सिंगापूरची शिक्षणव्यवस्था

 सिंगापूरची शिक्षणव्यवस्था

मित्रांनो PISA चाचणीमध्ये गणित, विज्ञान आणि वाचन ह्या विषयांवर जगभरात घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये 2018 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या सिंगापूर या देशाच्या शिक्षणव्यवस्थेची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

सर्वप्रथम सिंगापूर या देश विषयी माहिती घेऊया. सिंगापूर हा जपान प्रमाणेच पूर्व आशियाई देश या देशाची 2019 मधील लोकसंख्या 57,03,600 लाख असून देशाचे क्षेत्रफळ फक्त 719 चौरस किलोमीटर आहे. या देशात 17 टक्के लोक हे लखपती आहेत .सिंगापूर हा संपूर्ण आशिया खंडातला सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश आहे. शिवाय सिंगापूरमध्ये बेरोजगारी ही नाही. रस्त्यावर भिकारी दिसणारच नाहीत असे वातावरण आहे. असे चित्र आज दिसत असले तरी एक दशकापूर्वी ही परिस्थिती नव्हती .

सिंगापूरचे चित्र 1960 च्या दरम्यान अत्यंत निराश होते. मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या, वाढता भ्रष्टाचार, अत्यंत कमी पगार असे अनेक अडथळे सिंगापूरच्या समोर होते. 1965 मध्ये स्वतंत्र सिंगापूरच्या मंत्रिमंडळाने काही निर्णय घेतले. अनेक बदल सुचवले व हळूहळू त्यावर अंमल बजावणी करू लागला. त्यातूनच सिंगापूरची परिस्थिती बदलू लागले .

1970 मध्ये आर्थिक तेजी येत राहिली आणि नफा झाला .1961 मध्ये या देशात लागलेल्या आगीचा रुपाने मोठी आपत्ती आली होती. या आगीत साडेचार लाख चौरस किलोमीटर क्षेत्रातील अनेक घरे जळून खाक झाली. मात्र हा देश हरला नाही .सर्व परिस्थितीचा विचार करता मोठ्या प्रमाणात घरे बांधणे सुरू झाली आणि पुढच्या वर्षभरातच आपत्तीग्रस्तांना घरे देण्यात आले .

1965 पर्यंत पाच लाख दहा हजार नवीन घरी निर्माण झाले .त्यानंतरही  लोकसंख्येसाठी अनेक टोलेजंग इमारती बांधण्यात आल्या आणि त्या जनतेला स्वस्त देण्यात आल्या.



 मित्रांनो पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध असणारा हा देश .या देशांमध्ये आपण गेल्यानंतर आपणास दिसणार्‍या उंच उंच इमारती, स्वच्छ रस्ते, तसेच पर्यटनासाठी विकसित केलेले विविध क्षेत्रे.

 मित्रांनो जेवढी या देशाची लोकसंख्या आहे तेवढेच लोक दररोज या देशात पर्यटनासाठी भेटी देतात .अत्यंत झपाट्याने प्रगती करत आणि अडचणींना सामोरे जात सिंगापूर हा देश वाटचाल करीत राहिला. म्हणून या देशातील शिक्षण व्यवस्थेविषयी ची माहिती पाहूया.

सिंगापूर शिक्षण व्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये

सरकारी धोरण

 सिंगापूरच्या सरकारी धोरणाचा शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत विचार करताना असे समोर आले आहे की देशाच्या वार्षिक अर्थसंकल्प किंवा अहवालात शिक्षणपद्धती साठी खास वीस टक्के निधी राखून ठेवला जातो.

 सरकारच्या या धोरणामुळे सिंगापूर या देशात संपूर्ण संशोधन दृष्टिकोनातून तयार केलेली आणि अनेक देशांना आदर्श शिक्षण पद्धती दिसून येते .शाळांची उत्कृष्ट व्यवस्था, तंत्रज्ञानाचा शिक्षणात प्रभावी वापर  हे फक्त लेखात लिहिण्यासाठी किंवा वाचण्यासाठी नसून  अर्थसंकल्पाच्या वीस टक्के रक्कम  ही  संपूर्ण खर्च करण्यात शिक्षणावरच खर्च करण्यात येते  .हा या शिक्षण व्यवस्थेतील  सर्वात  महत्त्वाचा भाग आहे  इतर देशांमध्ये  होत नाही आणि म्हणूनच पिसा चाचणीमध्ये सिंगापूरने भाषा विज्ञान आणि गणित या विषयात पहिल्या पाचात स्थान मिळवलेली दिसते.

