सिंगापूर शिक्षणाची यशोगाथा

 सिंगापूर शिक्षणाची यशोगाथा

सिंगापूर शिक्षणव्यवस्थेचे प्रमुख ध्येय हे आहे की ,विद्यार्थ्यांमधील सर्वोत्कृष्टतेचा शोध घेणे ,त्यांच्यातील क्षमता ओळखायचं आणि त्यांचा विकास करण्यासाठी ध्येयाने प्रेरित होऊन शिक्षित करण्यासाठीच्या कौशल्यांचा संपूर्ण जीवनामध्ये उपयोग होईल असा विकास घडवले .

सिंगापूरमधील प्रत्येक मुलाचा संपूर्ण आयुष्याचा विस्तृत व सखोल पाया भरण्यासाठी शिक्षण उपलब्ध करणे ,यासाठी त्याला जे हवे ते मिळवून देणे. यासाठी सिंगापुर शिक्षण व्यवस्थेने विस्तृत व समग्र सखोल शिक्षण दिले आहे. त्यामध्ये उत्कृष्ट असे अभ्यासक्रम ,जागतिक उत्तम दर्जाचे शिक्षक आणि तंत्रज्ञान व माहिती संप्रेषण याचा शिक्षणात भरपूर वापर यातूनच विद्यार्थ्यांना शिकण्याच्या संधी उपलब्ध करून दिले आहेत.

सिंगापूर शिक्षणव्यवस्थेचा मजबूत पाया




शिशु वर्गाचे शिक्षण

शिशुवर्ग मध्ये पाच-सहा वर्षाच्या मुलांना दोन वर्षाचे शिशु वर्गाची शिक्षण मिळते. यामध्ये NEL अभ्यासक्रम राबवला जातो. मूलभूत साक्षरता आणि संख्या कौशल्य प्राथमिक गुणांमध्ये औपचारिक शिक्षणाकडे जाण्यासाठीचा पाया दृढ केला जातो.

प्राथमिक स्तर

प्राथमिक शाळांतील शिक्षण यामध्ये सहा वर्षाचे शिक्षण असते .प्राथमिक शाळांमध्ये वयाच्या सातव्या वर्षी प्रवेश दिला जातो.

यामध्ये मुलांना  इंग्लिश व मातृभाषा या भाषांची शिक्षण, तसेच गणित आणि विज्ञान, सामाजिक शास्त्र ,कला व संगीत यांचे शिक्षण दिले जाते. यासाठीचा मुलांनी शिकण्यासाठीची कौशल्य कोणती असावीत यासाठी व्यवस्था निर्माण केलेले आहे.  प्राथमिक शिक्षण व्यवस्थेमध्ये  अभ्यासक्रमात  समाविष्ट पद्धती  या आहेत 


co circular activities ,

civics and moral education ,

social emotional learning,

 national education ,

physical education ,

project work यांचा वापर करून दर्जेदार अध्ययन अध्यापन होते.

प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी, मातृभाषा, गणित आणि विज्ञान या भाषांचा समावेश असून मुलांच्या समजुतीनुसार हे विषय मुले शिकू शकतात .प्राथमिक तिसरा वर्ग पासून विज्ञान ,प्राथमिकच्या 1- 4 वर्गासाठी आरोग्य शिक्षण हा इंग्रजी या विषयांमध्ये शिकवला जाणारा विषय आहे.

 त्याचप्रमाणे प्रात्यक्षिकाचा भाग ही अभ्यासक्रमांची निगडित असून त्यासाठी विशिष्ट वेळ नाही आणि तसेच प्रात्यक्षिक म्हणून परीक्षा घेतली जात नाही. 

प्राथमिक शाळांच्या शेवटी Primary school leaving Examination  (PSLE ) परीक्षा घेतली जाते .त्या परीक्षेतील गुणांच्या आधारे मुलांना माध्यमिक शाळांमध्ये प्रवेश मिळतो

माध्यमिक स्तर 

माध्यमिक शाळांमधील शिक्षण चार ते पाच वर्षांसाठीचे शिक्षण माध्यमिक शाळांसाठी दिले जाते.

 प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षणाचे तीन विविध मार्ग मुलांसाठी खुले होतात. त्यातून विद्यार्थी विविध कोर्स व त्यांच्या आवडीनुसार शिक्षण देऊ शकतात हेच या शिक्षण पद्धतीचे मुख्य वैशिष्ट्य आहे

वय वर्ष 13 मध्ये माध्यमिक शिक्षणाची सुरुवात होते .अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थी खेळ ,कला व सामाजिक कृतींमध्ये भाग घेत असतो .माध्यमिक शाळांसाठी सलग चार वर्षांचा शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच तांत्रिक अभ्यासक्रम हा शिकवला जातो .



