की घरातील माणसे सुद्धा त्यांनी घेतलेले शिक्षण  कालबाह्य ठरत चाललेले आहे. आज मुलं स्वतः स्मार्टफोन अतिशय उत्तम पद्धतीने हाताळत आहेत मात्र आपण शिकलेलो असूनही अजूनही स्मार्टफोन हाताळता येत नाही.

अस असेल तर मग भरोसा ठेवायचा कोणावर ? कशावर ?  तंत्रज्ञानावर?

 पण तो तर अतिशय मोठा जुगारच ठरेल ! तंत्रज्ञान आपणास सगळ्यांना मदत करते पण मंग आपल्या जीवनावर सत्ता गाजवायला सुद्धा लागते. उद्या असं होईल की कदाचित ते आपणास ओलीस ठेवू शकेल.

 हजारो वर्षांपूर्वी माणसाने शेतीचा शोध लावला. मात्र तंत्रज्ञानाने थोड्याच लोकांना  त्याचा फायदा झाला आणि असंख्य लोकांना मात्र गुलाम करून ठेवले  . तंत्रज्ञान वाईट नाही.  जीवनात काय मिळवायचे आहे हे आपल्याला माहिती असायला हवे  आणि ते मिळवण्यासाठी तंत्रज्ञान मात्र आपणास आवश्य मदत करू शकतो.

 पण जीवनात काय करायचा आहे हेच माहित नसेल  तर मात्र आपण ठरलेल्या उद्दिष्टांना आकार देणे आणि आपल्या जीवनावर  तंत्रज्ञानाला नियंत्रण मिळवणे सहज शक्य आहे  .तंत्रज्ञानाला माणसं अधिक चांगल्या प्रकारे कळवलेले आहेत.  तंत्रज्ञान सेवा करण्याऐवजी  आपणच तंत्रज्ञानाच्या हुकुमाचे ताबेदार झाल्याचं लक्षात आलेला आहे . चेहऱ्यांना स्मार्टफोन चिटकलेली माणसे रस्त्यावरून फिरताना आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत .हे तंत्रज्ञानाला नियंत्रण करतात की तंत्रज्ञांन त्यांना नियंत्रित करते, तुम्हाला काय वाटतं ?

मग आपण काय करायचं?  स्वतःवर अवलंबून राहायचं की तंत्रज्ञानावर  ? आजकाल तंत्रज्ञान व जैव तंत्रज्ञान आणि मशिन लर्निंग कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे संगणक प्रणाली उपलब्ध माहितीच्या आधारे स्वतः शिकत स्वतःमध्ये सुधारणा करत प्रगती करत आहे . लोकांच्या आकांक्षा भावना इच्छा यांवर नियंत्रण मिळवणे सोपे झाले आहे. एकविसाव्या शतकातील अल्गोरिदम....


मित्रांनो आजकाल कोको कोला, गुगल ,ऍमेझॉन  हे आपल्या हृदयाच्या तारांशी खेळतात आणि मेंदूतली बटन कशी दाबायची हे स्वतः करु शकलेले आहेत .आपलं मन , शरीर नेमके कसे काम करतात. म्हणजेच  सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्मार्टफोन आपल्या  शरीराला चिकटलेला असतो.  आपल उठणे सुद्धा तोच ठरवतो.  आपण अलार्म लावलेला असतो.  त्यानंतर सोशल मीडिया वरती आपण काय पोस्ट करतो ,त्या पोस्ट सजेस्ट करणे .

युट्युब वरील आपणास आवडणारे व्हिडिओ दाखवणे . त्यामध्ये मुलं  दिवसभर गुंतून पडतात.  ते काय पाहतात त्याकडे सुद्धा आपले लक्ष नसतं !  आपल्या हातामध्ये आपण घातलेल्या स्मार्टवॉच  आपल्या हृदयाचे ठोके,  आपण किती व्यायाम केला आहे यासारख्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून आहे.

 आपणास कोणत्या गोष्टी आवडतात  याचा सर्व डाटा गुगलकडे क्षणाक्षणाला जातो  आणि गुगल आपणास आवडणाऱ्या गोष्टी दाखवत राहतो .यामध्ये आपण गुंतून पडलेला आहोत .आपली मुलं गुंतून पडलेले आहेत. आपण काय खरेदी करतो कोणत्या गोष्टी ऑनलाईन खरेदी करतो त्यान सारख्याच आपणास आवडणारे इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी सजेस्ट केले जाते आणि आपणास ऑनलाइन खरेदीचा  बळीचा बकरा केले जाते.

 त्यांना नीट पद्धतीने समजून घेतलं .तरच या गोष्टीतून आपल्याला सुटका करून घेता येणार आहे  .आता हे कसं  तर आपणा सर्वांनाच माहिती आहे की स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या खिशामध्ये  आपल्या शरीरावर ताबा घेण्यासाठी चे यंत्र आहे  म्हणजे काय तर  प्रत्येक क्षणाला अल्गोरिदम आपल्यावर नजर ठेवून आहे .आपण कुठे गेलो? काय विकत घेतो?  कोणाला भेटलो ?कोणती माहिती पाहिली? कोणते व्हिडीओ पाहिले ?आपणास कोणत्या गोष्टी आवडतात? आपले श्वास हृदयाचे ठोके  हेच सर्व डाटा अल्गोरिदम आपल्याकडून जाणून घेतलं आणि आपणास  त्याच्यासारखेच आपल्यावर नियंत्रण करायला पाहत आहे .

म्हणून या सर्वांमधून आपलं स्वतःचं आकलन अल्गोरिदम न समजता स्वतः स्वतःला ओळखायला शिकले पाहिजे एवढ्या मोठ्या वेगाने जग बदलत असताना आपण मात्र चार भिंती मध्ये पाठ्यपुस्तक घेऊन मुलांना काय शिक्षण देत आहोत याचा सर्वांनी विचार करायला हवा. 

क्रमश: 

 सचिन बाजीराव माने

 आरफळ सातारा.

sachinmane0383@gmail.com

टिप्पण्या

अरुण मोजर म्हणाले…
खुप छान
शिक्षण देणे, आणि घेणे पुर्वीपेक्षा आता निश्चित बदललेले आहे .