खेळातून शिक्षण भाग दहावा
शिक्षण : शाळा ते करिअर
खेळातून शिक्षण भाग दहावा
मराठी
मला ओळखा
नाद युक्त शब्दातील आवाज कोणाचा आहे ते ओळखणे
सूचना
हा खेळ कितीही मुले खेळू शकतील
वेळ दोन मिनिटे
खाली दिलेले आवाज कोणाचे आहेत ते ओळखा
उदाहरणार्थ गडगडाट- ढग
1) किलबिल 2) सळसळ 3) चिऊ चिऊ 4) खळखळ
5) किणकिण 6) गजबजाट 7) कडकड 8) खडखड
9) घरघर 10) कटकट 11) घणघण 12 ) डमडम
13) छमछम 14) धो धो 15) पों पों
गणित
कालमापन
वार ,महिने, ग्रेगरियन व भारतीय सौर वर्षातील महिने यांची ओळख
साहित्य : दिनदर्शिका/ कॅलेंडर
आपल्या घरातील दिनदर्शिकेच्या माध्यमातून मुलांना वार ,महिने ,महिन्यातील दिवस ,एकूण वर्षाची दिवस ,ग्रेगरियन व भारतीय सौर वर्षातील महिने यांची ओळख, सणांची ओळख.
कृती
वारांची नावे क्रमाने सांगणे
आधी नंतर येणारे वार सांगणे
दिनदर्शिकेमध्ये आपल्या घरातील आई-वडील, भाऊ-बहीण यांचे वाढदिवस कधी असतात हे विचारावे आणि वाढदिवस सांगताना तारीख आणि महिना सांगावा व त्याला गोल करावा.
त्याचप्रमाणे कोणत्या महिन्यात कोणते सण येतात यांची यादी तयार करणे तसेच राष्ट्रीय सणांची महिने पाहणे .उदाहरणार्थ 26 जानेवारी 15 ऑगस्ट
ग्रेगरियन वर्षातील येणारे महिन्यांची नावे यांची यादी करणे ग्रेगरियन वर्षात येणारे सणांची यादी करणे
भारतीय सौर वर्षाची सुरुवात कोणत्या महिन्यात होते आणि कोणत्या महिन्यात संपते याची चर्चा करणे
ग्रेगरियन वर्षाची सुरुवात कोणत्या महिन्यात पासून सुरू होते आणि कोणत्या महिन्यात संपते याची चर्चा करणे
ग्रेगरियन वर्षांमध्ये येणाऱ्या महिन्यांचे दिवसांची यादी करणे
त्याचप्रमाणे भारतीय सौर वर्ष मधील येणाऱ्या महिन्यांचे दिवसांची यादी करणे
इंग्रजी
स्वर o ला व्यंजनांशीजोडल्यावर बनणारा आवाज
तीन अक्षरी शब्द वाचण्यासाठी आपल्याला व्यंजनाला स्वर o जोडल्यावर त्या दोन अक्षरांचा आवाज काय होतो ते माहीत असणे जरुरी आहे. O हा स्वर वेगवेगळ्या व्यंजनांना जोडल्यावर त्या दोन व्यंजनांचा आवाज काय होतो ते शिकूया.
O चा आवाज होतो ऑ
Cot यामध्ये c चा आवाज क + o चा आवाज ऑ
co चा आवाज होतो कॉ
t चा आवाज होतो ट
कॉट
याप्रमाणे खालील शब्द वाचा
Boy. Cop. Cot
Fox. Jog. Mob.
Mom. Mop. Pot.
Rob. Top. Toy
याप्रमाणे आणखी शब्द शोधा व वाचा
क्रमश :
सचिन बाजीराव माने
आरफळ सातारा


टिप्पण्या