त्याचबरोबर विशेष शिक्षण देणाऱ्या शाळाही उभे केलेले आहेत यामध्ये गणित विज्ञान ,शारीरिक शिक्षण देणाऱ्या शाळा ,कला शिक्षण देणाऱ्या शाळा ,विज्ञान आणि तंत्रज्ञान तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठीच्या शाळा मुलांना उपलब्ध करून दिले आहेत . माध्यमिक शाळांमध्ये  विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार प्रवेश घेऊ शकतात.

पूर्व विद्यापीठ स्तर

यामध्ये दोन वर्षांचा अभ्यासक्रम असतो 17 ते 19 वर्षे वयाची मुले यामध्ये शिक्षण घेऊ शकतात .यामध्ये विद्यार्थ्यांना तीन विभागांमध्ये शिक्षण घेता येते.


तंत्र विद्यानिकेतन

यामध्ये विद्यार्थी पूर्ण किंवा अर्धवेळ शिक्षण देऊ शकतात. 17 ते 19 वर्षे वयाच्या मुलांना यामध्ये शिक्षण घेता येते .यामध्ये डिप्लोमा कोर्सेस विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात. 

विद्यापीठ स्तर

सिंगापूरमध्ये चार मोठ्या  विद्यापीठांची निर्मिती केलेली आहे .त्याचबरोबर जागतिक  विद्यापीठांशी संलग्न सिंगापूर शिक्षणव्यवस्था आहे

कला शिक्षण संस्था

 यामध्ये दोन विशेष कला शाळांची निर्मिती केलेली असून 40 डिप्लोमा आणि डिग्री कोर्सेस आहेत .चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत असतात.

विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह

त्याचबरोबर सिंगापूर शिक्षणव्यवस्थेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जे पालक दिवस-रात्र काम करत असतात अशा पालकांच्या मुलांसाठी शाळांमध्ये स्वतंत्र वसतिगृहांमध्ये मुलांना राहण्याची ,खाण्याची व्यवस्था केलेली आहे .यांमध्ये पालकांप्रमाणे काळजी घेणारे शिक्षक व विद्यार्थी वस्तीगृह चालवतात .त्यामुळे मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते.

या सर्वांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, तसेच सिंगापूरच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि भविष्यात उत्तम होतं नोकरी व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सिंगापूर शासन व्यवस्थेने विविध प्रयोगशाळेची सुद्धा निर्मिती केलेली आहे.

 सिंगापूरची विज्ञान क्षेत्रात केलेली प्रगती निश्‍चितच अधिकाधिक हुशार कष्ट , गरज लक्षात घेऊन केलेले आहे .यातूनच सिंगापूरची STEM( Science ,Technology ,Engineering ,Mathematics )  शिक्षणामधील गरज वाढीस लागलेले असून STEM शिक्षणाला चालना देणे, आर्थिक घडी सुधारणे ,रोजगाराची संधी अशी तीन उद्दिष्टे प्राप्त केलेली आहेत .

सिंगापूर देश शिक्षणाची भविष्यात वाढत जाणारी मागणी लक्षात घेता आपला देश मागे पडणार नाही या दृष्टिकोनातूनच शिक्षण देण्यास प्राथमिक वर्गात पासून सुरुवात केलेली आहे. याचा परिणाम म्हणजे PISA  या परीक्षेत सिंगापूर शिक्षण व्यवस्था अव्वल स्थानावर आहे. 

सिंगापूरमधील आणखी महत्त्वाचा बदल म्हणजे मुलांनी परीक्षांमध्ये क्रमांक काढण्याची पद्धत बंद केली असून नवीन पद्धती विकसित केली.

 त्यामध्ये विद्यार्थ्यांचे वर्गातील प्रगती दर्शवणारा लघुतम साधारण विभाजक कमीत कमी आणि जास्तीत जास्त गुण नापास गुणांच्या जागी खूण किंवा रंग ,वार्षिक पास किंवा नापास सर्व गुणांची बेरीज असे काही मोजकेच घटक आता पाहायला मिळतात.

 यातून शिक्षण क्षेत्रातील अनावश्यक स्पर्धा आणि चढाओढपासून दूर ठेवण्यासाठी सिंगापूरचे शिक्षण मंत्री यांनी शिक्षणातील परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचे क्रमांक काढणी प्रतवारी करण्याची पद्धत बंद केली .

पहिला आणि दुसरा क्रमांकापेक्षा ' शिक्षण घेण्याला ' जास्त महत्त्व देऊन विद्यार्थ्यांमध्ये शिस्त लागावी. यासाठी सिंगापूर हा देश आग्रही आहे हे STEM शिक्षणपद्धतीची महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.


 क्रमशः

 सचिन बाजीराव माने 

आरफळ सातारा

sachinmane0383@gmail.com

टिप्पण्या