सिंगापूरची बालकेंद्री शिक्षण पद्धती

सिंगापूरची बालकेंद्री शिक्षण पद्धती

सिंगापूर या देशांमध्ये बालवयीन शिक्षणावर अधिक भर देण्यात आलेला आहे. हे या शिक्षण पद्धतीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे .सिंगापूर प्रशासन बालवयात शिक्षणाला अधिक प्राधान्य देते . लहान असतानाच सिंगापूरमधील मुलांना शाळांची ओळख करून दिली जाते .

 शिक्षणाचे एक वर्ष बालवाडी आणि दोन वर्ष शिशुवर्ग असे दोन भाग सामान्यपणे आढळतात. या तीन वर्षांच्या काळात मुलांना सामान्य भाषाज्ञान, वाचन ,संभाषण ,सामाजिकतेची जाण, कल्पकता आणि कौशल्य यांचे योगदान दिले जाते. त्यांच्या शारीरिक विकासाकडे लक्ष दिले जाते .

या काळात सिंगापूरमधील मुले दोन प्रमुख भाषा शिकतात हे या शिक्षण पद्धतीतील एक महत्त्वाची वैशिष्ट्ये .

यातील एक भाषा असते इंग्रजी आणि दुसरी चायनीज, मलाया आणि तमिळी यांपैकी एक असते .अशाप्रकारचे हे दोन्ही बालवयीन शिक्षणाचे वर्ग सिंगापूर शाळा अंतर्गत जानेवारी ते नोव्हेंबर या काळात घेतले जातात आणि साधारण जून महिन्यात उन्हाळ्यात त्यांना एक महिना सुट्टी असते.



 या पद्धतीने बालवयीन शिक्षणानंतर वयाच्या सातव्या वर्षानंतर प्राथमिक शाळेत प्रवेश घेतात .प्राथमिक शाळेचा काळ साधारणतः सहा वर्षांचा असतो .यातील चार वर्षे शिक्षण कालावधी असतो आणि दोन वर्षाचा मार्गदर्शन घेण्याचा कालावधी समाविष्ट असतो. मुलांना सामान्य गणित ,इंग्रजी भाषेबाबत अचूक आकलन क्षमता आणि मातृभाषेचे धडे देणे हे प्राथमिक शाळांचे उद्दिष्ट असते.

 या वयात या शाळांमध्ये मुलांमध्ये पाठ्यक्रम इतर कौशल्यांची रुजवण केली जाते आणि त्यांना त्याबद्दल प्रोत्साहन दिले जाते

 शाळेतील विद्यार्थी त्यांची सामर्थ्य आणि वाढीची क्षेत्रे जाणून घेऊन प्रारंभ करतात.  असे केल्याने ते त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवतील आणि माध्यमिक शाळेत येईपर्यंत बदलांशी जुळवून घेण्यास शिकतील.  माध्यमिक शिक्षणानंतरच्या स्तरावर, प्रतिकूल परिस्थितीत ते लवचिक होतील.

 प्राथमिक शाळेच्या शेवटी विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या क्षमता असाव्यात

  • चुकीचे बरोबर ओळखण्यात सक्षम ,
  •  त्यांची शक्ती आणि वाढीसाठी क्षेत्रे जाणून घेणे
  •  इतरांना सहकार्य करण्यात, सामायिक करण्यास आणि त्यांची काळजी घेण्यास सक्षम होणे
  •  त्यांच्या सभोवतालच्या जीवनाबद्दल उत्सुकता बाळगणे
  •  विचार करण्यास आणि आत्मविश्वासाने स्वत: ला व्यक्त करण्यास सक्षम करणे
  •  त्यांच्या कार्याचा अभिमान बाळगणे.
  •  निरोगी सवयी आणि कलांविषयी जागरूकता असणे

 माध्यमिक

 माध्यमिक शाळा शेवटी, विद्यार्थ्यांनी हे करावे:


  •  नैतिक सचोटी ठेवणे
  •  त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे आणि बदलांशी जुळवून घेण्यात सक्षम असणे
  •  कार्यसंघांमध्ये कार्य करण्यास आणि इतरांबद्दल सहानुभूती दर्शविण्यास सक्षम लक्षणे
  •  सर्जनशील व चौकस बुद्धी असणे
  •  वैविध्यपूर्ण दृश्यांचे कौतुक करण्यास आणि प्रभावीपणे संप्रेषण करण्यात सक्षम असणे
  •  त्यांच्या स्वतःच्या शिकण्याची जबाबदारी घेणे.
  •  शारीरिक क्रियांचा आनंद घेणे आणि कलांचे कौतुक करणे.
  •   देशासाठी काय महत्त्वाचे आहे ते समजून घेणे

 माध्यमिक नंतरचे

 माध्यमिकोत्तर शिक्षणानंतर विद्यार्थ्यांनी हे करावे:


  •  जे योग्य आहे त्यासाठी उभे राहण्याचे नैतिक धैर्य बाळगणे
  •  प्रतिकूल परिस्थितीत लवचिकता अंगी ठेवणे
  •  संस्कृतींमध्ये सहयोग करण्यात सक्षम होणे आणि सामाजिक जबाबदार राहणे
  •  नाविन्यपूर्ण आणि उद्योजकता अंगी बाळगणे
  •  समालोचनात्मकपणे विचार करण्यास आणि मनापासून संवाद साधण्यास सक्षम होणे.

 एकविसाव्या शतकामध्ये सिंगापूर शासन हे विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झटत आहे त्याचाच परिणाम सिंगापूर शिक्षणव्यवस्था ही जगात अव्वल आहे.

 पुढील भागात सिंगापूर शिक्षण व्यवस्था लवचिक कशी आहे हे आपण पाहणार आहोत.


क्रमशः

सचिन बाजीराव माने 

आरफळ सातारा

sachinmane0383@gmail.com

टिप्पण्या