शिक्षण व्यवस्था

 शिक्षण व्यवस्था

एकविसाव्या शतकामध्ये शिक्षण हे येणाऱ्या भविष्यकाळाचा वेग पाहता प्रभावीपणे काम करताना दिसत नाही. मग भविष्यकाळी शिक्षण कसे असावे याचा विचार करतानाच सर्वप्रथम शिक्षण व्यवस्था ,रचना, शिक्षण पद्धती कशी आहे यावर सर्व अवलंबून असणार आहे.

   मित्रांनो एखाद्या  देशाने स्वीकारलेली शिक्षण पद्धती किंवा तिथे दिले जाणारे शिक्षण हे जगाच्या नकाशावर किती प्रभावी आहे हे आपणास कसे कळते?  जगभरातल्या अशा कोणत्या देशातील शिक्षण व्यवस्था अधिक प्रभावी आहेत याचे ज्ञान कोणत्या देशातील विद्यार्थी अधिक प्रगती करतात यामधूनच मिळणे शक्य आहे. 

अर्थातच सर्वांगीण विकास साध्य झालेल्या विद्यार्थ्यांकडून कोणताही देश अधिक कार्यक्षमतेची अपेक्षा करू शकतो या सर्व परिस्थितीचा विचार करूनच या सर्व प्रश्नांच्या समाधानासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक संस्था काम करते.



 OECD ( organisation for economic cooperation and development) ही संस्था दर तीन वर्षांनी पिसा ( The program for international student assessment) नावाची मूल्यांकन चाचणी घेते .

ही चाचणी जगातील सर्वात जास्त प्रसिद्ध असलेल्या लहान-मोठ्या अशा 154 देशांपर्यंत पोहोचलेली आहे. या प्रकारच्या चाचणीमध्ये तब्बल 79 देश विविध पद्धतीने सहभागी होते .या चाचणीत विविध देशातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाचा अभ्यास केला जातो .

आंतरराष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक संबंध कसा आहे .

शैक्षणिक साधन सामुग्रीच्या दृष्टीने प्रत्येक देश कशा प्रकारे सकारात्मक आहे .

या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय सहभागासाठी विद्यार्थी किती प्रमाणात प्रगतशील किंवा सक्षम आहेत .

आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांमध्ये विद्यार्थ्यांची क्षमता कशा प्रकारे वाढते आहे .

कोणते घटक क्षमतेवर परिणाम करतात आणि कोणत्या पद्धतीत यासाठी अधिक परिणामकारक ठरतात याविषयी परीक्षा चाचणी महत्त्वाची ठरते.

 या चाचणीचे वैशिष्ट्य म्हणजे दर वर्षी अभ्यासाचा किंवा विचार करण्याचा प्रमुख घटक हा वेगळा असतो.

अशा प्रकारच्या चाचणीचा प्रथम निकाल 2000 मध्ये जाहीर झाला यामध्ये विज्ञान गणित आणि भाषा या तीन विषयांचा विचार केला गेला होता .या चाचणीचा 2015 मध्ये विज्ञान व गणित या विषयांवर भर होता. मागील भाषा विषयावर या चाचणीमध्ये भर दिला गेला. वाचन कौशल्य आणि आकलन क्षमता असा नुकत्याच झालेल्या चाचणीचा विषय होता.

 चाचणीसाठी वाचन कौशल्यांचा विचार करताना मात्र शब्द वाचन असे गृहीत न धरता वाचन ,आकलन ,त्यावरील चिंतन आणि त्यानुसार अनुमान काढून क्रिया या आणि त्यानंतर या सर्वांचा सारासार विचार करून सारांश या सर्व मुद्द्यांचा यात समावेश केला गेला.

 त्याहीपुढे जाऊन फक्त पाठ्यपुस्तकातील विषय पुरेसं असून सध्याच्या कालच्या आंतरजालीय लेखांचा विचार विविध प्रसारमाध्यमांतून प्रसारित होणारे शिक्षण विषयक माहितीचा या चाचणीत विचार केला गेला. या घटकातील सत्यासत्यता पडताळून त्याविषयीची अनुमान आणि सारांश यांचा विचार विद्यार्थ्यांना करता येतो का याची पडताळणी केली गेली .

यात काही चमत्कृतिपूर्ण आणि विशेष निकाल हाती आले .काही देशातील विद्यार्थी या सर्व प्रक्रियेमध्ये अपेक्षेनुसार पात्र ठरले चीन ,अल्बेनिया ,नॉर्वे यासारख्या काही प्रगतीशील देशांमध्ये या गोष्टींमध्ये सरासरी 90 टक्के विद्यार्थी प्रभावीपणे सफल होतात. परंतु काही प्रगत अशा देशांतील वाचन आणि आकलन क्षेत्रातील परिस्थिती अधिकच गंभीर दिसून आले.

भारतात जर विचार केला तर 2009 मध्ये भारताने पिसा या परीक्षेसाठी भाग घेतला होता. यामध्ये तर 73 देशांमध्ये भारताचा 72वा क्रमांक आला .त्यानंतर भारताने भाग घेतला नाही .MHRD ने 2018 ठरवले की भारत सुद्धा या परीक्षेसाठी भाग घेईल आणि त्यानंतर  2021 साठी भारतातील विविध राज्यांतील विद्यार्थी या परीक्षांमध्ये भाग घेण्यासाठी तयारी करत आहेत.

 विद्यार्थ्यांना मिळालेले भरपूर गुण गुणवत्ता वाढण्यास उपयुक्त ठरतील असे नाही, तर ' लर्निंग टू लर्न ' ही प्रक्रिया शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळेच भारतात नववी ते बारावी चे शिक्षण अधिक विषयांवर  विषयानुभवी आणि विचारप्रवण असावे यासाठी नव्या शैक्षणिक धोरणात भर गरजेच आहे.

क्रमशः

 सचिन बाजीराव माने

 आरफळ सातारा

sachinmane0383@gmail.com

टिप्पण्या

अरुण मोजर म्हणाले…
आधुनिक विचार शिक्षणातून प्रकट होणे गरजेचे आहे .