शिक्षक प्रशिक्षण 

जर उत्तम शिक्षण व्यवस्था घडवायचे असेल तर त्यातील महत्त्वाचा घटक हा शिक्षक असतो आणि सिंगापूर शिक्षण व्यवस्थेने शिक्षकांना शिक्षणात महत्त्वाचा केंद्रबिंदू मानलेले आहे. शिक्षकांना प्रशिक्षित करणारी संस्था एक उत्तम शिक्षणव्यवस्थेचे केंद्रस्थान. याच कल्पनेतून साकार झालेली सिंगापूरमधील राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण संस्था .प्रत्येक शिक्षकाला या संस्थेत प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक शिक्षक हा प्रशिक्षित झाल्यावर त्यांची विषयवार व गुणवत्तेनुसार लहान-मोठ्या शाळांत निवड केली जाते.

 येथून बाहेर पडणारे शिक्षक आपल्या वर्गात अत्यंत उत्तम प्रकारे शिकवू शकेल आणि राष्ट्राची प्रगती साठी उत्तम शिक्षण प्रदान करून मदत करू शकेल याची तयारी येथे घेतली जाते .त्याचप्रमाणे प्रत्यक्ष शिकण्यासाठीचे शिक्षक ,नेतृत्व करणारे शिक्षक आणि विषयांचे सखोल ज्ञान असणारे तज्ञ शिक्षक अशा तीन प्रकारांमध्ये शिक्षकांची विभागणी केली जाते .यामुळे ही शिक्षण व्यवस्था मुळातूनच मजबूत करण्यात आली आहे

तंत्रज्ञानाचा वापर आणि कौशल्यपूर्ण शिक्षणाचा आग्रह 

सिंगापूरचे शाळांचे निरीक्षण केले असता येथील शाळांमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. सर्व प्रकारची अत्याधुनिक उपकरणे ,तसेच संगणक इत्यादींचा या शिक्षण पद्धतीत आवर्जून आधार घेतला जातो .विद्यार्थ्यांना घोकंपट्टी न करता करायला न लावता विविध प्रकारच्या माध्यमातून त्यांना विषय समजावून दिला जातो. पाठांतर ऐवजी या शाळांमध्ये कल्पनाशक्तीचा वापर करून त्या विषयाचा अधिक अभ्यास करून घेतला देण्याचा प्रयत्न केला जातो .तंत्रज्ञानाचा शैक्षणिक साहित्य म्हणून वापर केल्याने आणि विषयाच्या संकल्पना स्पष्ट करून देण्यात येत असल्याने विद्यार्थी या वातावरणात हसत खेळत शिक्षण घेताना दिसतात.

 एका मुलाखतीत येथील मुख्याध्यापक सांगतात की ," मुलांनी केवळ ज्ञान न घेता स्वतः ज्ञानाची निर्मिती केली पाहिजे " यासाठीचे शिक्षण शाळेत दिले जाते .मुलांनी सकाळी उठल्याबरोबर ,"आज पण शाळा का ?" हा प्रश्न न विचारता ,"आज मला शाळेत गेले पाहिजे "असे विचार मुलांच्या मनात येतील अशी शिक्षण व्यवस्था सिंगापूरमधील निर्माण केली आहे.

बालकांचे शिक्षण 



 शिक्षणावर शासनाचा वचक राहावा यासाठी केलेला काही उपयोजना प्रशंसनीय आहेत. शिशु वर्गासाठी प्रामुख्याने प्रवेश प्रक्रियेचे नियम महत्त्वाचे मानले जातात. सिंगापूरमधील प्रवेश प्रक्रिया ही मार्च एप्रिल महिन्यात केली जाते. या देशात चाईल्ड केअर सेंटर आणि गार्डन या दोन स्वतंत्र भाग असतात. या दोन्हींसाठी आपल्या पाल्याचा प्रवेश करून देताना सिंगापूरमधील पालक ते पाळणाघर किंवा शिशुवर्ग सिंगापूर सरकार कडून प्रमाणित असेल तर त्याचे प्रवेश घेतात .अशा वर्गांसाठी कडून प्रमाणपत्र घेण्याची सक्ती अशा मार्गांवर असते .चाईल्ड डेव्हलपमेंट एजन्सी यांनी तयार केलेल्या यादीत त्या वर्गाचे नाव असणे सिंगापूरमध्ये प्रमाणित पणाचे लक्षण मानले जाते.

बुद्धिमत्ता स्तरानुसार अभ्यासक्रम 

इतर मुलांपेक्षा कमी बुद्धिमत्ता किंवा शारीरिक अथवा मानसिक समज असणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता सिंगापूरमध्ये वेगवेगळ्या विविध पद्धतींचा अवलंब करणाऱ्या शाळांचा शाळांची निर्मिती करण्यात आली आहे .तेथे अशा प्रकारच्या बुद्धिमत्तेच्या मुलांना अधिक सक्षम बनवले जाते.

सिंगापूर शिक्षणव्यवस्थेत बद्दलची आणखी माहिती आपण पुढील लेखात पाहणार आहोत.


क्रमश: 

 सचिन बाजीराव माने 

आरफळ सातारा.

sachinmane0383@gmail.com

टिप्पण्या